धकधर्क गर्ल माधुरी दीक्षित सोशल मिडियावर कायम अपडेट असते... त्यामुळे इन्स्टाग्रामवर तिचे वेगवेगळे लूक्स, स्टाईल्स, ज्वेलरी आणि कपड्यांच्या फॅशन बघायला तिच्या चाहत्यांना जाम आवडतं.. आता माधुरीने तिचे आणखी काही फोटो इन्स्टावर अपलोड केले असून या फोटोमधली माधुरीची साडी तिच्या मुळच्या सौंदर्याला चार चाँद लावणारी ठरली आहे.. माधुरीने नेसलेली ही जामुनी रंगाची साडी (Madhuri Dixit's Love for saree) वेलवेटची असून साडीची किंमत तब्बल १ लाख १५ हजार रूपये एवढी आहे...
Grace & Elegance are my forever partners.... असं कॅप्शन माधुरीने या तिच्या फोटोंना दिलं असून खरोखरंच या दोन्ही गोष्टी तिच्यामध्ये ओतपोत भरून आहेत. माधुरीची ही साडी Torani या ब्रॅण्डची असून साडीचा पदर पुर्णपणे वेलवेट सिल्क फॅब्रिकचा आहे. पदराव्यतिरिक्त बाकीच्या साडीवर बटरफ्लाय नेट फॅब्रिक आहे. बटरफ्लाय नेट फॅब्रिक म्हणजे साडीच्या खाली एखादा सिल्कचा जाड कपडा असतो आणि त्यावरून मग नेटचं कव्हरिंग केलेलं असतं. ज्या रंगाचा कपडा त्याच रंगाची किंवा त्याला मिळत्याजुळत्या रंगाची नेट लावली जाते. यामुळे मग साडीला आणखी जास्त हेवी आणि रिच लूक येतो...
वेलवेटचा पदर आणि बाकीच्या साडीचं बटरफ्लाय नेट फॅब्रिक यामुळे माधुरीने नेसलेल्या या साडीला खरोखरंच एक राॅयल लूक आला आहे. साडीच्या काठांना गोटा पट्टी बॉर्डर असून त्यावर गुलाबी, नारंगी, जांभळ्या, हिरव्या आणि पिवळ्या रंगात मिररवर्क mirror आणि सिक्विन वर्क sequin केलेलं आहे. माधुरीने या साडीवर गोटापट्टीचं एम्ब्राॅयडरी केलेलं ब्लाऊज घातलं आहे.
वेलवेटच्या साड्यांचा स्टायलिश ट्रेंड... stylish trend of velvet saree
- सध्या लग्नसराईमध्ये वेलवेटची साडी आणि वेलवेट लेहेंगा यांचा जबरदस्त ट्रेण्ड सुरू आहे...
- शिमर प्रकारच्या ग्लिटरी साड्या आणि त्यावर वर्क केलेलं वेलवेटचं ब्लाऊज हा प्रकारही सध्या चांगलाच गाजतो आहे. अशा प्रकारच्या साड्यांमध्ये एकदम पार्टीवेअर लूक मिळत असून रात्रीच्या एखाद्या समारंभासाठी अशा साड्यांना विशेष मागणी आहे... ३ ते साडेतीन हजारांपासून अशा प्रकारच्या डिझायनर साड्या बाजारात उपलब्ध आहेत...
- वेलवेट साडीच्या दुसऱ्या प्रकारात सिल्कची साडी आणि पदर फक्त वेलवेटचा असा प्रकारही पाहायला मिळतो आहे... या साड्यांची किंमतही साधारण दोन ते अडीच हजारांच्या पुढे आहे...
- लेहेंगा प्रकारात वेलवेटचं ब्लाऊज आणि सिल्क लेहेंगा असं कॉम्बिनेशन बघायला मिळतं. लेहेंगा आणि ब्लाऊजवर कसं वर्क केलेलं आहे, यावरून त्याची किंमत ठरते.. साधारण २ हजार रूपयांच्या पुढे असे लेहेंगे मिळत आहेत.
- पुर्ण वेलवेटची प्लेन साडी आणि त्यावर हेवी वर्क असणारं डिझायनर ब्लाऊज असा प्रकारही या साड्यांमध्ये उपलब्ध आहे. दोन ते अडीच हजारांच्या पुढे या साड्या उपलब्ध आहेत.