सेलिब्रिटी आणि त्यांचे महागडे कपडे, हा विषय सोशल मिडियावर नेहमीच ट्रेण्डिंग असतो. त्यात अभिनेत्यांपेक्षाही अभिनेत्रींचे कपडे आणि दागदागिने यांची नेहमीच चर्चा होत असते. आता सध्या मलायकाचा ( Malaika Arora's white gown) असाच एक फोटो व्हायरल झाला असून त्यामध्ये तिने जो गाऊन घातला आहे, तो सध्या महिला आणि तरुणींमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरतो आहे. तिच्या त्या पांढऱ्या शुभ्र गाऊनची किंमत तब्बल ३ लाख (worth Rs. 3 Lacs) रुपये असून त्यात एवढं काय खास आहे किंवा त्याची नजाकत नेमकी काय, हे शोधण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे.
कसा होता मलायकाचा लूक?
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या एका ग्रॅण्ड पार्टीसाठी मलायकाने हा पार्टीवेअर ड्रेस घातला होता.
या चमकदार पांढऱ्या गाऊनवर मलायकाने बोल्ड रेड लिपस्टिक लावली होती. शिवाय केसांचं टेक्स्चरही वेटेड- ऑईली या पद्धतीचं होतं. नखांना डार्क मरून नेलपेंट आणि हातात गोल्डन रंगाचं क्लचर ... अशा सगळ्याच गेटअपमुळे ती अतिशय ग्रेसफूल दिसत होती, यात वादच नाही.
मलायकाच्या गाऊनची खासियत
चमकदार, ग्लॉसी पांढऱ्या रंगाच्या या गाऊनला वेगवेगळ्या लेअर्स होत्या. त्यामुळे तो अतिशय फुगीर झाला होता.
सारखी अंगदुखी, मसल्स पेनमुळे वैतागलात? ५ पदार्थ नियमित खा, स्नायूंचा थकवा कमी होईल
तिचा हा ऑफ द शोल्डर गाऊन रचेल गिलबर्ट (Rachel Gilbert) यांच्या कलेक्शनमधला असून त्याला रिकार्डो गाऊन (Riccardo Gown) असं म्हणतात, असा उल्लेख शॉपिंग साईटवर करण्यात आला आहे. भारतीय चलनात सांगायचं झाल्यास या गाऊनची किंमत तब्बल ३, ७९, ४९७ रुपये एवढी आहे.