Join us  

मृणाल ठाकूरची ६० हजारांची साडी, त्यावर पाहा सुंदर जास्मिन एम्ब्रॉयडरी! नजकतीची बघा खासियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2022 1:12 PM

Mrunal Thakur's viral look: मृणाल ठाकूरचा ग्रेस आणि तिची स्टाईल हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. म्हणूनच तर आता पुन्हा एकदा तिच्या साडीच्या निमित्ताने ही चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

ठळक मुद्देया साडीला २ काठ आहेत. वरचे काठ आकाराने थोडे मोठे असून ते जास्मिन एम्ब्रॉयडरी या प्रकारातले आहेत. त्याच्याखाली थोडी जागा आहे आणि त्यानंतर पुन्हा साडीची एक बारीक बॉर्डर आहे.

बॉलीवूडच्या काही अभिनेत्री खरोखरंच अशा असतात की त्यांची हेअरस्टाईल, ड्रेसिंग स्टाईल आणि त्यांच्यातला चार्म अनेकांना आवडून जातो. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच झळाळी मिळते. अभिनेत्री मृणाल ठाकूरचंही (Actress Mrunal Thakur) अगदी तसंच आहे. एथनिक कपडे असो किंवा मग वेस्टर्न. तिचा चॉईस आणि ते कपडे कॅरी करण्याची तिची स्टाईल या दोन्हीही गोष्टी बऱ्याचदा फॅशन वर्ल्डमध्ये हिट ठरतात. आता नुकताच तिचा एक साडी लूक (Organza saree with jasmine border) व्हायरल झाला असून तो तिच्या चाहत्यांना, विशेषत: तिच्या महिला चाहत्यांना भारीच आवडला आहे..

 

मृणालचा ऑर्गेंजा साडी लूकअनेक हिंदी, मराठी मालिकांमधून नाव कमावल्यानंतर बॉलीवूडमध्येही स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या मृणालने तिचे काही फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

गणपतीसाठी पूजा साहित्याच्या वस्तू, ऑनलाईन स्वस्त आणि मस्त; खरेदीसाठी पाहा आकर्षक पर्याय 

यामध्ये तिने मोतिया रंगाची ऑर्गेंजा सिल्क या प्रकारातली साडी नेसली असून तिचा हा लूक अतिशय स्टनिंग आहे. silk organza double border असं तिच्या साडीचं वर्णन करण्यात आलं आहे. त्यावरूनच लक्षात येतं की या साडीला २ काठ आहेत. वरचे काठ आकाराने थोडे मोठे असून ते जास्मिन एम्ब्रॉयडरी या प्रकारातले आहेत. त्याच्याखाली थोडी जागा आहे आणि त्यानंतर पुन्हा साडीची एक बारीक बॉर्डर आहे. या दोन्ही बॉर्डर एम्ब्रॉयडरी प्रकारातल्याच आहेत.

 

जास्मिन एम्ब्रॉयडरी म्हणजे काय (jasmine embroidery)आपल्याला माहितीच आहे की एम्ब्रॉयडरीचे काम हे दोऱ्याने विणून केले जाते. या विणकामाचे धागे आपण ज्या पद्धतीने विणत जातो, त्याप्रकारे ती एम्ब्रॉयडरी ओळखली जाते.

फक्त १० रुपयांत आणि १० मिनिटांत मिळेल उजळ- चमकदार त्वचा, करा शुगर स्क्रबचा जादुई उपाय

त्यामुळे एम्ब्रॉयडरीचे जे अनेक प्रकार आहेत, त्यापैकीच एक आहे जास्मिन एम्ब्रॉयडरी. जास्मिन एम्ब्रॉयडरी प्रकारात जास्मिन किंवा चमेलीच्या फुलासारखे नाजूक फूल विणले जाते. या फुलाची विण भरगच्च असते तसेच हे विणकाम पांढरा, मोती, ऑफव्हाईट या रंगातच जास्त आढळून येते. मृणालने नेसलेली ही साडी तोराणी यांच्या कलेक्शनमधली असून साडीची किंमत तब्बल ६० हजारापर्यंत असल्याचे समजते. 

 

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्समृणाल ठाकूर