Join us  

परिणीती चोप्रानं लग्नात घातलेलं हिऱ्यांचं देखणं 'आयरा' नेकलेस केवढ्याचं असेल? महागड्या दागिन्याची न्यारी गोष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2023 5:58 PM

Parineeti Chopra's Uncut Diamond Necklace: अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने तिच्या लग्नात घातलेलं नेकलेस पाहून अनेकांच्या नजरा त्यावरच खिळल्या होत्या.. बघा नेकलेसचा हा प्रकार नेमका कोणता होता....

ठळक मुद्देया नेकलेससाठी मनिष मल्होत्रा यांनी खास ऑम्ब्रे थीम वापरली होती.

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा (Parineeti Chopra and Raghav Chadhha) यांचा शाही लग्नसोहळा नुकताच पार पडला. सेलिब्रिटी आणि राजकारणातील दिग्गज या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. परिणीतीचा लेहेंगा, राघवचा हॅण्डसम लूक, लग्न स्थळावरची सगळी सजावट एकदम शाही असल्याने तिथली प्रत्येक गोष्ट पाहण्यासारखीच होती. पण असे असूनही सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या ते परिणीतीने घातलेल्या हेवी नेकलेसवर. तिचं ते हिरव्या, मोतीया रंगाचं गळ्याशी भरगच्च असणारं ३- ४ पदरी नेकलेस पाहताक्षणीच अनेकांना आवडलं (Parineeti Chopra's expensive and heavy necklace). म्हणूनच बघा तिच्या त्या नेकलेसचा नेमका प्रकार होता तरी कसा....

 

परिणीती चोप्राचं भरगच्च नेकलेसआता परिणीतीने घातलेलं ते नेकलेस नेमकं किती रुपयांचं होतं, हे काही अजून समजलं नाही. पण ते अतिशय महागड्या असणाऱ्या रशियन जाम्बिया अनकट डायमंड प्रकारातलं होतं.

झाडं भराभर वाढतात पण फुलंच येत नाहीत? स्वयंपाक घरातले ५ पदार्थ वापरा- बागेत पडेल फुलांचा सडा....

पन्ना किंवा पाचू हे रत्न वापरून सेलिब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी खास परिणीतीसाठी ते डिझाईन केलं होतं. 'आयरा' नेकलेस असं त्याचं नाव असून त्याच्यासोबत मॅच करणारा मांग टिका, २ बांगड्या आणि कानातले असं सगळंच डिझाईन मनिष मल्होत्रा यांचं होतं. 

 

या नेकलेससाठी मनिष मल्होत्रा यांनी खास ऑम्ब्रे थीम वापरली होती. ही थीम साधारणपणे कपड्यांमध्ये दिसून येते.

करिश्मा कपूरची ७० हजारांची बनारसी साडी, गर्भरेशमी साडीवर सिक्विन वर्क, अशी साडी सुरेख बाई..

मध्यंतरी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात आलियाने नेसलेल्या साड्या ऑम्ब्रे थीम प्रकारातल्या हाेत्या आणि त्या देखील मनिष मल्होत्रा यांनीच डिझाईन केलेल्या होत्या. ऑम्ब्रे थीममध्ये २ ते ३ रंग वापरले जातात. एक मुळ रंग तसाच ठेवून त्यांच्या अनेक शेड्स तयार केल्या जातात. परिणितीच्या गळ्यातल्याच्या हिऱ्याचा मुळ रंग हिरवा असून हिरवा ते पांढरा या मार्गाने जाणाऱ्या २ ते ३ शेड्स तिच्या नेकलेसमध्ये दिसून येतात. 

 

टॅग्स :फॅशनपरिणीती चोप्रालग्नदागिने