Lokmat Sakhi >Fashion > लिनन साडीला सोनेरी जर! बघा पुजा हेगडेची ४० हजारांची गोल्डन साडी, का एवढी महाग? 

लिनन साडीला सोनेरी जर! बघा पुजा हेगडेची ४० हजारांची गोल्डन साडी, का एवढी महाग? 

Pooja Hegde's Linen Saree: अभिनेत्री पुजा हेगडे हिचे सोनेरी साडीतले फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल (social viral) झाले आहेत... वाचा तिच्या या चमचमत्या साडीची खासियत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 06:35 PM2022-06-02T18:35:54+5:302022-06-02T18:36:43+5:30

Pooja Hegde's Linen Saree: अभिनेत्री पुजा हेगडे हिचे सोनेरी साडीतले फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल (social viral) झाले आहेत... वाचा तिच्या या चमचमत्या साडीची खासियत.

Actress Pooja Hegde's linen saree with golden zari worth Rs. 40K | लिनन साडीला सोनेरी जर! बघा पुजा हेगडेची ४० हजारांची गोल्डन साडी, का एवढी महाग? 

लिनन साडीला सोनेरी जर! बघा पुजा हेगडेची ४० हजारांची गोल्डन साडी, का एवढी महाग? 

Highlightsकमी किमतीत आपल्या बजेटमधे अशा गोल्डन शेडच्या साड्या अगदी सहज मिळू शकतात. 

अभिनेत्री पुजा हेगडे हिचा एकंदरीतच फॅशन सेन्स (fashion tips) जबरदस्त आहे. त्यामुळेच तर तिच्या कपड्यांची, तिच्या स्टाईलची नेहमीच चर्चा होत असते.. एथनिक लूक जेवढा सहजतेने ती कॅरी करते, तेवढ्याच सुंदर पद्धतीची  तिची वेस्टर्न स्टाईल असते. म्हणूनच तर फॅशनच्या बाबतीत तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या चांगलीच मोठी  आहे. आता सध्याही तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर (instagram share) केले असून या फोटोंची चांगलीच चर्चा  होत आहे.. 

 

या फोटोमध्ये पुजाने गोल्डन रंगाची (golden saree) अतिशय सुंदर अशी लिनन साडी नेसली आहे. या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात गोल्डन रंगाच्या जरीचा वापर करण्यात आला आहे. साेनेरी रंगाची फिकट आणि गडद- मेटॅलिक अशा दोन्ही शेड असणारी ही साडी तब्बल ४० हजार रुपयांची आहे. Anavila या ब्रॅण्डने ही साडी डिझाईन केली आहे. एरवी ज्या प्युअर लिनन साड्या आपण पाहतो, तेव्हा त्यात जरीचा वापर केलेला नसतो. पण पुजाच्या साडीमध्ये लिनन आणि सिल्कच्या सोनेरी जरीचा (linen saree with silk zari) वापर असल्याने या साडीची किंमत एवढी जास्त आहे.

 

लिनन साडीचे वैशिष्ट्य (speciality of linen saree)
- लिनन साड्यांची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे तिचं वजन. या साड्या इतक्या लाईटवेट असतात की नेसायला आणि कॅरी करायला अतिशय सोप्या जातात. त्यामुळे ऑफिसमध्येही अनेक जणी सध्या प्युअर लिनन साड्या नेसण्यास प्राधान्य देतात. शिवाय या साडीमुळे तुम्हाला परफेक्ट फॉर्मल लूक मिळतो.
- लिनन साडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या साड्या अजिबात टोचणाऱ्या नसतात. कार त्या अतिशय तलम, मुलायम धाग्यांपासून तयार केल्या जातात. त्यामुळेच उन्हाळ्यात एखादे लग्नकार्य असेल तर रिच लूक देणाऱ्या पण वजनाला हलक्या आणि मुलायम अशा लिनन सिल्क साडीला प्राधान्य दिले जाते.
- लिनन साडीचं वजन जेवढं कमी, तेवढा तिचा मऊपणा अधिक असतो आणि तेवढीच तिची किंमत पण वाढत जाते. म्हणूनच तर पुजाची साडी तब्बल ४० हजारांची आहे.

 

सोनेरी रंगाचा ट्रेण्ड कायमच इन असतो. त्यात आता लग्नसराई सुरु आहे म्हटल्यावर या रंगाला तर विशेष मागणी असतेच.. त्यामुळे लग्नासाठी जर साडी खरेदी करायची असेल, तर पुजासारख्या या गोल्डन साडीचा विचार नक्कीच करू शकता. तिच्यासारखी साडी घ्यायची म्हणजे ४०- ५० हजार खर्च करायचे, असं मुळीच नाही. कमी किमतीत आपल्या बजेटमधे अशा गोल्डन शेडच्या साड्या अगदी सहज मिळू शकतात. 

 

Web Title: Actress Pooja Hegde's linen saree with golden zari worth Rs. 40K

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.