'पुष्पा' या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने कमी कालावधीत आपलं स्थान निर्माण केलं. सौंदर्य आणि अभिनय या दोन्हीच्या जोरावर रश्मिकाने साऊथ चित्रपटात तर बाजी मारलीच आहे. पुष्पा चित्रपटानंतर तिचं स्टारडम प्रचंड वाढलं असून तिच्या लूक्सची, तिच्या चित्रपटांची आणि तिच्याविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा सोशल मिडियावर नेहमीच रंगलेली असते. नुकतेच रश्मिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले असून त्यामध्ये तिने केलेला ट्रॅडीशनल लूक चाहत्यांचे लक्ष वेधणारा ठरत आहे (Actress Rashmika Mandana Red Ghagra Photos).
लाल रंगाच्या घागऱ्यामध्ये रश्मिकाने काही फोटो पोस्ट केले असून त्यामध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे. रश्मिकाचे फॅन फॉलोइंग खूप मोठे असून यामध्ये तरुणांबरोबरच तरुणींचाही समावेश आहे. रश्मिकाचा हा ड्रेस आणि तिचा लूक दोन्हीही खूपच हॉट असून तिच्या चाहत्यांना तो चांगलाच आवडला आहे. रश्मिकाने घातलेल्या या लाल रंगाच्या घागऱ्याची किंमत ऐकून आपल्याला नक्कीच थक्क व्हायला होऊ शकते. याचे कारण म्हणजे मिश्रू ब्रँडचा असलेला हा घआगरा थोडाथोडका नाही तर तब्बल ४ लाख ४५ हजार रुपयांचा आहे. आता त्याची किंमत इतकी जास्त का आहे हा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो.
भरगच्च एम्ब्रॉडरी वर्क असलेल्या या घागऱ्यावर फुलांची डीझाईन असून बऱ्याच ठिकाणी मिरर वर्कही केलेले आहे. याचे ब्लाऊज स्ट्रीपचे असून ओढणीही त्याच लाल रंगाची आहे. रश्मिकाने आठवड्याभरासाठी कामातून ब्रेक घेतला होता आणि आता ती पुन्हा काम करण्यास सज्ज झाली आहे असे तिच्या या पोस्टवरुन दिसते. याचे कारण म्हणजे तिने या पोस्टला कॅप्शन देताना हळूहळू कामाला सुरुवात करुया असे म्हटले आहे. भरपूर घेर असलेल्या या घागऱ्यावर रश्मिकाने हातात बांगड्या आणि कानातले घातले असून यावर तिने एक छानशी टिकलीही लावली आहे. कुरळ्या केसांमध्ये खूप जास्त मेकअप न करताही रश्मिका या कपड्यांमध्ये उठून दिसत आहे. एका दिवसांत रश्मिकाच्या पोस्टला ३१ लाखांहून जास्त लाईक्स आले आहेत.