Lokmat Sakhi >Fashion > चमचमता घागरा घालून रश्मिका मंदाना म्हणतेय "मी गोल्डन गर्ल...." - चमकिल्या घागऱ्यातला रश्मिकाचा खास लूक

चमचमता घागरा घालून रश्मिका मंदाना म्हणतेय "मी गोल्डन गर्ल...." - चमकिल्या घागऱ्यातला रश्मिकाचा खास लूक

Rashmika Mandanna's Golden Look: रश्मिका मंदानाचा गोल्डन लूक सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल (social viral) झाला आहे, बघा कसा दिसतो आहे तिचा चमचमत्या घागऱ्यातला ग्लिटरी लूक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 07:23 PM2022-09-27T19:23:25+5:302022-09-27T19:24:03+5:30

Rashmika Mandanna's Golden Look: रश्मिका मंदानाचा गोल्डन लूक सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल (social viral) झाला आहे, बघा कसा दिसतो आहे तिचा चमचमत्या घागऱ्यातला ग्लिटरी लूक..

Actress Rashmika Mandanna says she is a golden girl... look at her golden, glittery and shimmery ghagara/ Lehenga | चमचमता घागरा घालून रश्मिका मंदाना म्हणतेय "मी गोल्डन गर्ल...." - चमकिल्या घागऱ्यातला रश्मिकाचा खास लूक

चमचमता घागरा घालून रश्मिका मंदाना म्हणतेय "मी गोल्डन गर्ल...." - चमकिल्या घागऱ्यातला रश्मिकाचा खास लूक

Highlightsतिचा हा ड्रेस डिझायनर सावन गांधी यांच्या कलेक्शनमधला असून तिच्या स्टायलिस्ट म्हणून सेलिब्रिटी स्टायलिस्ट लक्ष्मी लेहर यांनी काम पाहिले आहे. 

पुष्पा स्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या जबरदस्त ट्रेण्डिंग आहे. पुष्पा चित्रपटानंतर तिचं स्टारडम प्रचंड वाढलं असून तिच्या लूक्सची, तिच्या चित्रपटांची आणि तिच्याविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा सोशल मिडियावर नेहमीच रंगलेली असते. आता सध्या रश्मिकाचा असाच एक गोल्डन लूक (Rashmika Mandanna's Golden Look) सोशल मिडियावर गाजतो आहे. तिचा हा ड्रेस आणि तिचा लूक दोन्हीही खूपच हॉट असून तिच्या चाहत्यांना तो चांगलाच आवडला आहे.

 

'Goodbye' या तिच्या टीव्ही शो च्या प्रमोशनसाठी तिने हा लेहेंगा घातला होता. त्यादरम्यान झालेल्या फोटोशूटचे काही प्रकार रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले असून "Today I am the golden girl 😄How cool..." असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

चॉकलेटची भजी खायची? ती ही हिरव्या तिखट चटणीसोबत!! बघा भलताच पदार्थ, व्हायरल व्हिडिओ

तसंच तिच्या चाहत्यांना हा ड्रेस किंवा तिचा हा लूक आवडला की नाही? असा प्रश्नही ती विचारते आहे. तिचा हा ड्रेस डिझायनर सावन गांधी यांच्या कलेक्शनमधला असून तिच्या स्टायलिस्ट म्हणून सेलिब्रिटी स्टायलिस्ट लक्ष्मी लेहर यांनी काम पाहिले आहे. 

 

कसा आहे रश्मिकाचा ड्रेस?
आधीच सांगितल्याप्रमाणे रश्मिकाचा हा ड्रेस ब्लॅकीश गोल्डन या रंगात मोडणारा घागरा आहे. ब्लाउज, घागरा आणि त्यावरची ओढणी हे सगळं मोनोटोनस म्हणजेच एकाच रंगातलं असून त्या सगळ्यांवरच सिक्विन वर्क केलेलं आहे.

नवरात्र स्पेशल व्यायाम: रोज करा फक्त ५ मिनिटे फेस योगा, चेहरा दिसेल कायम तरुण- सतेज

ब्लाऊज स्लिव्हलेस असून त्याचा गळा डिप स्क्वेअर कट या प्रकारात मोडणारा आहे. स्कर्टदेखील अतिशय घेरदार असून तो ही पुर्णपणे चमचमता आहे. घागऱ्याची ओढणी शिफॉन प्रकारातली असून त्यावर क्रिस- क्रॉस या प्रकारात सिक्विन्स लावण्यात आले आहे. तसेच ओढणीला गोटा पट्टी बॉर्डर आहे. यावर तिने शिमरी ग्लॉसी मेकअप केला असून कानातले झुमकेही गोल्डन रंगातले आहेत. 

 

Web Title: Actress Rashmika Mandanna says she is a golden girl... look at her golden, glittery and shimmery ghagara/ Lehenga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.