Lokmat Sakhi >Fashion > बाप रे बाप! समंथा प्रभुच्या पर्सची किंमत तब्बल २.५ लाख, पाहा या लाखमोलाच्या पर्सची खासियत...

बाप रे बाप! समंथा प्रभुच्या पर्सची किंमत तब्बल २.५ लाख, पाहा या लाखमोलाच्या पर्सची खासियत...

Samantha Prabhu's Stylish Handbag Costs Rs. 2 lakh: सेलिब्रिटींचे कपडे- ॲक्सेसरीज आणि त्यांची किंमत या गोष्टींची नेहमीच चर्चा होत असते. आताही अशीच गाजतेय अभिनेत्री समंथा प्रभुची अडीच लाखांची पर्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2023 06:49 PM2023-01-07T18:49:54+5:302023-01-07T18:57:14+5:30

Samantha Prabhu's Stylish Handbag Costs Rs. 2 lakh: सेलिब्रिटींचे कपडे- ॲक्सेसरीज आणि त्यांची किंमत या गोष्टींची नेहमीच चर्चा होत असते. आताही अशीच गाजतेय अभिनेत्री समंथा प्रभुची अडीच लाखांची पर्स..

Actress Samantha ruth Prabhu's stylish handbag costs Rs. 2 lakh, What is the speciality of this costly bag? | बाप रे बाप! समंथा प्रभुच्या पर्सची किंमत तब्बल २.५ लाख, पाहा या लाखमोलाच्या पर्सची खासियत...

बाप रे बाप! समंथा प्रभुच्या पर्सची किंमत तब्बल २.५ लाख, पाहा या लाखमोलाच्या पर्सची खासियत...

Highlightsसध्या चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री समंथा प्रभु हिच्या महागड्या पर्सची. कारण तिची ही पर्स थोडी- थोडकी नाही तर तब्बल अडीच लाखांची आहे. 

बडे लोग- बडी बाते... हे वाक्य बॉलीवूड सेलिब्रिटींच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू होणारं आहे. कारण या लोकांचे दैनंदिन खर्चच एवढे जास्त असतात की आपण त्याचा अंदाजही लावू शकत नाही. आता त्यांच्या लाईफस्टाईलचा किंवा कामाचा एक भाग म्हणून या लोकांना त्यांच्या राहण्यावर, त्यांच्या दिसण्यावर विशेष लक्ष द्यावंच लागतं. त्यामुळे अर्थातच त्यांना त्यांच्या लाईफस्टाईलवर भरपूर पैसेही खर्च करावे लागतात. म्हणूनच तर सेलिब्रिटींच्या महागड्या कपड्यांची, फुटवेअरची, त्यांच्या दागदागिन्यांच्या किंमतीची नेहमीच चर्चा होत असते. आता सध्या चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री समंथा प्रभु (Samantha Prabhu's handbag costs Rs. 2 lakh) हिच्या महागड्या पर्सची. 

स्टाईल आणि फॅशन या बाबतीत बॉलीवूडच्या ज्या काही अभिनेत्रींची नेहमीच चर्चा होत असते, त्यापैकी एक नाव म्हणजे समंथा प्रभु. तिचा स्टायलिश लूक हा नेहमीच गाजणारा विषय.

५ नॅचरल ॲण्टीएजिंग पदार्थ! नियमित खा, त्वचा राहील चमकदार- सुंदर, विकतच्या क्रिमची गरजच नाही

आता सध्याही तिच्या लूकची तर चर्चा आहेच, पण सगळ्यात जास्त भाव खाऊन गेली आहे ती समंथाची पर्स. कारण तिची ही पर्स थोडी- थोडकी नाही तर तब्बल अडीच लाखांची आहे. 

 

कशी आहे समंथाची पर्स?
इंडिया टुडे यांनी दिलेल्या वृत्तानुसार समंथा शुक्रवारी सकाळी मुंबई विमानतळावर दिसून आली. यावेळी ती शुभ्र चमकदार पांढऱ्या कपड्यांत होती.

ब्राऊन राईस डोसा, फिटनेस फ्रिक असाल तर असा डोसा खा- तब्येतीची पुरेपूर काळजी, बघा सोपी रेसिपी

डोळ्यांवर स्टायलिश गॉगल होता आणि हातात चॉकलेटी रंगाची मोठी हॅण्डबॅग होती. लेदर प्रकारातल्या या हॅण्डबॅगवर वेगवेगळे प्रिंट्स होते आणि अर्थातच ती अतिशय क्लासी दिसत होती. मिळालेल्या माहितीनुसार ही बॅग OnTheGo MM Louis Vuitton या ब्रॅण्डची असून बॅगची किंमत $3,100 म्हणजेच भारतीय चलनानुसार तब्बल २ लाख ५६ हजार ४३१ रुपये असल्याचे सांगितले जाते.  

 

Web Title: Actress Samantha ruth Prabhu's stylish handbag costs Rs. 2 lakh, What is the speciality of this costly bag?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.