बॉलीवूडमध्ये वर्षाकाठी कित्येक सिनेमे येतात आणि जातात. पण त्यातले मोजकेच प्रेक्षकांच्या कामय स्मरणात राहतात. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ऐश्वर्या राय आणि ऋतिक रोशन यांच्या प्रमुख भूमिका असणारा 'जोधा अकब'र हा चित्रपट. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील सेट, ऋतिक आणि ऐश्वर्याचे जोधा- अकबरच्या थाटातले कपडे, दागिने हे सगळंच बघण्यासारखं होतं. कमीतकमी मेकअप करून दागिने व कपड्यांवर दिलेला जास्तीतजास्त भर हे त्या चित्रपटातील ऐश्वर्याच्या व्यक्तिरेखेचं वैशिष्ट्य ठरलं. तिने आणि ऋतिकने घातलेले ते दागिने काही साधेसुधे नव्हते. दोघांचे एकत्रित दागिने तब्बल ४०० किलो वजनाचे होते.(aishwarya rai wore 200 kg real gold jewellery in jodha akbar)
चित्रपटातील कथेच्या गरजेनुसार ऐश्वर्या आणि ऋतिक यांचे दागिने मुघलकालीन असायला पाहिजे हाेते. तसेच ते एखाद्या राजा-राणीचे दागिने वाटायला पाहिजेत त्यामुळे ते कित्येक महागडी रत्नं वापरून तयार करण्यात आले होते.
केस गळणं ८ दिवसांत कमी होईल- लसूणाचा करा खास उपयोग, केस होतील दाट- वाढतील भराभर
त्यांना अधिक रिअलिस्टिक टच देण्यासाठी ते दागिने सोनं वापरून घडविण्यात आले होते, असं बॉलीवूडशादीमध्ये सांगितलं आहे. 'जाेधा अकबर' चित्रपटाच्या कॉस्च्युम डिझायनर नीता लुल्ला यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की चित्रपटात जोधाबाईच्या लग्नाचा जो सीन आहे, त्यामध्ये ऐश्वर्याच्या गळ्यात जो मोठा हार होता तो साडेतीन किलोपेक्षाही जास्त वजनाचा होता. इतर दागिन्यांचं वजन तर आणखी वेगळं.
शिवाय प्रत्येक सीनमध्येच ऐश्वर्या महागड्या दागिन्यांनी नखशिखांत नटलेली होती. त्यामुळे या महागड्या दागिन्यांच्या संरक्षणासाठी जवळपास ५० बॉडीगार्ड तिच्या आसपास सदैव असायचे.
सकाळी जोर लावूनही पोट साफ होत नाही, दिवसांतून २- ३ वेळा जाता? ५ पदार्थ खा- त्रास कमी होईल
या चित्रपटाच्या निमित्ताने ऐश्वर्याला किती छान दागिने आणि कपडे घालायला मिळाले, असं अनेकांना वाटतं. ते खरंही आहे. पण एवढे महागडे, वजनदार दागिने अंगावर घेऊन वावरणं, शिवाय ते कोठे गहाळ हाेणार नाहीत ना याचं दडपण आणि शिवाय दागिन्यांच्या संरक्षणासाठी आजुबाजुला तैनात असणारे बॉडीगार्ड हे सगळं सांभाळत शुटिंग करणं काही चेष्टा नाही..