Lokmat Sakhi >Fashion > २.५ लाखांची सुंदर साडी नेसूनही आलिया भट झाली ट्रोल, तिची वेणी पाहून नेटिझन्स म्हणाले...... 

२.५ लाखांची सुंदर साडी नेसूनही आलिया भट झाली ट्रोल, तिची वेणी पाहून नेटिझन्स म्हणाले...... 

Alia Bhat's 2.5 Lakhs Organza Silk Saree: आलिया भट तिच्या हेअरस्टाईलमुळे सध्या खूप जास्त ट्रोल होत असून तिच्या फोटोंवर खूप मजेशीर कमेंटही आल्या आहेत... (Alia Bhat is getting trolled because of her braid hairstyle)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2023 11:16 AM2023-12-18T11:16:06+5:302023-12-18T15:21:13+5:30

Alia Bhat's 2.5 Lakhs Organza Silk Saree: आलिया भट तिच्या हेअरस्टाईलमुळे सध्या खूप जास्त ट्रोल होत असून तिच्या फोटोंवर खूप मजेशीर कमेंटही आल्या आहेत... (Alia Bhat is getting trolled because of her braid hairstyle)

Alia Bhat's 2.5 lakhs organza silk saree is having applique work, but she is getting trolled because of her braid hairstyle, Speciality of Alia Bhat's yellow saree | २.५ लाखांची सुंदर साडी नेसूनही आलिया भट झाली ट्रोल, तिची वेणी पाहून नेटिझन्स म्हणाले...... 

२.५ लाखांची सुंदर साडी नेसूनही आलिया भट झाली ट्रोल, तिची वेणी पाहून नेटिझन्स म्हणाले...... 

Highlightsआलियाने नेसलेली अडीच लाखांची पिवळ्या रंगाची साडी Anavila या ब्रॅण्डची आहे. ऑर्गेंझा सिल्क प्रकारातली ही साडी applique साडी म्हणून ओळखली जाते.

आलिया भट नेहमीच तिच्या क्लासी लूक्स आणि चॉईस या दोन्ही गोष्टींमुळे ओळखली जाते. तिच्या फॅशन स्टाईलचं नेहमीच कौतूकही होतं. पण कधीतरी काहीतरी हुकतं आणि तिच्या चाहत्यांना ते अजिबात आवडत नाही. आता हेच पाहा ना, आलियाने तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी तब्बल अडीच लाखांची सुंदर ऑर्गेंझा साडी नेसली (Alia Bhat's 2.5 lakhs organza silk saree is having applique work). या साडीवर applique प्रकारातलं वर्क करण्यात आहे. तिच्या या सगळ्या गोष्टी तिच्या चाहत्यांना आवडल्या पण तिच्या वेणीमुळे सगळी गडबड झाली आणि त्यामुळेच ती सध्या खूप जास्त ट्रोल होत आहे. (Alia Bhat is getting trolled because of her braid hairstyle)

 

आलियाची हेअरस्टाईल

तिने जी काही हेअरस्टाईल केली आहे त्याला braid hairstyle असं म्हणतात. यामध्ये तिने मधोमध भांग पाडला आहे आणि दोन्ही बाजूने समोरच्या केसांच्या दोन वेण्या घातल्या आहेत.

कोणतं कॉस्मेटिक्स किती दिवस वापरायचं? तुम्हीही प्रॉडक्टची Expiry Date आणि Shelf Life यात गल्लत करता का?

या दोन्ही वेण्या मागच्या बाजुने एकत्र करून त्याची एक वेणी घातली आणि त्याला लेस गुंडाळली. आलियाचे केस छोटे असल्याने तिने जे काही केलंय ते अनेकांना आवडलेलं नाही. आलियाची ही वेणी पाहून आम्हाला शाळेत रिबिन लावलेल्या वेणीची आठवण आली असं एकीने लिहिलं आहे तर Seeing the sari it was a woowwwww. And the braid was like jaaaaooooo.. अशा प्रकारच्या कमेंट करून तिला ट्रोल केलं जात आहे. 

 

कसं आहे साडीवरचं applique वर्क?

आलियाने नेसलेली अडीच लाखांची पिवळ्या रंगाची साडी Anavila या ब्रॅण्डची आहे. ऑर्गेंझा सिल्क प्रकारातली ही साडी applique साडी म्हणून ओळखली जाते. applique वर्क या प्रकारात कपड्यावर नीडल वर्क केलं जातं.

झाडं खूपच सुकली- फ्रेश टवटवीत दिसेना? घ्या १ चमचा बेकिंग सोडा- बघा कसं पालटून जाईल झाडांचं रूप

वेगवेगळे आकार आधी नीडल वर्क करून तयार केले जातात आणि नंतर ते पॅचवर्क करून साडीला जोडले जातात. आलियाच्या साडीवर अशाच प्रकारचं वर्क करण्यात आलं असून त्यावर मोती, कुंदन लावून ते अधिक सजविण्यात आलं आहे. 

 

Web Title: Alia Bhat's 2.5 lakhs organza silk saree is having applique work, but she is getting trolled because of her braid hairstyle, Speciality of Alia Bhat's yellow saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.