रणबीर कपूरचा ॲनिमल हा चित्रपट सुपर- डुपर हिट झाला. या चित्रपटाने यशाचे सर्व रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत. देशभर या चित्रपटाची भरपूर चर्चाही झाली. चित्रपटाला मिळालेल्या या भव्य यशामुळेच नुकतेच एका सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जुहू हॉटेलमध्ये झालेल्या या पार्टीत रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर यांच्यासोबत ॲनिमल चित्रपटाची संपूर्ण टीम तर होतीच पण आलिया भट, नीतू कपूर, महेश भट यांचीही उपस्थिती होती. पण या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती आलिया भटची, तिच्या ग्लॅमरस लूकची आणि तिने घातलेल्या महागड्या ड्रेसची. (Alia Bhat's blue satin long midi dress in Animal's success party was worth Rs. 1.5 lakh)
फॅशन आणि स्टाईल याबाबतीत आलिया नेहमीच एक पाऊल पुढे असते. त्यामुळे कधी कधी तिचे कपडे अगदी ६- ७ हजारांचे असतात, जे उच्च मध्यमवर्गीय वर्गात येणाऱ्या लोकांना घेता येतात. तर कधी कधी लाखो रुपयांचे असतात.
संक्रांतीसाठी तिळगुळाची स्वस्तात खरेदी करायची? बघा ऑनलाईन शॉपिंग साईटवरच्या धमाकेदार ऑफर्स
आता या पार्टीत आलियाने चमकदार निळ्या रंगाचा लाँग मिडी ड्रेस घातला होता. तिच्या या ड्रेसची किंमत तब्बल दिड लाख रुपये एवढी होती. luxury designer Rasario या ब्रॅण्डचा सॅटीन कपड्याचा तो ड्रेस होता.
१८२० डॉलर्स एवढी त्या ड्रेसची किंमत आहे. आपल्या चलनानुसार त्याची किंमत तब्बल १ लाख ५१ हजार ४०८ रुपये एवढी होते. डिप व्ही राऊंड नेक असणारा तो ड्रेस आलियाला खूपच हॉट- ग्लॅमरस लूक देणारा ठरला.
लोखंडी तव्यावर पोळी भाजताना जळते? ४ चुका टाळा- पोळ्या करपणार नाही- छान फुलतील
आलियाने त्या ड्रेसला मॅच करण्यासाठी केसांचा सैलसर पोनीटेल घातला होता आणि चेहऱ्याच्या दोन्ही बाजुंनी केसांच्या बटा सोडल्या होत्या. अतिशय कमी दागिने आणि ग्लॉसी मेकअप अशा थाटातली आलिया पार्टीमध्ये सगळ्यांपेक्षा जास्त भाव खाऊन गेली.