जगभरात नुकताच ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अभिनेत्री आणि अभिनेत्यांचेही ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. वर्षातून एकदा येणारा हा नाताळचा सण आणि इयर एंडचा आठवडा सगळेच अतिशय आनंदात आपले कुटुंबिय आणि मित्रमंडळींसोबत साजरा करतात. बॉलिवूडमधील कपूर कुटुंबियही यामध्ये मागे नसते, ख्रिसमसच्या निमित्ताने संपूर्ण कपूर कुटुंबिय एकत्र येत या सणाचा आनंद लुटते (Alia Bhatt Christmas Dress Price).
त्याचप्रमाणे यंदाही ख्रिसमसच्या दिवशी दुपारी कपूर कुटुंबिय जेवणासाठी एकत्र आले होते. नुकतीच कपूर कुटुंबात सामिल झालेली बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट हिनेही रणबीरसोबत या गेट टू गेदरला हजेरी लावली होती. आईच्या भूमिकेत गेलेली आलिया यावेळीही अतिशय हटके अंदाजात या ख्रिसमस पार्टीला आली होती.
आलियाच्या स्टायलिश आणि कम्फर्टेबल अशा ड्रेसने यावेळी सगळ्यांचेच लक्ष वेधले. फ्लोरल प्रिंट असलेला पांढरा आणि लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये ती अतिशय हॉट दिसत होती. किमोनोसारख्या मोठ्या बाह्या असलेल्या या ड्रेसचा गळा व्ही आकाराचा होता आणि खालच्या बाजूलाही या ड्रेसला दोन फ्लॅप होते. यावर तिने फक्त रिंगांचे कानातले सोडून इतर कोणत्याही अॅक्सेसरीज घातल्या नव्हत्या. पांढऱ्या रंगांचे सिंपल हिल्स घालून तिने हा ख्रिसमस लूक पूर्ण केल्याचे दिसले. आलिया नेहमीच छान फॅशन कॅरी करताना दिसते. प्रेग्नन्सीमध्येही तिने आपल्या फॅशन सेन्सने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
तर या पार्टीसाठी रणबीरने सध्या दाढी वाढवली असून काळ्या रंगाच्या टीशर्टवर छानसे लेदर जॅकेट आणि निळी जीन्स घातली होती. यावेळी त्यांच्याबरोबर अभिनेत्री नीतू कपूरही होत्या. आलियाने घातलेल्या या शॉर्ट ड्रेसची किंमत तब्बल ७ हजार रुपये इतकी आहे. रॅप प्रकारातील हा ड्रेस समर कलेक्शनमधील असून तो ऑनलाईनही उपलब्ध आहे. समर समव्हेअर असे या ड्रेसच्या ब्रँडचे नाव असून त्याची किंमत ऑनलाईन ६९९९ रुपये इतकी आहे. म्हणजे समर कलेक्शनमधील हा ड्रेस असल्याचे दिसते. तुम्हालाही आलियाचा हा ड्रेस आवडला असेल तर तुम्हीही ऑनलाईन हा वनपीस खरेदी करु शकता.