आलिया भट ही नुकतीच जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटपैकी एक असलेल्या Met Gala इव्हेंटमध्ये उपस्थिती लावली. या मोठ्या जगप्रसिद्ध इव्हेंटमध्ये अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत आलिया भट्टचे देखील नाव होते. या भव्यदिव्य अशा जगप्रसिद्ध कार्यक्रमात नेहेमीप्रमाणेच हटके एंट्री घेत आलियाने सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी आलियाने नखशिखंत मोत्यांमध्ये सजलेली दिसली. या सुंदर गाऊनमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. अनेकांना ती अप्सराच भासली. या सोहळ्याचे काही फोटो आलियाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आलिया नेहमीच तिच्या हटके ड्रेसिंग स्टाईलमुळे कायम चर्चेत असल्याचे आपण पाहिले आहे. आलिया भट (Alia Bhatt) पारंपरिक कपड्यांसह वेस्टर्न आउटफिटमध्येही तितकीच सुंदर व मोहक दिसते. तिच्या वॉर्डरोबमध्ये एकापेक्षा एक सुंदर कपड्यांचे कलेक्शन पाहायला मिळते. नुकतेच सोशल मीडियावर तिचा लेटेस्ट अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला. Met Gala इव्हेंटमध्ये उपस्थिती लावताना आलियाने खास १ लाख मोत्यांनी सजविलेला सुंदर मोत्यांचा गाऊन परिधान केला आहे(Did you know Alia Bhatt's white gown was made using one lakh pearls?).
या सुंदर मोत्यांच्या गाऊनची खासियत...
आलिया भट्टने परिधान केलेला हा सुंदर ड्रेस प्रसिद्ध नेपाळी-अमेरिकन फॅशन डिझायनर प्रबल गुरुंगला यांनी तयार केला होता. यावेळी आलियाच्या लुकला परफेक्ट टच देण्यासाठी कस्टम मेड ग्लोव्हज, स्टेटमेंट ज्वेलरी तिने परिधान केली होती. आलियाने मेट गाला मध्ये सुंदर व्हाईट गाऊन परिधान केला होता या ड्रेसला लो कट यू नेकलाइन आणि स्लीव्हलेस ठेवण्यात आले होते. या ड्रेसच्या कंबरेच्या बाजूला फिटींग देण्यात आली होती. या सुंदर ड्रेसमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. आलिया भट्टचा हा लुक ब्राइडल लुक सारखाच दिसत होता. खरं तर, यावेळी तिने कार्ल लेजरफेल्ड: ए लाइन ऑफ ब्युटी या थीमची कॉपी केली आहे. या ड्रेसची डिझाइनची प्रेरणा १९९२ च्या लुकमधून घेण्यात आली आहे. आलियाचा लूक सुपरमॉडेल क्लॉडिया शिफरच्या चॅनेल ब्राइडल लुकपासून प्रेरित होता.यावेळी आलियाच्या सिंपल लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी आलियाने ब्राऊन लाईट रंगाची लिपस्टिक लावली होती. तर मिनीमल मेकअप करून तिने हा लुक पूर्ण केला. आलियाला मिनीमल गोष्टी फार आवडतात या गोष्टीची प्रचिती तिच्या लग्नामध्ये सुद्धा आपल्याला आली.
सोनम कपूर साडी नेसून गेली आयपीएलचा सामना पहायला, फॅब्रिक असं भारी की साडीतही उकडलं नाही...
भूमी पेडणेकरने एका इव्हेण्टसाठी का घातला असेल ३४ वर्षे जुना ड्रेस? कोणती स्पेशल स्टाइल...
१ लाख मोत्यांनी सजलेला गाऊन...
आलियाच्या गाऊनमध्ये अधिकचा व्हॉल्यूम जोडण्यासाठी गाऊनच्या मागच्या बाजूला जास्तीचे कापड लावून हा ड्रेस मागच्या बाजूने लांबलचक करण्यात आला होता. पण या ड्रेसच्या एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ती गोष्ट म्हणजे ड्रेसवरील मोती. आलियाच्या या ड्रेसवर १ लाख मोती जोडण्यात आले होते. या सुंदर ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.