Lokmat Sakhi >Fashion > दिवाळीनिमित्त आलियाने नेसलेल्या 'त्या' साडीची खास गोष्ट! आलियाच्या विंटेज साडीची होतेय चर्चा कारणं...

दिवाळीनिमित्त आलियाने नेसलेल्या 'त्या' साडीची खास गोष्ट! आलियाच्या विंटेज साडीची होतेय चर्चा कारणं...

Alia Bhatt makes a strong case for repurposed fashion, wears a sari dyed with marigolds from Siddhivinayak temple : Alia Bhatt’s Re-Ceremonial sari is plant-dyed with marigolds from the Siddhivinayak temple : दिवाळीनिमित्त आलियाने नेसलेल्या साडीची ही आहे खासियत, ऐकून व्हाल थक्क...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2024 07:03 PM2024-11-08T19:03:19+5:302024-11-08T19:06:00+5:30

Alia Bhatt makes a strong case for repurposed fashion, wears a sari dyed with marigolds from Siddhivinayak temple : Alia Bhatt’s Re-Ceremonial sari is plant-dyed with marigolds from the Siddhivinayak temple : दिवाळीनिमित्त आलियाने नेसलेल्या साडीची ही आहे खासियत, ऐकून व्हाल थक्क...

Alia Bhatt makes a strong case for repurposed fashion, wears a sari dyed with marigolds from Siddhivinayak temple | दिवाळीनिमित्त आलियाने नेसलेल्या 'त्या' साडीची खास गोष्ट! आलियाच्या विंटेज साडीची होतेय चर्चा कारणं...

दिवाळीनिमित्त आलियाने नेसलेल्या 'त्या' साडीची खास गोष्ट! आलियाच्या विंटेज साडीची होतेय चर्चा कारणं...

आपला अभिनय आणि हटके फॅशन सेन्समुळे बॉलिवूडमध्ये ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट (Alia Bhatt). ग्लॅमरस लुकमुळे चाहत्यांना भुरळ पाडणारी ही अभिनेत्री फॅशनमध्येही सर्वात टॉपला आहे. आलियाचं फॅशन स्टेटमेंट काहीस हटके आहे. तिला फॅशनबाबत वेगवेगळे प्रयोग करायला नेहमीच आवडतात. पुरस्कार सोहळा असो किंवा कौटुंबिक कार्यक्रम आलिया नेहमीच हटके लुकमध्ये दिसते(Alia Bhatt’s Re-Ceremonial sari is plant-dyed with marigolds from the Siddhivinayak temple).

दिवसागणिक आपलं फॅशन स्टेटमेंट बदलणाऱ्या आलियाला वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख भलतेच आवडतात. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये आलियाने डिझायनर गाऊन, ड्रेस, साड्या किंवा नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे हटके लूक देणारे कपडे परिधान केल्याचं पाहायला मिळालं आहे. अभिनेत्री आलिया भट कायम तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मिडियात चर्चेत असते. आता देखील आलियाने दिवाळी निमित्त नेसलेल्या त्या अनोख्या साडीची चर्चा आणि काही फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. दिवाळीनिमित्त आलियाने नेसलेल्या या साडीची इतकी का चर्चा होत आहे? या साडीत असं काय विशेष आहे पाहूयात तिच्या या साडीची खासियत(Alia Bhatt makes a strong case for repurposed fashion, wears a sari dyed with marigolds from Siddhivinayak temple).

दिवाळीनिमित्त आलियाने नेसली ही खास साडी... 

आलियाने दिवाळीनिमित्त एक खास साडी परिधान केली होती. आलियाने Re- ceremonial चे फॅशन लेबल असणारी मॅरीगोल्ड रंगाची साडी नेसली होती. ही साडी दिसायला अतिशय साधी सिंपल असली तरीही, विंटेज बनारसी प्लांट डाय वापरुन तयार केलेली ही साडी ऑर्गेंजा फॅब्रिकपासून तयार केली गेली. या साडीवर गोल्डन रंगाच्या लेस स्ट्राईप पॅटर्नमध्ये लावलेल्या दिसत आहे. या गोल्डन लेस तिच्या संपूर्ण साडीवर लावलेल्या दिसतात, पदरावर या लेसचे हेव्ही वर्क केलेल पहायला मिळत आहे. आलियाने त्या साडीला अगदी शोभून दिसेल असाच गोल्डन शिमरी स्लिव्हलेस ब्लाऊज घातला होता. हा डिप यू नेकचा ब्लाऊज त्या साडीवर परफेक्ट मॅचिंग दिसत होता. या साडी आणि ब्लाऊजमुळे आलिया दिवाळीत एलिगंट आणि फेस्टिव्ह लूक मध्ये दिसून आली. 

महागडी साडी तर घेतली पण ब्लाऊजसाठी फॅशनेबल गळा शिवायचाय? ७ प्रकार-नवेकोरे फॅशनेबल पॅटर्न...

तर ही आहे या साडीची खासियत... 

या साडीत काय विशेष होत तर या साडीचा रंग. या साडीचा रंग गोंड्यांच्या फुलांपासून तयार करण्यात आला होता. मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक गणपतीच्या मंदिरातील गणपती बाप्पाच्या पायाशी अर्पण केलेल्या गोंड्यांच्या फुलांपासून या साडीच्या रंगाची डाय तयार केली होती, अशी माहिती सामोर येत आहे. गोंड्याच्या फुलांचा पुनर्वापर करुन या साडीच्या रंगांसाठी डाय तयार करण्यात आला होता.    

साडीची घडी ‘अशी’ झाला झटपट, पाहा भन्नाट ट्रिक! कपाटही दिसेल आवरलेलं- साड्या राहतील नव्याकोऱ्या...


  

ड्रेसच्या पॅटर्ननुसार ओढणी ड्रेपिंगच्या ७ अनोख्या पद्धती, येईल फेस्टिव्ह लूक- चारचौघीत दिसाल सुंदर!

या साडीवर आलियाने अगदी हलका लाईट मेकअप केला होता. तिने कानात साजेसे असे गोल्डन झुमके घातले होते. कपाळावर मध्यम आकाराची काळ्या रंगाची टिकली लावली होती. केसांचा फ्रेंच रोल घालून त्यावर साडीला मॅच होतील अशी पिळव्या रंगाची फुलं माळली होती. हातात एक मोठं गोल्डन हेव्ही वर्क असणार कड घातलं होत. 

या साडीची विशेष देखभाल करावी लागते... 

आलियाच्या साडीबद्दल अधिक माहिती देताना या साडीच्या ब्रँडने अशी माहिती दिली की, या साडीला डिझाईन करुन आम्ही नाजूक असलेल्या विणकामाचे सौंदर्य जपण्याचा एक अनोखा प्रयत्न केला आहे, आणि यासाठीच आम्ही या साडीला फुलांच्या अर्काने रंगवले आहे. नैसर्गिक वनस्पतीं किंवा फुलांच्या अर्कांनी रंगवलेले कपडे अतिशय नाजूक असतात, जे कोणत्याही प्रकारचे हेव्ही डिझाइन्स किंवा वर्क पेलू शकत नाहीत. यासाठीच या साडीवर अगदी नाजूक विणकाम केल्याचे दिसून येत आहे. असे कपडे धुताना किंवा त्यांना इस्त्री करताना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.


असे कपडे चांगल्या स्थितीत व्यवस्थित टिकवून ठेव्याचे असल्यास पीएच-न्यूट्रल डिटर्जंटने कोमट पाण्यात हाताने धुणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. कारण यामुळे कपड्यांचा रंग आणि चमक कायम राहते. जर आपण गरम पाण्याचा वापर केला तर त्याचा रंग फिका पडू शकतो. अशा कपड्यांना इस्त्री करताना कापड आणि इस्त्री यांच्यामध्ये एक पातळ कापड ठेवल्याने थेट संपर्क टाळण्यास मदत होते, त्यामुळे या कपड्यांचा रंग टिकून राहतो.

Web Title: Alia Bhatt makes a strong case for repurposed fashion, wears a sari dyed with marigolds from Siddhivinayak temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.