Lokmat Sakhi >Fashion > 'या' एका कारणासाठी आलियाने स्वत:च्या लग्नात नेसली होती साडी, तिला घागरा नको होता कारण.......

'या' एका कारणासाठी आलियाने स्वत:च्या लग्नात नेसली होती साडी, तिला घागरा नको होता कारण.......

Alia Bhatt Reveals About Her Saree in Her Wedding: अन्य अभिनेत्री त्यांच्या लग्नात घागरा घालतात, पण आलियाने मात्र साडी नेसण्यास प्राधान्य दिलं होतं... बघा काय सांगतेय ती यामागचं कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2023 04:19 PM2023-10-09T16:19:49+5:302023-10-09T16:20:51+5:30

Alia Bhatt Reveals About Her Saree in Her Wedding: अन्य अभिनेत्री त्यांच्या लग्नात घागरा घालतात, पण आलियाने मात्र साडी नेसण्यास प्राधान्य दिलं होतं... बघा काय सांगतेय ती यामागचं कारण

Alia Bhatt Reveals Why She Ditched A Lehenga And Donned A Saree At Her Wedding  | 'या' एका कारणासाठी आलियाने स्वत:च्या लग्नात नेसली होती साडी, तिला घागरा नको होता कारण.......

'या' एका कारणासाठी आलियाने स्वत:च्या लग्नात नेसली होती साडी, तिला घागरा नको होता कारण.......

Highlightsबॉलीवूडच्या इतर अभिनेत्री त्यांच्या लग्नात घागरा, भरजरी लेहेंगा घालतात. पण आलियाने मात्र लग्नात साडी नेसली होती. तिने यामागचं कारण नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर (Alia Bhatt and Ranbir Kapoor) यांचं लग्न म्हणजे बॉलीवूडमधलं एक गाजलेलं लग्न. कपूर आणि भट हे दोन्ही कुटूंब सेलिब्रिटी. त्यामुळे त्यांच्या लग्नाची तुफान चर्चा संपूर्ण भारतातच झाली होती. त्यात आलियाचा मेकअप, तिचे कपडे, दागिने यांचीही चर्चा चांगलीच रंगली होती. कारण आलिया खऱ्या अर्थाने बॉलीवूडमधली एक ट्रेण्ड सेटर नवरी ठरली होती. आजवर नववधूचा मेकअप, कपडे, दागिने जसे असायचे त्याच्या अगदी उलट आलियाने केलं होतं. पण तरीही नवरी म्हणून आलिया सगळ्यांना खूपच आवडली होती. आता हेच बघा ना बॉलीवूडच्या इतर अभिनेत्री त्यांच्या लग्नात घागरा, भरजरी लेहेंगा घालतात. पण आलियाने मात्र लग्नात साडी नेसली होती. तिने यामागचं कारण नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे.  (Why Alia Bhatt Ditched A Lehenga And Donned A Saree At Her Wedding)

 

bollywoodshaadis यांनी दिलेल्या एका वृत्तानुसार आलिया भटची नुकतीच एक मुलाखत झाली. तुम्हाला आठवतच असेल की आलियाने तिच्या लग्नात सेलिब्रिटी डिझायनर सब्यासाची यांनी डिझाईन केलेली आयव्होरी रंगाची साडी नेसली होती.

नुसतं अननस तर नेहमीच खातो, आता अननसाची आंबट- गोड चटपटीत चटणी खाऊन पाहा, कुणाल कपूर यांची स्पेशल रेसिपी 

या साडीवर सोनेरी रंगात जरीकाम केलेलं होतं. त्याच अनुशंगाने तिला एका मुलाखतीत विचारलं गेलं की इतर अभिनेत्री लग्नासाठी खास घागरा डिझाईन करून घेतात, मग तुलाच साडी नेसावी असं का वाटलं? या प्रश्नाचं उत्तर देताना आलिया म्हणाली की साडी हा तिचा अतिशय आवडीचा पेहराव असून तिला सगळ्यात जास्त आरामदायी साडीतच वाटतं. त्यामुळे लग्नासारख्या आयुष्यातल्या अतिमहत्त्वाच्या प्रसंगीही तिने साडी नेसण्यालाच प्राधान्य दिलं. 

 

याविषयी पुढे सांगताना ती म्हणाली की आयुष्यातल्या महत्त्वाच्या प्रसंगी तुम्हाला मनापासून जे कपडे घालावे वाटतात, ते घाला आणि तो क्षण सेलिब्रेट करा. मग ती साडी असो, लेहेंगा असो किंवा मग गाऊन असो..

मेंदू तल्लख राहण्यासाठी काजोल करते ब्रेन एक्सरसाईज, अनिल कपूरकडून गिरवले व्यायामाचे धडे

आलियाला असं वाटतं वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळे कपडे घालून ते क्षण आनंदात साजरे करता येणं, हे बाईपणातलं खरं सौंदर्य आहे. म्हणूनच तर प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये कित्येक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असतात. ही खरोखरंच एक आनंददायी बाब असून ती नक्कीच सेलिब्रेट करता यायला पाहिजे, असं आलियाचं म्हणणं आहे. 

 

Web Title: Alia Bhatt Reveals Why She Ditched A Lehenga And Donned A Saree At Her Wedding 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.