Lokmat Sakhi >Fashion > आलिया भट म्हणाली, मी ही त्यावेळी फार घाबरले होते, नर्व्हस झाले कारण...

आलिया भट म्हणाली, मी ही त्यावेळी फार घाबरले होते, नर्व्हस झाले कारण...

Alia Bhatt Reveals She Was Nervous Before Met Gala Debut, Talks About Feeling ‘Little Wobble In Her Knees’ : आलियाने व्हिडिओ शेअर करत तिच्या भीतीचे नेमके कारण काय हे सांगितले आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2023 06:41 PM2023-05-05T18:41:33+5:302023-05-05T18:57:09+5:30

Alia Bhatt Reveals She Was Nervous Before Met Gala Debut, Talks About Feeling ‘Little Wobble In Her Knees’ : आलियाने व्हिडिओ शेअर करत तिच्या भीतीचे नेमके कारण काय हे सांगितले आहे...

Alia Bhatt shows how she got ready for Met Gala, says she was nervous because of her ‘very big dress, high heels’. | आलिया भट म्हणाली, मी ही त्यावेळी फार घाबरले होते, नर्व्हस झाले कारण...

आलिया भट म्हणाली, मी ही त्यावेळी फार घाबरले होते, नर्व्हस झाले कारण...

मेट गालामधील आलियाच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. मनोंरजन विश्वात महत्त्वाचे स्थान असणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'मेट गाला.' या पुरस्कार सोहळ्याला जगभरातील अनेक कलाकार हजेरी लावताना दिसतात. अभिनेत्रींचे रेड कार्पेटवरील कपडे हे या पुरस्कार सोहोळ्याच सर्वात मोठं आकर्षण असत.  मेट गालाच्या रेड कार्पेटवर जगभरातील सर्वात मोठे सेलिब्रिटी आपल्या जबरदस्त फॅशन आणि आऊटफिट्ससह सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतात. या कार्यक्रमात सेलेब्स डिझायनर्सची ऑफबीट फॅशन आणि ड्रेसिंग सेन्स सादर करतात. यावेळी देखील अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या रेड कार्पेटवर दिसत आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट यावर्षी पहिल्यांदाच मेट गाला २०२३मध्ये सहभागी झाली आहे. आलिया डिझायनर प्रबल गुरुंग क्रिएशनचा ड्रेस परिधान करून मेट गालाच्या रेड कार्पेटवर अवतरली. 

मेट गालामध्ये आलियाची ही पहिलीच वेळ होती. सर्वांनी आलियाच्या लुक आणि स्टाइलचे कौतुक केले. आलियाने नुकताच तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने सांगितले आहे की ती जेव्हा मेट गालासाठी तयार होत होती तेव्हा ती किती नर्व्हस झाली होती. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये आलिया मेट गालासाठी तयार होताना दिसत आहे(Alia Bhatt shows how she got ready for Met Gala, says she was nervous because of her ‘very big dress, high heels’).

मेट गालाच्या रेड कार्पेटवर येण्याआधी आलियाच्या मनातील धाकधूक...

या व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट डिझायनर प्रबल गुरुंगचा पांढरा ड्रेस परिधान करताना दिसत आहे. तिच्या या पांढऱ्या शुभ्र परीसारख्या दिसणाऱ्या  ड्रेसवर १ लाख मोत्यांची कारागिरी करुन सुशोभित करण्यात आला होता. हा ड्रेस परिधान केल्यानंतर तो वजनाने खूपच जड असल्याचे आलियाच्या लक्षात आले. व्हिडिओमध्ये आलिया म्हणताना दिसत आहे की, कोणीतरी मला इथून उचलून थेट मेट गालाच्या रेड कार्पेटवर घेऊन जाईल का ? मेट गालामध्ये आपल्या हटके एन्ट्रीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी आलिया खूपच घाबरली होती. तिने घातलेला हेव्ही ड्रेस, हाय हिल्स, ड्रेसच्या मागे असणारे लांबलचक पायघोळ कापड या सगळ्या गोष्टी सावरत चेहेऱ्यावर हास्य टिकवून ठेवायचे, या सगळ्या गोष्टींमुळे ती थोडी नर्व्हस झाली होती.

आलिया भटच्या ड्रेसवर किती मोती? १ लाख ! -आलियाच्या ड्रेसच्या मोतीवाल्या पांढऱ्याशुभ्र ड्रेसचीच चर्चा...  

आलियाने व्हिडिओ शेअर करत तिच्या भीतीचे कारण सांगितले... 

आलिया भट्टने मेट गालादरम्यान रेड कार्पेटवरील अनेक फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. या मोठ्या जागतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती खूप उत्सुक असल्याचेही आलियाने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आलिया आरशात स्वतःला बघताना दिसत आहे. मेट गालामध्ये पदार्पण केल्याबद्दल तिचा आनंद या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. आलिया सांगते, जेव्हा मी त्या स्प्रिंटर व्हॅनमधून बाहेर पडेन, तेव्हा मला माझ्या गुडघ्यांमध्ये थोडेसे डगमगल्यासारखे होईल कदाचित... हे खरंतर योग्य नाही, परंतु माझ्याकडे एवढा मोठा ड्रेस आणि हाय हिल्स असल्यामुळे मला कदाचित रेड कार्पेटवर चालताना असे होऊ शकते.  

बाळ झाल्यानंतर लगेच स्लिम व्हायचा हट्ट तरी कशाला? आलिया भटचा सल्ला, आई झाल्यावर...

प्रियांका चोप्राचा चांदीच्या तारांनी सजलेला बनारसी ब्रोकेड साडीचा ड्रेस, बनवायला लागले ६ महिने...

पुढे, आलिया प्रबल आणि तिच्या टीमसोबत लिफ्टमध्ये आल्यावर तिचा ड्रेस मॅनेज करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या क्लिपमध्ये आलिया गायिका रीटा ओरा आणि प्रबल यांच्यासोबत पोझ देताना दिसत आहे. मेट गाला २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी हॉटेल सोडताना चाहत्यांना अभिवादन करतानाचे काही स्नॅपशॉट्स देखील या व्हिडिओत पहायला मिळत आहेत. आलियाने मेट गाला लूकमधील फोटोज शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मला असे काहीतरी करुन दाखवायचे होते जे अस्सल खरेखुरे वाटेल... हा १ लाख मोत्यांनी सुशोभित केलेला गाऊन भारतीय विणकरांनी बनवला आहे म्हणून हा गाऊन परिधान करताना फारच अभिमान वाटत आहे. डिझायनर प्रबल गुरुंग यांनी माझ्यासाठी केलेले हे प्रेमाचे श्रम आहेत. माझ्या पहिल्याच मेट गाला डेब्यूसाठी मी तुम्ही डिझाईन केलेला गाऊन घातला आहे, याचा मला अभिमान आणि आनंद आहे, धन्यवाद. असे म्हणत आलियाने डिझायनर प्रबल गुरुंग यांचे देखील आभार मानले आहेत.

Web Title: Alia Bhatt shows how she got ready for Met Gala, says she was nervous because of her ‘very big dress, high heels’.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fashionफॅशन