मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाला आलेल्या देशादेशीच्या सेलिब्रिटींचे कपडे, दागिने खरोखरच पाहण्यासारखे होते. त्यातल्या त्यात ज्या व्यक्तींच्या पोशाखाची सगळ्यात जास्त चर्चा झाली, त्यामध्ये एक नाव सगळ्यात आवर्जून घ्यावे लागेल. आणि ते नाव म्हणजे आलिया भट. आलियाने अनंत- राधिकाच्या लग्नात अतिशय सुंदर अशी फिकट गुलाबी रंगाची 'आशावाली' साडी नेसली होती. तिच्या त्या साडीचं विणकाम तब्बल १६० वर्षे आधी करण्यात आलं होतं असं म्हणतात (Alia Bhatt wore 160 years old woven saree for Anant Ambani Radhika Merchant wedding). तिने नेसलेली ती साडी नेमकी होती कशी पाहा.. (Alia Bhatt's pink saree with silver border and real gold butti)
आशावाली साडीची विणकामाची पद्धत ही अहमदाबादची पारंपरिक कला म्हणून ओळखली जाते. ही साडी सेलिब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्या खास कलेक्शनमधली होती.
साडी- ओढणी सेफ्टी पिनमध्ये अडकून फाटते? २ सोप्या ट्रिक्स, पदर- ओढणी पिनमध्ये अडकणार नाही
त्या साडीचे काठ अस्सल चांदी वापरून तयार करण्यात आले होते तर साडीवरची जी बुटी होती ती तयार करण्यासाठी तब्बल ६ ग्रॅम सोन्याचा वापर करण्यात आला आहे. त्या पारंपरिक साडीला मॉडर्न टच देण्यासाठी आलियाने स्ट्रेपलेस ब्लाऊज घातले होते. तर तिने घातलेले सगळे दागिने २२ कॅरेट सोने आणि अनकट डायमंडपासून तयार केलेले होते...
आशावाली साडी कशी असते?
अहमदाबादच्या या पारंपरिक साडीची निर्मिती १६ व्या शतकापासून सुरू झाली. तसेच जे विणकर बनारसमधून गुजरातला आले त्यांनी या साडीचे विणकाम सुरू केले असावे, असे मानले जाते.
सलग १ महिना रोज १६ तास पेंटींग करून तयार झाला राधिका मर्चंटचा सुंदर लेहेंगा... बघा त्याचं सौंदर्य
साडीच्या काठांवर आणि पदरावर केले जाणारे नाजूक मीनाकाम हे या साडीचं वैशिष्ट्य मानलं जातं. महाराष्ट्राची पैठणी जशी वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मिळते तशीच ही साडी बादशाह पल्लू, चांदतारा, पिकॉक बॉर्डर, पॅरोट बॉर्डर अशा वेगवेगळ्या प्रकारांत मिळते. आशावाली साडी प्रमाणेच ओढणी, फेटे, कुर्ते देखील मिळतात. अतिशय महागडं आणि उंची वस्त्र म्हणून आशावाली साडीकडे पाहिलं जातं.