Join us

ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी आलिया भटने घातले २ ड्रेस- एक स्वस्त तर दुसरा अतिशय महाग, बघा किंमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2024 16:11 IST

Alia Bhatt's Christmas Celebration 2024: अभिनेत्री आलिया भट हिने ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी दोन वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये जे दोन ड्रेस घातले होते, त्यांच्या किमतीची सध्या खूप चर्चा होत आहे.

ठळक मुद्देया दोन्ही ड्रेसमध्ये आलियाचे सौंदर्य खुलून आले होते हे मात्र नक्की.. 

बरेच बॉलीवूड सेलिब्रिटी ख्रिसमस अतिशय धूम धडाक्यात साजरा करतात. त्यापैकी एक म्हणजे कपूर कुटूंब. अभिनेत्री आलिया भट आता कपूर कुटुंबाचाच एक भाग आहे. त्यामुळे ती तिच्या माहेरच्या लोकांसोबत आणि सासरच्या लोकांसोबत दोन वेगवेगळे सेलिब्रेशन मोठ्या दणक्यात करत असते. त्यानुसार यावर्षीही तिने तिची आई सोनी राजदान आणि बहिण शाहिन भट यांच्यासोबत एक वेगळी ख्रिसमस पार्टी केली आणि नंतर कपूर परिवारासोबत आणखी एक जंगी सेलिब्रेशन केले. या दोन्ही वेळेस तिने घातलेल्या ड्रेसची खूप चर्चा सोशल मिडियावर होत आहे.(Alia Bhatt's Christmas Celebration with Ranbir Kapoor and Raha Kapoor) 

 

आलिया भट्टने ख्रिसमस सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यापैकी काही फोटोंमध्ये ती तिच्या बहिणीसोबत आणि आईसोबत दिसते. त्यामध्ये तिने एक मोतीया रंगाचा सुंदर गाऊन घातला होता.

बटाट्याचा पराठा लाटताना फाटतो- सारण बाहेर येतं? ३ सोप्या ट्रिक्स- सरसर लाटता येतील पराठे

त्या वन शोल्डर गाऊनच्या एका बाजुला एखाद्या पिसाप्रमाणे सुंदर नक्षी करण्यात आलेली होती. वेगवेगळे स्टोन्स, मोती आणि लेस लावून तो सजवण्यात आलेला होता. हा ड्रेस डेविड कॉमा यांच्या कलेक्शनमधला असून त्याची किंमत १ लाख ४१ हजार रुपये एवढी आहे. गंमत म्हणजे ४० टक्के डिस्काउंट देण्यात आल्यानंतरही हा ड्रेस एवढा महाग आहे.

 

यानंतर आलियाने कपूर कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी जो ड्रेस घातला होता तो अतिशय सुंदर चमकदार लाल रंगाचा होता. तिचा तो गाऊन समर या ब्रँडचा असून त्याची किंमत ६५९० रुपये एवढी आहे.

डायबिटीज असणाऱ्यांनी दररोज आठवणीने खावेत ५ पदार्थ- रक्तातील साखर वाढणार नाही

अर्थात हा ड्रेसही काही स्वस्त नाही. पण आलिया भटसारख्या सुपरस्टार सेलिब्रिटीसाठी आणि तिच्या आधीच्या ड्रेसची किंमत बघता या ड्रेसची किंमत तिच्यासाठी नक्कीच खूप कमी आहे. या दोन्ही ड्रेसमध्ये आलियाचे सौंदर्य खुलून आले होते हे मात्र नक्की.. 

 

टॅग्स :फॅशनआलिया भटनाताळस्टायलिंग टिप्स