Join us  

आता फक्त १ हजार रुपयांत मिळतेय आलिया भटची 'रानी'फेम शिफॉन साडी! गुलाबी साडीची क्रेझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2023 7:06 PM

Alia Bhatt's Saree Collection: आलिया भटने नेसलेली ड्युएल टोन ऑम्ब्रे साडी आवडली का? ही साडी अवघ्या हजार रुपयात मिळू शकते. (Ombre- dual toned saree )

ठळक मुद्देतुम्हालाही तिच्यासारखी साडी घ्यायची असेल, तर अगदी तुमच्या बजेटमध्ये मिळू शकते.

आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर सिंग (Ranveer Singh) यांची प्रमुख भूमिका असलेला 'रॉकी और राणी की प्रेम कहानी' (Rocky aur Rani ki prem kahani) हा चित्रपट सध्या गाजतो आहे. पण त्या चित्रपटापेक्षाही जास्त चर्चा आहे ती आलिया भटने या चित्रपटात नेसलेल्या वेगवेगळ्या साड्यांची (Alia Bhatt's saree collection). साध्या सिंपल साड्या असूनही आलिया भट त्यात कमालीची सुंदर दिसत आहे. साडी कशी नेसावी, ती कशी कॅरी करावी आणि आकर्षक ॲक्सेसरीज घालून कसा स्मार्ट लुक करावा, हे आलियाच्या 'रानी'ने  दाखवून दिले आहे. तुम्हालाही तिच्यासारखी साडी घ्यायची असेल, तर अगदी तुमच्या बजेटमध्ये मिळू शकते. ( Ombre, dual toned chiffon saree)

 

या चित्रपटात आलियाने अनेक साड्या नेसलेल्या आहेत. त्यापैकी ज्या साड्या दोन रंगांमधल्या आहेत, त्या साड्यांना ऑम्ब्रे साडी म्हणतात. याच साडीला ड्युएल टोन साडी म्हणूनही ओळखले जाते. यापैकी बहुतांश साड्या सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केल्या आहेत.

कुछ भी हो जाये तमीजसे! - सुश्मिता सेन सांगतेय वयाच्या २१ व्या वर्षी मिळालेला सल्ला..

या साड्यांची खासियत अशी की वेगवेगळ्या रंगांचे दोन धागे एकत्र करून या साडीचे फॅब्रिक केले जाते. दोन रंगांचे धागे ज्याठिकाणी एकत्र येतात तेव्हा त्याठिकाणी एक अगदी वेगळा रंग तयार होतो. तो रंग सामान्यपणे इतर कुठेही बघायला मिळत नाही. ऑम्ब्रे किंवा ड्युएल प्रकारातल्या या साड्या जॉर्जेट आणि शिफॉन या प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. यापैकी आलियाने नेसलेल्या बऱ्याचशा साड्या शिफॉन प्रकारातल्या आहेत. तुम्हालाही अगदी बजेटमध्ये मिळणारी अशी साडी घ्यायची असेल तर पुढील पर्याय बघा.

 

आलियाने नेसलेली ही साडी ऑनलाईन शॉपिंग साईटवर फक्त ७४९ रुपयांना उपलब्ध आहे.

केस वाढतच नाहीत, कमी वयात पांढरे झाले? ५ योगासनं करा, केस हाेतील मजबूत- लांब, गळणंही होईल कमी

साडी घ्यायची असेल किंवा तिच्याविषयी आणखी माहिती पाहिजे असेल, तर पुढील लिंक क्लिक करा. 

Click to Buy:https://www.amazon.in/dp/B0CCVJKQR6

 

टॅग्स :फॅशनआलिया भटसाडी नेसणेरणवीर सिंग