आलिया भट नेहमीच तिचं असं एक स्वतंत्र फॅशन स्टेटमेंट तयार करत असते. मग तिचा तो लग्नातला लूक असो किंवा मग आता तिने मेट गाला या फॅशन जगतातल्या सगळ्यात मोठ्या कार्यक्रमासाठी केलेलं ड्रेसिंग असो.. ती तिच्या हटके स्टाईलने नेहमीच सगळ्यांची मनं जिंकून घेते. आता मेट गाला २०२४ या सोहळ्यातही आलियाने मिंट- ग्रीन रंगाची साडी नेसली होती (Alia Bhatt's super stylish look in met gala 2024 festival). तिची ती साडी, त्यावरची ज्वेलरी, मेकअप, हेअरस्टाईल या सगळ्या गोष्टी इतक्या छान जुळन आल्या की त्यानंतर सगळीकडे तिच्याच साडीची आणि देखण्या रुपाची चर्चा सुरू झाली. (Alia Bhatt in sabyasachi's mint green saree)
मेट गाला या सोहळ्यासाठी आलियाने नेसलेली साडी सेलिब्रिटी डिझायनर सब्यासाची यांनी डिझाईन केलेली होती. ही साडी तयार करण्यासाठी तब्बल १६५ विणकरांनी कित्येक तास मेहनत घेतली. यावर्षी गाला सोहळ्यासाठी 'दि गाईन ऑफ टाईम' अशी थीम ठेवण्यात आली होती.
जास्वंदाला फुलं येतच नाहीत? यापैकी १ उपाय करा, रोपावरची फुलं कधीच कमी होणार नाहीत
त्यानुसार अनेक फुलं लावून साडीवर देखणे वर्क करण्यात आले होते. फुलांची डिझाईन आणि ते साडीला जोडण्याचं काम पुर्णपणे हॅण्डिक्राफ्ट आणि हॅण्डस्टिच या प्रकारातलं होतं. त्यामुळे तिची साडी तयार करण्यासाठी एवढा जास्त वेळ लागला. याशिवाय तिच्या साडीवर अनेक रत्नं जडविण्यात आले होते. त्यामुळे आलियाचा साडीतला लूक एकदम देखणा आणि रॉयल झाला होता.
मेट गाला या सोहळ्यासाठी आलियाने साडी नेसून भारतीय संस्कृतीची झलक दाखवली, याबद्दल तिचं भरभरून कौतूक होत आहे. यातूनच पुन्हा एकदा आलियाचं साडी प्रेम दिसून आलं.
टरबूज घेताना लक्षात ठेवा ३ टिप्स, बघा न फोडता कसं ओळखायचं गोड, रसरशीत टरबूज
या सोहळ्यासाठी आलियाने सब्यासाचीने डिझाईन केलेले दागिने घातले होते. तिच्या दागिन्यांमध्ये आणि हेअरस्टाईलमध्ये १९२० सालची झलक दिसून आली. एकंदरीतच आलियाने मेट गाला २०२४ हा सोहळा जबरदस्त गाजवला.