आजकाल खऱ्या दागिन्यांपेक्षा खोटे व आर्टिफिशियल दागिनेच जास्त वापरले जातात. सध्या खोटे आर्टिफिशियल दागिने वापरण्याचा एक हटके ट्रेंडच स्त्रियांमध्ये दिसून येतो. खोटे आर्टिफिशियल दागिने वापरणे हे तसे सगळ्याच दृष्टीने स्त्रियांना अतिशय सोयीस्कर पडते. आर्टिफिशियल दागिने वजनाने हलके असल्यामुळे व्यवस्थित कॅरी करता येतात. यासोबतच खरे दागिने अंगावर घालून प्रवासात जोखीम घेण्यापेक्षा सेफ्टीच्या दृष्टीने देखील हे फायदेशीर ठरते. खोटे आर्टिफिशियल दागिने घालण्याचे असे अनेक फायदे असले तरीही त्यांचे तोटे देखील तितकेच आहेत(How do you treat an infected ear from fake earrings?).
काही स्त्रियांची स्किन ही अतिशय नाजूक व सेंसिटीव्ह असते. त्यामुळे अशा स्त्रियांना खास करून आर्टिफिशियल दागिने वापरल्यास अधिक त्रास होतो. बहुतेकवेळा आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये आपण खोटे कानातले घालण्याला अधिक प्राधान्य देतो. काही महिला रोजच्या वेगवेगळ्या ड्रेसला मॅचिंग होतील असेच एअररिंग्स घालणे पसंत करतात. हे आर्टिफिशियल एअररिंग्स तांबे, अॅल्युमिनियम, स्टील किंवा मेटल यांसारख्या वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेले असतात. असे आर्टिफिशियल एअररिंग्स (Fake Jewelry Allergies) सतत वापरल्याने काही जणींना तर त्या ठिकाणी लगेचच रॅशेज येतात तर त्वचा लाल पडते. यासोबतच काहीवेळा तिथली त्वचा चिघळून त्यातून एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर पडतो. त्यामुळे असे आर्टिफिशियल दागिने (Here’s How to Get Rid of Skin Allergy Due to Artificial Jewellery)आवडूनही ते वापरता येत नाहीत. आर्टिफिशियल एअररिंग्स घातल्याने कानाच्या त्वचेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून काही सोपे उपाय (How To Avoid Infections From Fake Earrings) लक्षात ठेवूयात(disadvantages of artificial earrings & home remedies for earache or ear pain).
आर्टिफिशियल एअररिंग्स घातल्याने नेमके काय होते ? (Why are my ears allergic to fake earrings?)
१. आर्टिफिशियल एअररिंग्स घातल्याने अनेकवेळा आपली त्वचा काळी - निळी पडते. काहीवेळा कानातल्यांचा हुक पॅटर्न त्वचेवर देखील दिसून येतो.
२. आर्टिफिशियल एअररिंग्स बहुतेकवेळा स्वस्त मटेरियल पासून बनविलेले असतात आणि त्यावर कृत्रिम चांदी किंवा सोन्याचा थर असतो. या कानातल्यांमुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो.
"हाय हिल ते नाचे तो तू बड़ी जचे," पण हाय हिल्स घालून पस्तावाल? रोज हिल्स घालत असाल तर...
मेकअप किटमधील कॉम्पॅक्ट पावडर फुटून त्याचा भुगा झाला ? १ सोपी ट्रिक, कॉम्पॅक्ट पावडर अशी करा सेट...
३. असे खोटे आर्टिफिशियल एअररिंग्स घातल्याने कानाला खाज सुटते, कानाची छिद्रे सुजतात, पू होणे सुरू होते आणि त्यामुळे कधी कधी संपूर्ण कान दुखू लागतो.
४. या कानातल्यांमुळे कानात पिंपल्स, लहान पुरळ किंवा फोड येऊ शकतात.
५. काहीवेळा आपण बाजारातून भरपूर ऑक्सिडाइज्ड दागिने विकत घेतो. ज्यात मोठ्या कानातले व झुमक्यांचा समावेश असतो. जेव्हा हे कानातले घातले जातात तेव्हा आपल्या कानाचे छिद्र ताणले जाऊन ते अधिक लांब आणि मोठे होतात.
महागड्या सिक्विन साडीची काळजी घेण्याच्या ६ टिप्स, नाहीतर चमचमती साडी पडेल काळी...
कानाची त्वचा खराब होऊ नये म्हणून काही घरगुती टिप्स...
१. जर खोटे आर्टिफिशियल एअररिंग्स घातल्यामुळे आपले कान खराब झाले असतील तर काही घरगुती उपायांनी ते बरे होऊ शकतात. यासाठी मोहरीचे तेल हलके गरम करून कानांना लावू शकता, यामुळे आपल्याला आराम मिळेल.
२. चमचाभर हळद घेऊन ती खोबरेल तेलात गरम करून कानाला लावल्याने कानाला आलेली सूज लवकर बरी होते.
३. चिघळलेल्या कानांच्या त्वचेवर खोबरेल तेल लावून हलकेच मालिश करणे हा उत्तम पर्याय आहे. जर कानाच्या छिद्रात जास्त कोरडेपणा असेल आणि त्वचा ताणली जाऊ लागली असेल तर खोबरेल तेल देखील लावू शकता.