एरवी तुम्ही कितीही वेस्टर्न कपडे घातले तरी शेवटी पारंपरिक साडी नेसल्यावर तुमचे सौंदर्य अधिक खुलून येते, यात वादच नाही. सर्वसामान्य महिलांना, तरुणींना लागू होणारी ही गोष्ट अभिनेत्रींच्या बाबतीतही तेवढीच खरी आहे. म्हणूनच तर एरवी वेस्टर्न, स्टायलिश, फॅशनेबल कपड्यांमध्ये वावरणाऱ्या अभिनेत्रीही काही महत्त्वाच्या प्रसंगांसाठी हमखास साडीचीच निवड करतात. आता दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा प्रभुचंच (Samantha Ruth Prabhu) बघा ना.. आगामी चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमासाठी ती साडी (ivory organza sari Costs Rs. 48k) नेसली आणि आता तिचा तोच साडी लूक सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
कशी आहे समंथाची ऑर्गेंझा साडी?
समंथाची मुख्य भूमिका असणारा तेलगु चित्रपट शाकुंतलम १७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे प्रमोशनल कार्यक्रम सध्या उत्साहात सुरू आहेत.
साबुदाणा नीट भिजतच नाही? कधी कच्चा राहतो तर कधी खिचडी खूपच गचका होते? बघा २ सोप्या ट्रिक्स...
यापैकीच एका कार्यक्रमासाठी समंथाने तब्बल ४८ हजार रुपये किमतीची ऑर्गेंझा साडी नेसली होती. चमकदार मोतिया रंगाची ही साडी Devnaagri या ब्रॅण्ड हाऊसची आहे. साडी पुर्णपणे प्लेन असून तिच्या काठांवर फक्त बारीक एम्ब्रॉयडरी वर्क आणि कट वर्क केलेलं आहे. अतिशय डिसेंट असणारी ही साडी बघून अनेकांना यशराजच्या चित्रपटांतील अभिनेत्रींच्या साडी लूकची आठवणही झाली.
या साडीवरचं ब्लाऊजही साडीच्याच रंगाचं आहे. पण ते मात्र गज्जी सिल्क प्रकारातलं आहे. स्लिव्हलेस ब्लाऊजचा गळा डिप व्ही शेपचा असून ते सेलिब्रिटी स्टायलिस्ट पल्लवी सिंग यांनी डिझाईन केलं आहे.
दिवसाची सुरुवात चहा- कॉफीने नकोच, त्याऐवजी ३ पदार्थ खा.. तब्येतीच्या अनेक तक्रारींवर रामबाण उपाय
या साडी लूकवर समंथाने अतिशय माईल्ड- न्यूड प्रकाराचा मेकअप केला आहे. केसांना थोडंसं कर्ल करून ते मोकळेच सोडले आहेत. शिवाय कानातल्यांशिवाय अन्य दागिनेही घातलेले नाहीत. त्यामुळे मेकअप साधा- सिंपल असला तरी तिचा लूक अतिशय स्टायलिश वाटतो आहे.