Join us  

करिना कपूरचा ३ लाखांचा 'इमरान' कोट घडवायला लागले २०० तास, बघा त्यावरची सुंदर नजाकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2024 1:51 PM

Kareena Kapoor Khan's Imran Coat: अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी (Anant Ambani Pre wedding) अभिनेत्री करिना कपूर खान हिने घातलेला भरजरी 'इमरान' कोट तुम्ही पाहिला का?

ठळक मुद्देकरिना कपूरचा नवाबी थाट तिच्या कपड्यांमधून पुरेपूर दिसून आला. सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी तर तिने घातलेला इमरान कोट अतिशय लक्षवेधी ठरला.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा नुकताच मोठ्या धामधुमीत जामनगर येथे पार पडला. याप्रसंगी बॉलीवूडच्या जवळपास सगळ्याच कलाकारांची उपस्थिती होती. या सोहळ्यासाठी आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचे कपडे, त्यांची स्टाईल पाहण्यासारखी होती. करिना कपूरही त्यात अजिबातच मागे नव्हती. करिना कपूरचा नवाबी थाट तिच्या कपड्यांमधून पुरेपूर दिसून आला. सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी तर तिने घातलेला इमरान कोट अतिशय लक्षवेधी ठरला (Kareena Kapoor Khan wore imran coat worth Rs 3 lakh). बघा हा कोट नेमका होता कसा आणि त्याचं नेमकं वैशिष्ट्य काय...

 

या कार्यक्रमात करिना कपूरने गोल्डन रंगाचा ड्रेस घातला होता. शॉर्ट ड्रेसवर लांब जॅकेट असा तिचा एकंदरीत लूक होता. अंबानी यांच्या कार्यक्रमासाठी हेरिटेज इंडिया ही थीम होती.

वयाच्या पन्नाशीतही ऐश्वर्या नारकर आहेत कमालीच्या फिट, त्यांच्यासारखा फिटनेस मिळविण्यासाठी बघा काय करायचं....

त्या थीमनुसार करिनाने पारंपरिक जरतारी वर्क असलेला आणि डिझायनर रितू कुमार यांनी डिझाईन केलेला इमरान कोट घातला होता. १७ व्या काश्मिरी शालीवर ज्या प्रकारची जामवर एम्ब्रॉयडरी असते, तशाच धाटणीचे पण गोल्डन धाग्यातले जर्दोसी वर्क तिच्या जॅकेटवर केलेले होते. तसेच फारुकाबाद येथील प्रसिद्ध ब्लॉक प्रिंट करून नंतर त्यावर सेक्विन वर्क आणि आरी वर्क केलं होतं.

 

तिच्या या कोटवरचं अतिशय देखणं काम नजाकतीने पुर्ण करण्यासाठी कुशल कारागिरांना तब्बल २०० तास लागले.

Google Doodle: ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड जिच्यासाठी भांडतात ती 'फ्लॅट व्हाईट कॉफी' असते कशी- बघा रेसिपी

जळवपास ३ लाख एवढी किंमत असणाऱ्या या ड्रेसवर करिनाने तिच्या लग्नातला त्यांच्या पतौडी कुटूंबातील पारंपरिक असणारा रत्नजडीत पोलकी सेट घातला होता. 

 

टॅग्स :फॅशनकरिना कपूरस्टायलिंग टिप्समुकेश अंबानीनीता अंबानी