Join us  

ईशा अंबानीच्या लेहेंगा चोलीवर सजले खरेखुरे जडाऊ दागिने; नजाकतीचं सुंदर काम- पाहा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2024 6:07 PM

Anant Ambani- Radhika Merchant pre wedding: अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यात ईशा अंबानीने ( Isha Ambani) घातलेल्या लेहेंग्यावरचं ब्लाऊज खरेखुरे दागिने लावून डिझाईन करण्यात आलं होतं.

ठळक मुद्देते ब्लाऊज नेमकं कसं होतं आणि ते कशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलं होतं ते पाहा.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांची लेक म्हणजे ईशा अंबानी (Isha Ambani). आपल्याला माहितीच आहे की ईशाचा सगळ्यात धाकटा भाऊ म्हणजेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहपुर्व सोहळा (Anant Ambani- Radhika Merchant pre wedding) नुकताच जामनगर येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या तीन दिवसीय सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी ईशाने लाल- मरुन रंगाचा सुंदर लेहेंगा घातला होता. या लेहेंग्यावरचं ब्लाऊज अस्सल जडाऊ दागिने वापरून डिझाईन करण्यात आलं होतं (Isha Ambani's classy look in lehenga choli made from real jadau jewellery )... म्हणजे ते ब्लाऊज नेमकं कसं होतं आणि ते कशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलं होतं ते पाहा.

 

ईशाने घातलेली ती लेहेंगा चोली सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केली होती. ईशाच्या लेहेंग्यावरचं ब्लाऊज कसं डिझाईन करण्यात आलं, याविषयीचा एक व्हिडिओ त्यांनीच सोशल मिडियावर शेअर केला आहे.

मंगळसूत्र ब्रेसलेट घ्यायचंय? बघा लेटेस्ट फॅशनचे सुंदर मंगळसूत्र ब्रेसलेट डिझाइन्स, नाजूक-स्मार्ट-सुपरट्रेंडी

यामध्ये ते सांगतात की या ब्लाऊजवर आपल्याला जे काही सोन्या- चांदीच्या धाग्यांनी जडवलेलं दिसत आहे, ते सगळे अस्सल जडाऊ दागिने आहेत. जडाऊ दागिने म्हणजे ज्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये हिरे, मोती, वेगवेगळी रत्नं जडवलेली असतात, असे दागिने. ईशाने तिच्या कलेक्शनमधले अनेक जडाऊ दागिने त्यासाठी दिले होते.

 

आपल्याकडे जडाऊ दागिन्यांसाठी गुजरात आणि राजस्थान ही दोन राज्य प्रसिद्ध आहेत. ईशाने जे काही दागिने दिले होते ते त्या प्रांतातलेच होते. मोती, रुबी, पाचू, हिरे असे अनेक महागडी रत्न तिच्या दागिन्यांवर होती.

मेनोपॉजमुळे शांत झोप नाही- डिप्रेशन येतं? पुजा माखिजा सांगतात ४ पदार्थ खा- मेनोपॉज होईल सुसह्य

त्यापैकी काही दागिने पारंपरिक होते तर काही दागिने अगदी नविन होते. प्रत्येक दागिना वेगवेगळा असल्याने त्याचे वेगवेगळे पीस केले आणि नंतर ते मिसमॅच पद्धतीने लावून ब्लाऊज डिझाईन करण्यात आलं. सोनं आणि चांदीची जर वापरून दागिन्यांचे ते सगळे पीस एकमेकांना आणि कपड्यावर जोडले गेले आणि ईशाचं ब्लाऊज तयार झालं. 

 

टॅग्स :फॅशनईशा अंबानीअनंत अंबानीमुकेश अंबानीनीता अंबानी