आजकालच्या युवा तरुणांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे. वडील चंकी पांडे यांच्याकडून मिळालेला अभिनयाचा वारसा ती अगदी यशस्वीपणे पुढे नेत आहे. अगदी कमी वयात बॉलीवूडमध्ये पदार्पण करून तिने मिळवलेली प्रसिद्धी आणि कमवलेले नाव खरंच कौतुकास्पद आहे.अनन्या पांडेने आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. अनन्या जशी तिच्या अभिनयासाठी लोकप्रिय आहे तशीच ती तिच्या स्टाईल आणि फॅशनसाठी सुद्धा नेहमीच चर्चेत असते. तिचा कोणताही लुक असतो तो व्हायरल होतोच. तिच्या प्रत्येक हटके लूकची कायम सर्वत्र चर्चा होत असते.
Dior या लक्झरी ब्रँडची ब्रँड एम्बेसेडर अनन्या पांडे...
लक्झरी ब्रँड Dior बॅगेचे नवे एक्सक्लूसिव्ह कलेक्शन आपल्या भारतात लॉंच करताना अनन्याने खास नवीन फोटोशूट केले आहे. या फोटोशूट दरम्यान अनन्याने लोकर आणि सिल्कचा वापर करुन तयार करण्यात आलेला सुंदर ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसच्या दोन्ही बाजूला काळ्या रंगांच्या दोन बटणासह दोन्ही बाजूला स्लिट्स कट्स देण्यात आले होते. अनन्याच्या या लूकमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे तिच्या हातांतील इवलुशी गुलाबी रंगाची बॅग.
आलिया भट म्हणाली, मी ही त्यावेळी फार घाबरले होते, नर्व्हस झाले कारण...
दीपिका पादुकोणचा टर्टल नेक टी शर्ट आवडला? ‘टर्टल नेक’ची नवी फॅशन क्रेझ, द्या स्वत:ला नवीन लूक...
या पिंक रंगाच्या बॅगची खासियत नेमकी काय ?
लक्झरी ब्रँड Dior ने अनन्या पांडेसह भारतातील स्त्रियांसाठी एका स्पेशल लेडी बॅगची घोषणा केली आहे. ज्यामध्ये भारताचे सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारताचा समृद्ध वारसा आणि सुंदर रंगांनी सजवलेल्या ह्या बॅग्स लोकांना सुद्धा खूप आवडत आहे. बॅगवर दिसणारे बोल्ड कलर्स, प्रिंट्स, भरतकाम आणि डिझाईन्स हे सर्व भारतीय संस्कृतीशी निगडीत आहे. या बॅग्सच्या डिझाईन्समध्ये हत्ती, वाघ, मोर आणि वनस्पती व अन्य प्राणी सुद्धा दिसत आहेत. या पिंक कलरच्या बॅगमध्ये सोन्याचे भरतकाम केले गेले आहे, जे आयकॉनिक लेडी Dior चा एक भाग आहे. तसेच ऑफिशियल वेबसाइटनुसार, या बॅगची किंमत ४४०००डॉलर इतकी आहे, ज्याची भारतीय चलनात किंमत ३६,०८,४६२ रुपये इतकी आहे.