सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांची लेक अनन्या पांडे (Ananya Panday) ही देखील तितकीच फेमस अभिनेत्री आहे. अनन्या पांडे नेहमीच तिच्या हाय फॅशनेबल लुक्समुळे चर्चेत असते. अनन्या फक्त सिनेमांमुळेच नाहीतर, तिच्या फॅशन सेन्समुळे सध्याच्या तरुणाईत अतिशय लोकप्रिय असलेली अभिनेत्री आहे. सोशल मिडियावर देखील तिचा बोलबाला कायम असतोच. बॉलिवूड आणि सोशल मिडियावर अनन्या सतत अॅक्टिव्ह असल्याचे दिसते(Ananya Panday's Grey Cashmere Jumpsuit Is A Reminder That Winter Is Coming).
चंकी पांडेंची ही लेक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे फॅशनचे वेगवेगळे ट्रेंड फॉलो करून फोटोशूट करत असते. तिने केलेल्या प्रत्येक फोटोशूट नंतर तिची फॅशन, मेकअप, कपडे यावर चर्चा रंगतात. अनन्या हिचं फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. नुकतेच पुन्हा एकदा तिने एका खास इव्हेंटसाठी परिधान केलेल्या अजबगजब जंपसूटची खिल्ली उडवत, नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केल्याचं दिसत आहे. अनन्याने नेमकी अशी कोणती फॅशन केली होती, आणि तिने नक्की कोणत्या प्रकारचा जंपसूट घातला होता हे पाहूयात(‘Lux Cozi with a twist: Ananya Panday's grey cashmere jumpsuit for event leaves the internet confused).
अनन्या पांडेची अनोखी फॅशन...
अनन्या पांडे नुकतीच मुंबईत OTT फेस्ट २०२४ मध्ये सहभागी झाली होती. या खास प्रसंगी तिने परिधान केलेल्या जंपसूटची चर्चा सगळीकडे होत असल्याचे दिसत आहे, नेटकरी तिला फार ट्रोल करत आहेत. अनन्या हिने राखाडी रंगाचा संपूर्ण प्लेन असणारा जंपसूट घातला होता. अनन्या हीने Chloé Fall 2024 कलेक्शनमधील एक आकर्षक राखाडी कश्मीरी जंपसूट घातला होता. या जंपसूटवर तिने त्याला शोभून दिसेल असा सापाच्या डिझाईनचा कॉपर रंगाचा बेल्ट कमरेत घातला होता. तिचा हा लूक खरंतर, खूप हटके होता परंतु नेटकऱ्यांनी त्याची तुलना थंडीत घातल्या जाणाऱ्या थर्मलवेअर्सशी करून तिला खूप ट्रोल केल्याचे दिसत आहे.
मिरर वर्कचे चोली पॅटर्न पाहा! गरबा खेळताना घालावे असे डिझाइन-हजारोंच्या गर्दीत चमकाल इतके भारी...
गरबा खेळताना माथापट्टी तिरकी होते-बिंदी पडून जाते? २ सोप्या युक्त्या-फोटोही येतील एकदम परफेक्ट...
जर आपल्याला आठवत असेल तर पूर्वी जाहिरात यायची. ही जाहिरात लक्स कोझी थर्मलवेअरची होती. या जाहिरातीतील त्या स्त्रीने सेम असाच राखाडी रंगाचा थर्मलवेअर घातला होता. ही जाहिरात थंडीत आपल्याला जास्त थंडी लागू नये म्हणून घातल्या जाणाऱ्या थर्मलवेअरची होती. "लक्स कोझी - थंडी मे भी गरमी का एहेसास" अशी त्या जाहिरातीची टॅग लाईन होती. यात त्या स्त्रीने घातलेला थर्मलवेअर अगदी सेम टू सेम अनन्या ने परिधान केलेल्या जंपसूट सारखाच होता. फक्त त्यात ट्विस्ट काय होत तर अनन्याने कमरेवर घातलेला बेल्ट. यामुळेच नेटकरी तिने घातलेल्या या जंपसूटला, "लक्स कोझी विथ अ ट्विस्ट" असं कमेंट करत तिच्या या जंपसूटची खिल्ली उडवत आहेत.
नेटकऱ्यांनी तर अक्षरशः तिच्या या महागड्या, ट्रेंडी आणि फॅशनेबल जंपसूटची तुलना चक्क त्या थंडीत घातल्या जाणाऱ्या थर्मलवेअरशी केली आहे. नेटकरी एवढी एकच कमेंट करून थांबले नाही तर, एवढ्या भर ऑक्टोबर हिटमध्ये तिने हे थर्मलवेअर का घातले आहे, तसेच असे उबदार कपडे घालण्यासाठीचा हा योग्य सिझन नाही अशी देखील कमेंट केली आहे. तिच्या स्टायलिंगवर कमेंट्स करतानाच काही नेटकर्यांनी तिचा लूक आवडल्याचे देखील कमेंट्सद्वारे सांगितले आहे. एका नेटकऱ्याने, तिच्या बेल्टची डिजाईन आवडल्याचे सांगितले तर दुसऱ्या वापरकर्त्याने तिचा जंपसूट खूप छान आहे अशी कमेंट केली आहे.