Lokmat Sakhi >Fashion > वर्ल्डकप फायनल मॅचला स्वस्तातला गाऊन घातल्याने अनुष्का शर्मा होतेय ट्रोल! पाहा तिच्या गाऊनची किंमत...

वर्ल्डकप फायनल मॅचला स्वस्तातला गाऊन घातल्याने अनुष्का शर्मा होतेय ट्रोल! पाहा तिच्या गाऊनची किंमत...

Anushka Sharma's Dress For The World Cup Final Match: कोण कशामुळे ट्रोल होईल काही सांगता येत नाही... आता अनुष्का शर्माचंच पाहा ना. स्वस्तातला गाऊन घातल्याने ती ट्रोल होतेय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2023 09:13 AM2023-11-23T09:13:27+5:302023-11-23T09:15:01+5:30

Anushka Sharma's Dress For The World Cup Final Match: कोण कशामुळे ट्रोल होईल काही सांगता येत नाही... आता अनुष्का शर्माचंच पाहा ना. स्वस्तातला गाऊन घातल्याने ती ट्रोल होतेय...

Anushka Sharma wore dress for the world cup final match was at affordable price, it costs Rs 7k | वर्ल्डकप फायनल मॅचला स्वस्तातला गाऊन घातल्याने अनुष्का शर्मा होतेय ट्रोल! पाहा तिच्या गाऊनची किंमत...

वर्ल्डकप फायनल मॅचला स्वस्तातला गाऊन घातल्याने अनुष्का शर्मा होतेय ट्रोल! पाहा तिच्या गाऊनची किंमत...

Highlightsकमी किमतीचा असला तरी तो सर्वसामान्यांसाठी महागच आहे. मग तिला ट्रोल का केले जातेय, असा प्रश्न अनु्ष्काच्या चाहत्यांना पडला आहे. 

वर्ल्डकप स्पर्धांमुळे क्रिकेट जगतात मोठाच रणसंग्राम सुरू होता. मागच्या दोन- तीन दिवसांपुर्वी वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला (Cricket world cup final match) आणि ही धुमश्चक्री अखेर थांबली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर सुरुवातीपासूनच पकड जमवली होती ती शेवटपर्यंत कायम ठेवली आणि अखेर विश्वचषक जिंकला. या सामन्याच्या निमित्ताने आता अनेक गोष्टींची चर्चा रंगली आहे. यापैकी एक गोष्ट आहे क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) याची पत्नी तसेच अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने घातलेला पांढरा- निळ्या रंगाचा गाऊन (Anushka Sharma's Dress For The World Cup Final Match)... हा गाऊन तिच्या मानाने खूपच स्वस्त होता, म्हणून ती सध्या ट्रोल होत आहे...

 

सेलिब्रिटींना ट्रोल करण्यासाठी नेटकरी मंडळींना कोणतंही निमित्त चालतं.

नेहमीच्याच पोह्यांना द्या इंदोरी तडका! बघा इंदोरी पोहे करण्याची परफेक्ट रेसिपी, १० मिनिटांत गरमागरम पोहे तयार

कधी कधी सेलिब्रिटींचे कपडे, दागिने खूपच महागडे असतात म्हणून ते ट्रोल होतात तर कधी कधी खूपच स्वस्तातले असतात म्हणूनही त्यांच्याविषयी काय काय बोलले जाते. आता हेच पाहा ना अनुष्काने या सामन्याप्रसंगी घातलेला गाऊन अगदी साधा, डिसेंट पण तेवढाच स्टायलिश होता. तिचा तो गाऊन Flared Halter Dress या नावाने ओळखला जात असून त्याची किंमत ७२५० रुपये आहे. 

 

फ्लोरल प्रिंट असणारा हा गाऊन समर, व्हॅकेशन मूड किंवा बीच ट्रिपसाठी छान आहे. अतिशय सैलसर असणारा हा गाऊन चांगलाच आरामदायी असेल असं त्याचे टेक्स्चर पाहूनच लक्षात येतं.

हिवाळ्यासाठी स्वेटशर्ट घ्यायचे? बघा ३ सुपर स्टायलिश- ट्रेण्डी पर्याय, खिशाला परवडणाऱ्या किमतीत...

सेमी फायनर सामन्यात अनुष्काने घातलेल्या को ऑर्ड शर्ट आणि शॉर्ट्सचीही चांगलीच चर्चा झाली होती. त्या ड्रेसची किंमत २७ हजार रुपये होती. त्या मानाने हा ड्रेस कमी किमतीचा असला तरी तो सर्वसामान्यांसाठी महागच आहे. मग तिला ट्रोल का केले जातेय, असा प्रश्न अनु्ष्काच्या चाहत्यांना पडला आहे. 
 

Web Title: Anushka Sharma wore dress for the world cup final match was at affordable price, it costs Rs 7k

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.