Join us  

करण जोहरच्या पार्टीत तब्बूचा घायाळ करणारा लूक, निळी साडी आणि चर्चा 8 हजारांच्या हिल्सची..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2022 12:09 PM

साडी एवढेच आकर्षक ठरले तब्बूचे 8 हजारांचे सँडल्स, पहा त्याची खासियत

ठळक मुद्देया सँडलची किंमत थोडेथोडकी नाही तर तब्बल ८४९९ रुपये आहे. तिच्या चमचमत्या साडीमुळे आणि हॉट कट असलेल्या ब्लाऊजमध्ये या वयातही ती अतिशय देखणी दिसत होती.

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. यावेळी त्याने बॉलिवूडमधील सगळ्या स्टार्सना जंगी पार्टी दिली. यशराज स्टुडिओमध्ये रंगलेल्या या सोहळ्याला सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. सर्व स्टार्सनी आपल्या खास फॅशन अंदाजात करणच्या पार्टीत काढलेले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यावेळी काजोल, माधुरी दिक्षित, ऐश्वर्या, करिना कपूर, सैफ अली खान, हृतिक रोशन, सलमान खान, शाहरुख खान, जान्हवी कपूर, रणबीर कपूर, कतरिना कैफ, मनीष मल्होत्रा, तब्बू या सगळ्याच स्टार्सचे फोटो आपण पाहिले. या सगळ्यांनी घातलेले कपडे आणि त्यांचे लूक्स याबाबत चांगलीच चर्चाही झाली. आता याच पार्टीतल्या आणखी एका व्यक्तीच्या फॅशनबद्दल चर्चा सुरू आहे. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू.

(Image : Google)

या बर्थडे पार्टीमध्ये करणला शुभेच्छा देण्यासाठी तब्बूने खास निळ्या रंगाची शिमर साडी नेसली होती. प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा याने डिझआईन केलेल्या या साडीत तब्बू अतिशय हॉट दिसत होती. तिच्या चमचमत्या साडीमुळे आणि हॉट कट असलेल्या ब्लाऊजमध्ये या वयातही ती अतिशय देखणी दिसत होती. जास्त दागिने न घालता तब्बूने या लूकवर घातलेल्या सिल्व्हर कानातल्यांमुळे ती लक्ष वेधून घेत होती. तिच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आजही ती अनेकांसाठी दिल की धडकन आहे. 

(Image : Google)

या सगळ्याबरोबरच तब्बूने या पार्टीमध्ये घातलेल्या सँडल्सचीही बरीच चर्चा झाली. सिल्व्हर रंगाचे राऊंड ब्लॉक हिल्समध्ये ती आणखीनच छान दिसत होती. हाय हिल्स असली तरी हे सँडल अतिशय कम्फर्टेबल असल्याने त्यामध्ये वावरणे सोपे जात असावे. यामुळेच या सँडलची किंमत थोडेथोडकी नाही तर तब्बल ८४९९ रुपये आहे. पुढे एक सिल्व्हर नाजूक पट्टी आणि मागच्या बाजूला क्रॉस जाणारी आणखी एक सिल्व्हर पट्टी असे साधे डिझाईन असलेले हे सँडल अपराजिता टूर या ब्रँडचे आहेत.  

 

टॅग्स :फॅशनतब्बूकरण जोहरब्यूटी टिप्स