ब्रेसियर हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. आरोग्यासाठीही महत्त्वाची आणि लूकसाठीही. प्रत्येक आऊटफिटनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेसियर अनेकजणी घालतात. कपड्यांनुसार वेगवेगळ्या साइजच्या, आकाराच्या, रंगांच्या ब्रेसियर असतात. पण रात्री झोपतानाही अनेकजणी ब्रेसियर घालून झोपतात मात्र काही प्रकारच्या ब्रेसियर घालून तब्येतीचं नुकसान होतं.
दिवसभर ब्रेसियर घातल्यानंतर घरी किंवा रात्री झोपताना आपण ती कधी काढतो असे अनेकींना होते. शक्यतो सगळ्याचजणी रात्री झोपताना ब्रेसियर न घालताच झोपणे पसंत करतात. परंतु काहीजणींना ब्रेसियर घालून झोपण्याची सवय असते. ब्रेसियर घालून झोपल्याने नेमके काय होते किंवा कोणत्या प्रकारच्या ब्रेसियर घालून झोपू नये याबद्दल फारशी माहिती नसते(Avoid Wearing These Bras While Sleeping At Night).
रात्री झोपताना कोणत्या प्रकारच्या ब्रेसियर घालून झोपू नये ?
१. एकदम फिटिंगची किंवा अगदी घट्ट ब्रेसियर घालून झोपू नये. २. रात्री झोपताना पॅडेड ब्रा, वायर्ड ब्रा किंवा फॅन्सी डिझाइन असलेली ब्रा घालू नये.
३. त्याऐवजी जर तुम्हाला ब्रा घालून झोपायची सवय असेल तर अशावेळी तुम्ही लॉंन्ग ब्रा घालून झोपू शकता.४. ब्रेसियर खूप घट्ट असल्यामुळे झोपताना त्याच्या पट्ट्या त्वचेवर टोचायला लागतात. यामुळे त्वचाविकार होऊ शकतात.
५. लेस किंवा नेट डिझाईन असलेल्या ब्रा आपल्या शरीरासाठी आरामदायक व त्वचेसाठी योग्य नसतात.६. बॉडी पोश्चरवर देखील याचा वाईट परिणाम होतो.७. जर ब्रेसियर घालूंन झोपण्याची सवय असेल किंवा नाईलाज असेल तर सैल सूती कापडाची किंवा स्ट्रेचेबल फॅब्रिकची ब्रेसियर घालावी.