Lokmat Sakhi >Fashion > बनारसच्या विणकरांकडे वाढली राम मंदिर थीम साडीची मागणी, पाहा कशी दिसते ती सुंदर साडी..

बनारसच्या विणकरांकडे वाढली राम मंदिर थीम साडीची मागणी, पाहा कशी दिसते ती सुंदर साडी..

Ayodhya Ram Mandir Themed Customised Banarasi Sarees: येत्या काही दिवसांत राम मंदिर थीम साड्या फॅशन स्टेटमेंट म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या, तर त्याचं आश्चर्य वाटायला नको.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2024 07:19 PM2024-01-22T19:19:55+5:302024-01-22T19:20:56+5:30

Ayodhya Ram Mandir Themed Customised Banarasi Sarees: येत्या काही दिवसांत राम मंदिर थीम साड्या फॅशन स्टेटमेंट म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या, तर त्याचं आश्चर्य वाटायला नको.

Ayodhya Ram Mandir themed based customised banarasi sarees are in demand  | बनारसच्या विणकरांकडे वाढली राम मंदिर थीम साडीची मागणी, पाहा कशी दिसते ती सुंदर साडी..

बनारसच्या विणकरांकडे वाढली राम मंदिर थीम साडीची मागणी, पाहा कशी दिसते ती सुंदर साडी..

Highlightsकाठांवर राम दरबार असावा, अशा पद्धतीच्या साडीची ऑर्डर करणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक असून कस्टमाईज साड्यांपैकी काही ऑर्डर अमेरिकेतून आल्याचे विणकरांनी सांगितले.

अयोध्येमध्ये रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. या सोहळ्याची तय्यत तयारी मागच्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. आपल्याला माहिती आहेच की देशभरात सर्वसामान्य लोकांनीही या सोहळ्याची खूपच उत्साहात तयारी केली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सीतामातेची साडी खास गुजरातमधून तयार करून पाठविण्यात आली होती. कळतनकळतपणे या सोहळ्याचा दुरोगामी परिणाम बऱ्याच क्षेत्रांवर होत आहे, तसाच तो कपडा मार्केट आणि खासकरून साडी बाजारातही दिसून आला. आता या सोहळ्यानंतर राम मंदिर थीम असणाऱ्या कस्टमाईज साड्यांची मागणी वाढली असल्याचं चित्र बनारसमध्ये दिसून येत आहे. (Ayodhya Ram Mandir themed based customised banarasi sarees are in demand )

 

economictimes यांनी दिलेल्या वृत्तानुसार मागील काही दिवसांपासून बनारस येथील विणकरांकडे कस्टामाईज बनारसी साड्यांची मागणी वाढलेली आहे.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पोहचलेल्या सेलिब्रिटींचे सुंदर पारंपरिक लूक : माधुरी दीक्षित ते आलिया भट

या कस्टमाईज साड्यांच्या ऑर्डरमध्ये राम मंदिर सोहळ्याची गहिरी छटा पाहायला मिळत असून महिलांना श्रीराम, सीता, अयोध्या, शरयू घाट, राम मंदिर, धनुष्यबाण, 'श्रीराम' ही अक्षरे लिहिलेली साडी यांची मागणी होत आहे. वीणकरांनी काही कस्टमाईज साड्या तयार केल्या आहेत. त्यापैकी एका साडीच्या पदरावर अयोध्या मंदिर विणलेले आहे. 

 

दुसऱ्या साडीच्या काठांवर सगळीकडे 'श्रीराम' ही अक्षरे विणण्यात आली आहेत, तर तिसऱ्या प्रकारच्या  साडीवर रामाच्या बालपणापासून ते रामराज्याभिषेकापर्यंतची अनेक दृष्ये विणण्यात आली आहेत.

वजन कमी करून अमृता खानविलकरसारखं फिट व्हायचं? मग करून पाहा ती रोज करते त्या ४ गोष्टी

काठांवर राम दरबार असावा, अशा पद्धतीच्या साडीची ऑर्डर करणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक असून कस्टमाईज साड्यांपैकी काही ऑर्डर अमेरिकेतून आल्याचे विणकरांनी सांगितले. साधारण ७ हजार ते १ लाख रुपये या दरम्यान या साड्यांची किंमत असेल. 
 

Web Title: Ayodhya Ram Mandir themed based customised banarasi sarees are in demand 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.