अभिनेत्री अंकिता लोखंडे (Actress Ankita Lokhande) सोशल मीडियावर खूप जास्त ॲक्टिव्ह असते. त्यामुळे तिचे आणि तिचा नवरा विकी जैन (Vicky Jain) यांचे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन केलेले फोटोशूट तिच्या चाहत्यांना नेहमीच बघायला मिळते. आता पुन्हा एकदा अंकिताने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती चक्क दुसऱ्यांदा लग्न करताना दिसत आहे (Ankita Lokhande in her second marriage with husband Vicky Jain). पण असे असले तरी दुसऱ्या लग्नापेक्षा तिने नेसलेल्या गुलाबी सिक्विन साडीचीच (Baby pink colour sequined saree) जास्त चर्चा होत आहे.
अंकिता लोखंडेचं दुसरं लग्न... हे ऐकून कदाचित तिच्या चाहत्यांना धक्का बसला असेल. पण मुळात गंमत अशी आहे की तिने तिचा नवरा विकी जैन याच्याशीच पुन्हा दुसऱ्यांदा ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले आहे.
चल रे भोपळ्या टुणूक टुणूक म्हणत मुलंही आवडीनं खातील भोपळ्याचं धिरडं! नाश्त्यासाठी खमंग रेसिपी
यावेळी विकीने आकर्षक सूट घातलेला असून अंकिताने अतिशय सुंदर अशी गुलाबी रंगाची सिक्विन साडी नेसली आहे. गुलाबी साडीवर गुलाबी मेकअप करणारी अंकिता खरोखरच खूपच देखणी दिसत आहे. त्यामुळेच तर अंकिताची दुसऱ्या लग्नाची आणि गुलाबी सिक्विन साडीची पोस्ट सध्या चांगलीच गाजते आहे.
कशी आहे अंकिताची साडी?
आधी सांगितल्याप्रमाणे अंकिताची साडी सिक्विन प्रकारातली असून तिच्यावर खूपच भरगच्च सिक्विन वर्क केले आहे. त्यामुळे साडी एकदमच चमकदार आहे. शिवाय साडीला वेगळे काठ नाहीत आणि तिचा पदरही वेगळा नाही.
निमुळत्या तोंडाच्या बाटलीत तेल-पाणी ओतताना सांडतं? शेफ कुणाल कपूर सांगतात १ उपाय, सांडलवंड बंद
तरीही साडी लक्षवेधक ठरली आहे. या साडीवर बेल्ट असून तो ही साडीच्याच रंगाचा आणि भरगच्च सिक्विन वर्क असलेला आहे. यावर ब्रालेट प्रकारचं ब्लाऊज अंकिताने घातलं असून ते ही पुर्णपणे साडीसारखंच आहे. बेबी पिंक रंगाच्या साडीवर अंकिताने बेबी पिंक रंगाचाच ग्लॉसी मेकअप केला आहे. गळ्यात खड्यांचा मोठा नेकलेस आणि कानात आणि हातात काहीच घातलेले नाही.