Lokmat Sakhi >Fashion > बॅकलेस ड्रेस घातला की ब्रेसियची पट्टी दिसते? २ सोप्या टिप्स- दिवाळी पार्टीसाठी करा खास लूक...

बॅकलेस ड्रेस घातला की ब्रेसियची पट्टी दिसते? २ सोप्या टिप्स- दिवाळी पार्टीसाठी करा खास लूक...

Backless Women's Lingerie : Best Bras for Backless Dresses : Transparent Strap Bra : Backless Bra Low Back strapless dress Hack Trick Invisible braless : बॅकलेस किंवा डिपनेक यातून ब्रेसियरची पट्टी दिसू नये यासाठी वापरा या ब्रेसियर अ‍ॅक्सेसरीज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2024 02:38 PM2024-10-28T14:38:08+5:302024-10-28T14:58:30+5:30

Backless Women's Lingerie : Best Bras for Backless Dresses : Transparent Strap Bra : Backless Bra Low Back strapless dress Hack Trick Invisible braless : बॅकलेस किंवा डिपनेक यातून ब्रेसियरची पट्टी दिसू नये यासाठी वापरा या ब्रेसियर अ‍ॅक्सेसरीज...

Backless Women's Lingerie Backless Bra Low Back strapless dress Hack Trick Invisible braless Best Bras for Backless Dresses | बॅकलेस ड्रेस घातला की ब्रेसियची पट्टी दिसते? २ सोप्या टिप्स- दिवाळी पार्टीसाठी करा खास लूक...

बॅकलेस ड्रेस घातला की ब्रेसियची पट्टी दिसते? २ सोप्या टिप्स- दिवाळी पार्टीसाठी करा खास लूक...

आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळी म्हटलं की नव्या कपड्यांची खरेदी ओघाने आलीच. दिवाळीत येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी एक अशाप्रमाणे आपण कपडे खरेदी करतोच. दिवाळीसाठी कपडे खरेदी करताना शक्यतो आपण लेहेंगा, सलवार कुर्ता अशा प्रकारातील वेगवेगळे कपडे घेतो. असे कपडे घेताना आपण जरा ट्रेंडी आणि हटके लूक देणारेच कपडे खरेदी करतो. पंजाबी सूट, ब्लाऊज, सलवार कुर्ता अशा कपड्यांचे गळे थोडे मोठे आणि डिप नेकचे असतात. डिपनेकचे असे ड्रेसेस, ब्लाऊज घातल्यावर तुम्हाला अगदी फेस्टिव्ह लूक देतात. मागून डिप नेकलाईन किंवा अरुंद मोठे गळे दिसताना खूपच सुंदर दिसतात. पण असे डिपनेकचे ड्रेस घातल्यावर एक सर्वात मोठी अडचण येते ती म्हणजे ब्रेसियर आणि ब्रेसियरची पट्टी. डिपनेक किंवा मोठा गळा असणारे ड्रेस किंवा ब्लाऊज घातल्यास आपल्या ब्रेसीयरची पट्टी किंवा ब्रेसियर दिसते, यामुळे या ड्रेसचा पूर्ण लूकच खराब होतो. अशा आयत्यावेळी काय करावे समजत नाही . 

ड्रेसचे मोठे गळे किंवा डिपनेक यातून ब्रेसियर आणि तिची पट्टी दिसू नये म्हणून आपण इनव्हिजिबल ब्रेसियर वापरु शकता. सध्या अशा इनव्हिजिबल ब्रेसियर आपल्याला बाजारांत किंवा ऑनलाईन अगदी सहज विकत मिळतात. या इनव्हिजिबल ब्रेसियर नावाप्रमाणेच इनव्हिजिबल असतात. त्या आपल्या ड्रेस, ब्लाऊज यांच्या आत अगदी फिट बसतात. याचप्रमाणे, या ब्रेसियर आपल्या स्तनांना योग्य तो सपोर्ट करून आपल्याला अगदी परफेक्ट लूक देतात(Backless Bra Low Back strapless dress Hack Trick Invisible braless).

 १. इनव्हिजिबल पॅडेड ब्रेसियर :- इनव्हिजिबल ब्रेसियर आपण डिपनेक ब्लाऊज, ड्रेसेस यांच्या आत घालू शकतो. या ब्रेसियर आपल्या कपड्यांच्या आत अगदी फिट बसतात, तसेच यांच्या वापराने ब्रेसियर आणि त्याची पट्टी दिसण्याचा प्रश्नच येत नाही. इनव्हिजिबल ब्रेसियर या सिलिकॉन मटेरियल पासून तयार झालेल्या असतात. अशा प्रकारच्या ब्रेसियर्सना स्ट्रिप्स नसतात. या सिलिकॉन मटेरियलपासून तयार झालेल्या ब्रेसियर्सच्या आतल्या बाजूने त्वचेवर ती ब्रा चिटकवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा ग्लू लावलेला असतो. या ब्रेसियर वरील प्लॅस्टिकचे आवरण काढून ज्या भागावर ग्लू लावला आहे तो भाग आपल्या स्तनांवर चिकटून घ्यावा. यामुळे त्या ग्लूच्या मदतीने ब्रेसियर आपल्या स्तनांवर अगदी आपोआप चिकटते. त्यानंतर आपण त्यावर बॅकलेस, डिपनेक ड्रेस अगदी बिनधास्तपणे घालू शकतो. यामुळे आपल्या बॅकलेस, डिपनेक ब्लाऊज किंवा ड्रेसमधून आपली ब्रेसियर किंवा तिची पट्टी दिसण्याच्या प्रश्नच येणार नाही. याचबरोबर ही इनव्हिजिबल ब्रेसियर आपण अनेकदा वापरु शकता. एकदा वापरुन झाल्यावर ही ब्रेसियर काढून ज्या भागावर ग्लू लावला आहे त्या भागावर प्लास्टिकचे आवरण पुन्हा होते तसेच लावून ठेवावे. यामुळे आपण ही इनव्हिजिबल ब्रेसियर एक नाही तर अनेकवेळा वापरु शकतो. 

इनव्हिजिबल पॅडेड ब्रेसियर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

https://amzn.to/3YGiyda 

२. इनव्हिजिबल ब्रेसियर पट्टी :-  इनव्हिजिबल ब्रेसियर प्रमाणेच आपण बॅकलेस, डिपनेक ड्रेसेस ब्लाऊजमध्ये इनव्हिजिबल ब्रेसियर पट्टीचा देखील वापर करु शकतो. या ब्रेसियरच्या पट्ट्या (Transparent Strap Bra) संपूर्णपणे पारदर्शक असतात. त्यामुळे या बॅकलेस, डिपनेक ड्रेसेसमध्ये शक्यतो पटकन दिसून येत नाही. आपल्या नेहमीच्या कापडाच्या ब्रेसियरला कापडाचे हुक असतात तसेच हुक या पारदर्शक पट्टयांना देखील असतात. हे हुक एकमेकांत अडकवून आपण या ब्रेसियरचा वापर करु शकतो. हे हुक रिमुव्हेबल असतात आपण हे पाहिजे तेव्हा काढू घालू शकतो. 

इनव्हिजिबल ब्रेसियर पट्टी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

https://amzn.to/40fQe2C

अशाप्रकारे आपण इनव्हिजिबल ब्रेसियर आणि पट्ट्यांचा वापर करून बॅकलेस, डिपनेक ड्रेसेस ब्लाऊज अगदी निसंकोचपणे घालू शकतो.

Web Title: Backless Women's Lingerie Backless Bra Low Back strapless dress Hack Trick Invisible braless Best Bras for Backless Dresses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.