Lokmat Sakhi >Fashion > राधिका मर्चंटने नेसली होती ती ‘लेहेंगा साडी’ नेमकी असते कशी? साडीचा नवा सुंदर ट्रेण्ड

राधिका मर्चंटने नेसली होती ती ‘लेहेंगा साडी’ नेमकी असते कशी? साडीचा नवा सुंदर ट्रेण्ड

Beauty Of Radhika Marchant's Customize Lehenga Saree: प्री- वेडिंग सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी राधिका मर्चंटने नेसलेली कस्टमाईज लेहेंगा साडी खूप सुंदर पद्धतीने तयार करण्यात आली होती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2024 09:18 AM2024-03-06T09:18:10+5:302024-03-06T09:20:02+5:30

Beauty Of Radhika Marchant's Customize Lehenga Saree: प्री- वेडिंग सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी राधिका मर्चंटने नेसलेली कस्टमाईज लेहेंगा साडी खूप सुंदर पद्धतीने तयार करण्यात आली होती.

Beauty of Radhika Marchant's customize lehenga saree during per wedding program, how is lehenga saree? | राधिका मर्चंटने नेसली होती ती ‘लेहेंगा साडी’ नेमकी असते कशी? साडीचा नवा सुंदर ट्रेण्ड

राधिका मर्चंटने नेसली होती ती ‘लेहेंगा साडी’ नेमकी असते कशी? साडीचा नवा सुंदर ट्रेण्ड

Highlightsया साडीवर राधिकाने जे ब्लाऊज घातले होते, त्यावरही भरगच्च जाळीवर्क आणि वीणकाम केलेले होते.

उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा म्हणजे अनंत अंबानी (Anant Ambani). अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री- वेडिंग सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या संपूर्ण कार्यक्रमात राधिका मर्चंटच्या सौंदर्याने अनेकांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या. गोंडस चेहऱ्याची आणि लाघवी हास्य असणारी राधिका अनेकांची मनं जिंकून गेली. त्याचबरोबर तिच्या स्टाईलचीही खूप चर्चा झाली. प्री- वेडिंग सोहळ्यातील हस्ताक्षर कार्यक्रमात तिने नेसलेली कस्टमाईज लेहेंगा साडीदेखील खुप वैशिष्ट्यपूर्ण होती. (Beauty Of Radhika Marchant's Customize Lehenga Saree)

 

लेहेंगा साडी हा ट्रेण्ड आता खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे हल्ली बऱ्याच सेलिब्रिटीही लेहेंगा साडीला प्राधान्य देताना दिसत आहेत. ही साडीच असते, फक्त ती लेहेंगा पद्धतीने नेसली जाते. लेहेंगा साडी या प्रकारात साडीची पारंपरिकता जपत तिला लेहेंग्याचा एक हलकासा मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मॉडर्न आणि ट्रॅडिशनल यांचं कॉम्बिनेशन पाहिजे असेल, तर त्याला एकदम बेस्ट पर्याय म्हणून लेहेंगा साडीकडे पाहिले जाते. राधिका मर्चंट हिने जी लेहेंगा साडी नेसली होती ती सेलिब्रिटी फॅशन डिझायनर तरुण ताहिलियानी यांनी डिझाईन केली होती. 

 

कशी होती राधिका मर्चंटची लेहेंगा साडी?

हस्ताक्षर सोहळ्यासाठी राधिकाने जी साडी नेसली होती ती हलक्याच्या पिवळसर केशरी रंगाची होती. त्या संपूर्ण कार्यक्रमाची थीम 'valley of the gods' अशी होती. त्यामुळे त्या थीमनुसार साडीची रंगसंगती ठरविण्यात आली होती. या संपूर्ण साडीवर रोजगोल्ड आणि चांदीची जर वापरून वीणकाम करण्यात आले होते. तसेच साडीच्या खालच्या बॉर्डरवर पेस्टल रंग वापरून अतिशय भरगच्च काशिदावर्क होते. या साडीवर राधिकाने जे ब्लाऊज घातले होते, त्यावरही भरगच्च जाळीवर्क आणि वीणकाम केलेले होते. या साडीवर राधिकाने हिऱ्यांचे दागिने घालण्यास प्राधान्य दिले. 

 

Web Title: Beauty of Radhika Marchant's customize lehenga saree during per wedding program, how is lehenga saree?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.