बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपल्या लूकमध्ये काहीतरी बदल करावा. आता लूकमध्ये बदल करायचा म्हणजे सगळ्यात मुख्य काम करावं लागतं ते आपल्या केसांवर किंवा हेअरस्टाईलवर. कारण केसांच्या रचनेमध्ये केलेला थोडासा बदल आपलं पुर्ण व्यक्तिमत्त्वच बदलून टाकतो. त्यामुळे मग काही जणी नुसती हेअरस्टाईल बदलून पाहतात तर काही जणी हेअरकट करतात. आता हेअरकट करायचं म्हटलं तर खूप कन्फ्यूज होतं की आपल्या चेहऱ्याला नेमका कोणता हेअरकट सूट होऊ शकतो (Best AI hairstyle app to check hairstyle online). शिवाय एकदा हेअरकट केला आणि तो आपल्या चेहऱ्याला शोभून दिसला नाही, तर त्यात पुन्हा दुरुस्ती करण्याचा खूपच कमी स्कोप उरतो (How to check my hairstyle online?). म्हणूनच हेअरकट करण्यापुर्वी एकदा ऑनलाईन उपलब्ध असणाऱ्या AI Hairstyle App ची मदत घेऊन पाहा. (App to chech which haircut suits you)
सध्या बरीच कामं आपण ऑनलाईन करतोच आहोत. तर हे कामही ऑनलाईन पद्धतीने करून पाहायला काही हरकत नाही. या ॲपचं काम असं आहे की ते जणू हेअरकट केल्यानंतरचा आपला भविष्यातला चेहराच आपल्याला आरशात दाखवत आहेत. त्यामुळे हेअरकट करण्याआधी हे मजेशीर गोष्ट एकदा ट्राय करूनच पाहावी, अशी आहे.
तोंडात टाकताच विरघळेल अशी तिळाची मऊसूत बर्फी- सगळ्यांनाच आवडेल असा खास पदार्थ
दोन पद्धतींनी या ॲपचे काम चालते. यातल्या पहिल्या प्रकारात आपण हेअरस्टाईल निवडायची आणि ती हेअरस्टाईल आपल्या चेहऱ्यावर कशी दिसते, हे ते ॲप आपल्याला दाखवते. तर दुसऱ्या प्रकारात आपली चेहरेपट्टी पाहून आपल्याला कोणती हेअरस्टाईल छान दिसेल, याचे पर्याय ते ॲपच देते.
आहे की नाही ही एकदम भारी गोष्ट? सध्या आपल्याला या गोष्टी नव्या वाटत असल्या तरी अनेकजण अगदी सराईतपणे याचा वापर करत आहेत आणि त्याच्या मदतीने स्वत:ला एकदम स्टायलिश लूक देत आहेत.
केस गळण्याची ३ मुख्य कारणं आणि त्यावरचे ३ सोपे उपाय- केस गळणं थांबूनच जाईल
YouCam Makeup (Android & iOS), Perfect Hairstyle New Hair Cut (iOS), Hairstyle Try On (iOS), Hairstyle Try On: Bangs & Wigs ही काही प्रसिद्ध ॲप आहेत.