भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री. भूमीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या क्षमतेने अतिशय कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. भूमी पेडणेकर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमध्यें चर्चेत असते. २०१५ मध्ये अभिनयात पदार्पण केल्यानंतर पहिलाच सिनेमा 'दम लगाके हैशा' ने तिला अनेक पुरस्कार मिळवून दिले.
इतकेच नाही तर, अवघ्या सात वर्षांच्या तिच्या अभिनय कारकिर्दीत ती अनेक पुरस्कांराची मानकरी ठरली आहे. भूमीने नुकतेच एक खास फोटोशूट केले. ड्रेसचे हटके लूकमधील फोटो तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहे. भूमी नेहमीच तिच्या अभिनयासोबत खास फॅशन स्टाइलसाठीही ओळखली जाते. तिचा प्रत्येक लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याचे काम करतो. नुकतेच तिने विंटेज सेक्सी ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. तिने एका इव्हेंट दरम्यान कट-आउट डिटेल ड्रेस परिधान केला होता(Bhumi Pednekar’s black vintage Mugler dress bore a deep thunderbolt neck slit).
भूमीच्या विंटेज ड्रेसची काय आहे खासियत...
भूमीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन तिने परिधान केलेल्या खास ड्रेसमधील फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये भूमी काळ्या रंगाच्या मिडी ड्रेसमध्ये दिसते. हा ड्रेस तिने जवळपास ३४ वर्षे जुन्या म्हणजेच १९८९ सालच्या मुगलर ब्रँडच्या फॉल विंटर कलेक्शनमधून निवडला आहे. हा विंटेज ड्रेस फ्रेंच फॅशन डिझायनर थियरी मुगलर(Thierry Mugler - French Fashion Designer) यांनी डिझाइन केला होता, त्यांचे २३ जानेवारी २०२२ रोजी निधन झाले. या ड्रेसमध्ये कट-आउट तपशील देण्यात आला होता, जो विशेष लक्ष वेधून घेत होता. भूमीने परिधान केलेला हा फुल स्लीव्हज ड्रेस बनवण्यासाठी रेयॉन आणि व्हिस्कोस सारख्या फॅब्रिक्सचा वापर करण्यात आला होता. समोरच्या बाजूस झिग झॅग डिझाइन पॅटर्न देण्यात आले होते, ज्यावर काळ्या रंगाचे नेटेड फॅब्रिक लावले होते.
प्रियांका चोप्राच्या लिटिल देसी गर्लच्या ओव्हरकोटची चर्चा, हा ओव्हरकोट इतका महाग का ?
सोनम कपूर साडी नेसून गेली आयपीएलचा सामना पहायला, फॅब्रिक असं भारी की साडीतही उकडलं नाही...
भूमी या काळ्या रंगांच्या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिचा पोशाख पूर्णपणे इको-फ्रेंडली होता. म्हणजेच हा पोशाख पर्यावरणाचा विचार करुनच बनवण्यात आला आहे, असेही तिने तिच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी, भूमीने काळ्या रंगाच्या हाय हिल्स घातल्या आहेत. कानात ड्रॉपडाउन डायमंड झिकझॅक डिजाईन्सच्या इअररिंग्स घातल्या आहेत. भूमीने या लुकला शोभेल असा मेकअप देखील केला आहे. मेकअप करताना तिने हेवी फाउंडेशन, शार्प कॉटूर, रोजी चीक्स, मरून लिप शेड, कोल्ड आईज असा साजशृंगार करुन आपला देखणा मेकअप लूक पूर्ण केला आहे. या काळ्या रंगाच्या ड्रेसला शोभेल अशी स्लीक बन हेअर स्टाईल केली होती.