Join us  

ब्लाऊज सैल झालं- खांद्यावरुन उतरतं आहे? फक्त १ मिनिटांत करा परफेक्ट फिटिंग, बघा सोपी ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2023 3:34 PM

How To Tighten a Loose Saree Blouse Without Stitching: असं झालं तर उगाच ब्लाऊजला शिवत बसू नका. त्यापेक्षा हा एक साेपा उपाय करा....

ठळक मुद्दे ब्लाऊज जर सैल झालं, खांद्यावरून उतरू लागलं, तर ते शिवत बसू नका. त्याऐवजी सेफ्टीपिनचा हा सोपा उपाय करून पाहा..

आता नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्री म्हटलं की हळदी- कुंकू, देवीचे काही कार्यक्रम असं असतंच. किंवा काही वर्किंग वुमन त्यांच्या ऑफिसमध्ये दररोज साड्या नेसायचं ठरवतात. असं झालं की मग कपाटातल्या बंद साड्या आणि ब्लाऊज बाहेर येऊ लागतात. खूप दिवसांनी आपण साडी- ब्लाऊज बाहेर काढतो. दरम्यानच्या काळात आपल्या वजनाचा काटा डावीकडे- उजवीकडे सरकून जातो. त्यामुळे मग बऱ्याचदा ब्लाऊजची फिटिंग बिघडलेली असते (How to tighten a loose saree blouse without stitching). अशावेळी ब्लाऊज जर सैल झालं, खांद्यावरून उतरू लागलं, तर ते शिवत बसू नका. त्याऐवजी सेफ्टीपिनचा हा सोपा उपाय करून पाहा.. (Simple and quick trick for the perfect fitting of loose blouse)

 

ब्लाऊज सैल झालं तर काय करावं?

हा उपाय इन्स्टाग्रामच्या dolly.jain या पेजवर सुचविण्यात आला आहे. 

हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त १ सेफ्टीपिन लागणार आहे. 

कोणते आजार कमी करण्यासाठी कोणता सुकामेवा खाणं ठरतं फायदेशीर, बघा आयुर्वेद काय सांगतो....

यासाठी छातीच्या समोरच्या भागात ब्लाऊजला एक अढी घालून ते दुमडून घ्या आणि नंतर ते ब्लाऊज तुमच्या ब्रासोबत पिनअप करून घ्या. 

ब्लाऊज जरा जास्तच सैल असेल तर खांद्याच्या थोडं खालच्या भागात समोरच्या दोन्ही बाजूंनी ब्लाऊजला अढी घालून ते दुमडून घ्या आणि दोन्ही बाजूंनी ब्रा सोबत पिनअप करून घ्या.

ब्लाऊज जर कंबरेत सैल होत असेल तर मागच्या बाजूने व्यवस्थित खाली ओढून घ्या. डावीकडच्या आणि उजवीकडच्या बाजूने पुढे ओढा आणि दोन्ही बाजूने ब्रा ला जोडून पिनअप करा.

 

बांगडीचा उपाय

ब्लाऊज पोटाजवळ सैल होत असेल तर बांगडी वापरूनही ते परफेक्ट फिटिंगचं करता येतं. शिवाय ब्लाऊजला एक छान स्टायलिश फॅशनेबल लूक मिळतो.

नवरात्रात ९ दिवस उपवास करणार? ३ ड्रायफ्रुट्स, आजच खरेदी करा कारण..

यासाठी ब्लाऊजच्या मागच्या भागात मधोमध एक बांगडी आतल्या बाजुने ठेवा आणि तिला ब्लाऊजच्या रंगाशी मिळतंजुळतं असणारं रबरबॅण्ड अगदी घट्ट लावून टाका. 

 

टॅग्स :फॅशनहोम रेमेडीसाडी नेसणेनवरात्री