महिलांच्या फॅशन्समध्ये अलिकडच्या १० वर्षांत फॅशनमध्ये बरेच बदल झाले आहेत. अनेकजणी स्वत:ही फॅशन एक्सपेरिमेण्ट करत नव्या गोष्टी वापरुन पाहतात. आता त्यापैकीच एक प्रॉडक्ट आहे, त्याबूब टेप. आता तुम्ही विचार करत असाल की बुब टेप हे नक्की काय आहे? मोठ्या गळ्याचा ड्रेस, मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालताना अनेकदा अडचणी येतात, कधी कधी स्तन दिसतात तर कधी स्तनाग्र दिसतात. ते ऑकवर्ड वाटू शकतं. अशावेळी या बुब्स टेप वापरल्या जातात. (What is boob tape and how to use it)
बूब टेप म्हणजे काय? (What is boob tape)
नावाप्रमाणेच, बूब टेप म्हणजे स्तनाला जोडलेली टेप ज्यानं स्तन व्यवस्थित राहतात. ही फॅब्रिक टेप त्वचेसाठी डिझाइन केलेली एक टेप आहे, ज्यामुळे स्तनाचा आकार खूप टोन्ड दिसतो आणि थोडासा वरचा आकार दिसून येतो. पुश अप ब्रा प्रमाणे. या टेप अनेक वेगवेगळ्या रंगात येतात. त्याच्या किमतीही फॅब्रिकप्रमाणे वेगवेगळ्या आहेत. मात्र बूब टेप वापरण्यापूर्वी प्रथम पॅच चाचणी करा. अनेक टेप हायपोअलर्जेनिक आणि लेटेक्स मुक्त असतात. पण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. योग्य खबरदारी न घेतल्यास तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते.
बूब टेप कसे वापरायचे? (How to use boob tape)
१) प्रथम त्वचा व्यवस्थित पुसणे आवश्यक आहे. जेणेकरून घाम किंवा तेल त्वचेत राहणार नाही.
२) त्वचेला कोणतेही लोशन वगैरे लावू नका कारण लोशन लावले तर टेप नीट चिकटणार नाही.
३) कपड्याच्या आतून दिसणार नाही अशा ठिकाणी टेप लावावा लागेल हे ठेवा. एक्स्ट्रा टेप कापून टाका.
४) ज्या टॉपची नेक लाईन खूप कमी आहे अशा लो कट टॉप्ससाठी याचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय क्रॉप टॉप, बॉडी फिटींग ड्रेसमध्येही ही बुब टेप वापरता येते. बॅकलेस ड्रेसेससाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. टॉप्स, चोळी, ब्लाउज इत्यादी ज्यांचा आकार बदलत राहतो आणि अशा स्थितीत ब्रा चा खालचा भाग लपवणं जवळजवळ अशक्य होते. अशा परिस्थितीत, बूब टेप खूप उपयुक्त पर्याय ठरू शकतो.
ब्रेस्ट एरियातून टेप काढून टाकण्यासाठी काय करायचं?
१) सर्व प्रथम, त्या भागावर ऑलिव्ह ऑईल किंवा इतर कोणतेही तेल लावा जेणेकरून टेप सहज निघू शकेल. त्यानंतर हळू हळू बाहेर काढा.
२) त्यात पाणी लागू देऊ नका कारण त्यामुळे त्वचेला जास्त नुकसान होते. या टेप्स घाम आणि पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी बनविल्या जातात आणि यामुळे त्या अधिक चिकट असतात. जर तुमची त्वचा सपोर्ट करत असेल आणि स्तनामध्ये कोणतीही समस्या नसेल तरच हे उत्पादन तुमच्यासाठी योग्य आहे.