Join us  

नवरीने लग्नात घातला चक्क डेनिमचा लेहेंगा तर नवरदेवाने डेनिम कुर्ता- बघा ही भलतीच फॅशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2023 2:46 PM

New Fashion Trend Of Denim Lehenga In Marriage: आतापर्यंत कॅज्यूअल लूकसाठी डेनिम वापरणं हे समजण्यासारखं होतं. पण आता या नवरी आणि नवरदेवाने डेनिमला थेट वेडिंग कलेक्शनमध्ये नेऊन ठेवलं आहे...(Bride in denim lehenga stunned internet)

ठळक मुद्देतिच्या नवऱ्यानेही तिला साथ दिली आणि त्यानेही वर्क केलेला डेनिम कुर्ता तसेच डेनिम बूट घालून लग्न लावले.

आतापर्यंत लग्नसराई म्हटलं की सिल्कचे कपडे घातले जातात. नवरा- नवरी तर सिल्कचे कपडे घालतातच पण बहुसंख्य वऱ्हाडी मंडळीही सिल्कच्या भरजरी कपड्यांमध्ये असतात. पण बंगरुळ येथील एका नवरीला मात्र असं तेच ते नेहमीचे कपडे तिच्या लग्नात घालायचे नव्हते (New trend in wedding fashion). त्यामुळे मग तिने चक्क डेनिम कपड्यावर भरजरी वर्क करून घेतले आणि त्या कपड्यांमध्ये लग्न लावले (Bride and groom wear denim clothes for marriage). तिच्या नवऱ्यानेही तिला साथ दिली आणि त्यानेही वर्क केलेला डेनिम कुर्ता तसेच डेनिम बूट घालून लग्न लावले.(Bride in denim lehenga stunned internet)

 

अहाना खोसला आणि शेहन मिनोचर असं त्या दाम्पत्याचं नाव आहे.

ख्रिसमससाठी परफेक्ट केक करायचा तर लक्षात ठेवा ५ गोष्टी- केक कधीच बिघडणार नाही

त्यांचा विवाह सोहळा नुकताच लंडन येथे पार पडला. indiatoday यांनी दिलेल्या माहितीनुसार अहानाचे वडील मनोविराज खोसला हे बंगरुळ येथील मेन्स फॅशन डिझायनर आहेत. त्यांच्या लेकीला लग्नात काहीतरी वेगळे कपडे घालायचे होते. म्हणून मग बापलेकीने खूप विचार केला आणि तिच्या वडिलांनी तिच्यासाठी एक छानसा डेनिम लेहेंगा डिझाईन केला.

 

हा लेहेंगा डेनिमचा असला तरी तो बघताक्षणी नवरीचा लेहेंगा वाटला पाहिजे, अशी अट अहानाने वडिलांना टाकली होती. त्यानुसार त्यांनीही त्या लेहेंग्यावर भरगच्चा विणकाम केले.

हिवाळा असो की पावसाळा, सर्दी- खोकला होणारच नाही, प्या तुळशीचा चहा- ६ जबरदस्त फायदे

लेहेंग्याच्या ब्लाऊजवर मध्यभागी मोठं फुलपाखरू डिझाईन करण्यात आलं असून तसेच भरपूर फुलपाखरं सुंदर पद्धतीने संपूर्ण लेहेंग्यावर विणण्यात आले आहेत. डेनिम लेहेंगा डिझाईन करण्याचा प्रयत्न काही फॅशन डिझायनरनी केला. पण आतापर्यंत तो बहुतेक तरी कोणत्या नवरीने घातला नव्हता. त्यामुळे आता अहानाचं उदाहरण पाहून पुढच्यावर्षी लग्नसराईमध्ये डेनिम कपड्यांचा ट्रेण्डही येऊ शकतो...

 

टॅग्स :फॅशनलग्न