Lokmat Sakhi >Fashion > ब्रिटिश पंतप्रधानांच्या पत्नी अक्षता मुर्तींनी दिवाळीत घातला होता 'गंडाबेरुंडा' नेकलेस- बघा त्या नेकलेसची एवढी चर्चा का?

ब्रिटिश पंतप्रधानांच्या पत्नी अक्षता मुर्तींनी दिवाळीत घातला होता 'गंडाबेरुंडा' नेकलेस- बघा त्या नेकलेसची एवढी चर्चा का?

Akshata Murty Wore ‘Gandaberunda’ Necklace On Diwali: ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी तसेच सुधा मुर्ती आणि नारायण मुर्ती यांची लेक अक्षता मुर्ती यांनी दिवाळीला 'गंडाबेरुंडा' हा पारंपरिक नेकलेस घातला होता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2023 04:27 PM2023-11-18T16:27:29+5:302023-11-18T16:28:41+5:30

Akshata Murty Wore ‘Gandaberunda’ Necklace On Diwali: ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी तसेच सुधा मुर्ती आणि नारायण मुर्ती यांची लेक अक्षता मुर्ती यांनी दिवाळीला 'गंडाबेरुंडा' हा पारंपरिक नेकलेस घातला होता...

British Prime Minister Rishi Sunak's wife Akshata Murty wore ‘Gandaberunda’ necklace on Diwali, Must see her viral photos of traditional jewellery | ब्रिटिश पंतप्रधानांच्या पत्नी अक्षता मुर्तींनी दिवाळीत घातला होता 'गंडाबेरुंडा' नेकलेस- बघा त्या नेकलेसची एवढी चर्चा का?

ब्रिटिश पंतप्रधानांच्या पत्नी अक्षता मुर्तींनी दिवाळीत घातला होता 'गंडाबेरुंडा' नेकलेस- बघा त्या नेकलेसची एवढी चर्चा का?

Highlightsत्यांचा हा पारंपरिक दागिना सध्या चर्चेचा विषय झाला असून आता त्यानिमित्ताने देशभर या चिन्हाच्या दागिन्याची फॅशन येऊ शकते...

सगळीकडेच दिवाळसण नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने आपण दागिन्यांचे, कपड्यांचे अनेक वेगवेगळे प्रकार पाहिले. दिवाळीच्या निमित्ताने पारंपरिक दागिने, पारंपरिक कपड्यांना बरीच मागणी असते. कारण अशा मोठ्या सणाला पारंपरिक वेशभुषा करण्यावर अनेकांचा भर असतो. आता ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक (British Prime Minister Rishi Sunak) यांच्या पत्नी तसेच उद्योजक दाम्पत्य सुधा मुर्ती आणि नारायण मुर्ती यांच्या कन्या अक्षता मुर्ती (Akshata Murty) यांनीही लंडनमध्ये दिवाळी दणक्यात (Diwali celebration) साजरी केली आणि त्यावेळी खास 'गंडाबेरुंडा' (‘Gandaberunda’ necklace) हा पारंपरिक दागिना घातला. तेव्हापासून सोशल मिडियावर या दागिन्याची भारीच चर्चा होत आहे. हा दागिना नेमका कसा ते आता पाहूया...

 

कसा असतो गंडाबेरुंडा नेकलेस?

गंडाबेरुंडा हे कर्नाटकातील एक पारंपरिक आणि अतिशय महत्त्वपूर्ण मानलं गेलेलं एक चिन्ह आहे. हे चिन्ह म्हणजे दोन डोके असलेला एक पक्षी आहे आणि त्याच्या बाजुने गोलाकार नक्षीकाम केलेलं आहे.

म्हातारपणीही एकदम फिट रहाल, फक्त 'या' ५ सवयी लावून घ्या

अक्षता मुर्ती यांचं माहेर कर्नाटक. त्यामुळे आपल्या माहेरचा हा पारंपरिक दागिना घालून त्यांनी दिवाळी साजरी केली. मोत्यांच्या माळेमध्ये त्यांनी हे गंडाबेरुंडा पदक गुंफलेलं होतं. कर्नाटकात असं मानलं जातं की गंडाबेरुंडा हे चिन्ह आणि विजय नगर साम्राज्याचं प्रतिक होतं. त्यानंतर ते मैसूर साम्राज्याचं प्रतिक झालं.

 

कर्नाटकातल्या काही मंदिरांवरही हे चिन्ह दिसून येतं. तसेच ते चिन्ह म्हणजे साहस, धैर्य आणि दूरदृष्टी यांचं प्रतिक मानलं जातं.

इडली पात्राच्या छिद्रांमध्ये खरकटं अडकून बसतं? ३ सोप्या ट्रिक्स, इडली पात्र होईल झटपट स्वच्छ- चकाचक

अक्षता यांनी निळ्या रंगाच्या साडीसोबत घातलेल्या गंडाबेरुंडा पेंडंटवर लाल आणि हिरव्या रंगाचे कुंदन वर्क केलेले होते. त्यांचा हा पारंपरिक दागिना सध्या चर्चेचा विषय झाला असून आता त्यानिमित्ताने देशभर या चिन्हाच्या दागिन्याची फॅशन येऊ शकते....

 

Web Title: British Prime Minister Rishi Sunak's wife Akshata Murty wore ‘Gandaberunda’ necklace on Diwali, Must see her viral photos of traditional jewellery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.