Join us

चांदीच्या जोडव्यांच्या पाहा खास डिझाइन्स, पायात दिसतील शोभून-रोज वापरण्यासाठीही परफेक्ट दागिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2025 17:09 IST

silver toe ring: silver toe ring women: beautiful silver toe ring: Silver Toe Rings Designs: Plain silver toe ring: women jodavi: jodavi design: jodavi design silver: jodavi new design for ladies: jodavi design gold: तुमचं नुकतंच लग्न झालं असेल तर तुमच्या कपाटात पायाच्या जोडव्यांचे हे खास क्लेकशन असायलाच हवे. ज्यामुळे तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल.

सध्या लग्नसराईचा काळ सुरु असल्यामुळे बाजारात आपल्याला अनेक नवीन प्रकारचे दागिने पाहायला मिळतात. (beautiful silver toe ring)लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा सोहळा असून हा दिवस अधिक खास करण्यासाठी आपण आधीपासूनच तयारी करायला सुरुवात करतो. नवीन नवरीला प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींची खरेदी करावी लागते. यामध्ये मंगळसूत्रानंतर सर्वात महत्त्वाचा दागिना कोणता असेल तर ती जोडवी. जोडवीला सौभाग्याच खूण मानले जाते. (Plain silver toe ring).मंगळसूत्राप्रमाणेच जोडवी घालणं ही महिलांसाठी लग्न झाल्याचं प्रतीक असतं. नवीन ट्रेंड आणि फॅशननुसार मुलींना आपल्या वॉडरोबमध्ये नेहमीच नवीन गोष्टी हव्या असतात.(jodavi design silver) त्या स्वत:साठी इतरांपेक्षा वेगळे दागिने निवडतात. जर तुम्ही देखील लवकरच लग्न करणार असाल किंवा तुमचं नुकतंच लग्न झालं असेल तर तुमच्या कपाटात पायाच्या जोडव्यांचे हे खास क्लेकशन असायलाच हवे. ज्यामुळे तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल. 

प्रिंटेड- फ्लोरल साड्यांचे खास डिझाइन्स, महाशिवरात्रीच्या पूजेसह उन्हाळ्यासाठी सुंदर-वजनाला हलक्या साड

1. जोधा जोडवी 

सध्या जोधा जोडवी फार ट्रेंडमध्ये आहे. जर तुम्ही जोधपूरी लूक करणार असाल तर या जोडव्यांमुळे तुमचे पाय अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतील. ही जोडवी घागरा किंवा लेहेंग्यावर उठून दिसतील. या प्रत्येक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या अंगठ्याच्या आणि लेहेंग्याच्या रंगानुसार निवडू शकता. 

2. डायमंड जोडवी 

ट्रेंडनुसार अनेकांना पायात नाजूक जोडवी घालायला आवडतात. काठापदराच्या सा़डीवर सोने, चांदी, डायमंड किंवा प्लॅटिनम यांसारख्या धातूच्या डिझाइन्स बाजारात उपलब्ध आहेत. नाजूक जोडव्यांनी पाय अधिक आकर्षित दिसतील. ज्यामुळे तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल. 

3. क्रिस्टल जोडवी 

क्रिस्टल जोडवीमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारच्या जोडवी पाहायला मिळतात. यामध्ये खड्यांच्या जोडवी हा देखील एक पर्याय आहे. तसेच वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये बाजारात आहेत. आपल्या आवडीच्या रंगानुसार आपण खरेदी करु शकतो. 

4. चांदीची जोडवी

सध्या चांदीची जोडवी अधिक ट्रेंडमध्ये आहे. चांदीची जोडवी ही महिलांच्या पायात उठून दिसतात. या जोडव्यांमध्ये अनेक रंगीबेरंगी डायमंडही पाहायला मिळतात. आवडत्या रंगानुसार आपण चॉइस करु शकतो. ज्यामुळे सगळ्यांच्या नजरा तुमच्या पायाच्या टिकून राहातील.  

टॅग्स :फॅशनमहिला