Lokmat Sakhi >Fashion > करीना कपूरसारखा कॉटन पॅण्टवरही घालता येईल टीशर्ट; जीन्सला पावसाळ्यात म्हणा बाय- टाळा स्किन इन्फेक्शन

करीना कपूरसारखा कॉटन पॅण्टवरही घालता येईल टीशर्ट; जीन्सला पावसाळ्यात म्हणा बाय- टाळा स्किन इन्फेक्शन

Fashion Tips: उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये जीन्स घालणं अनेक जणींना कम्फर्टेबल वाटत नाही. म्हणूनच तर जीन्सऐवजी हा बघा एक कुल पर्याय...(comfortable look in cotton jeans)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 01:17 PM2022-05-28T13:17:34+5:302022-05-28T13:18:26+5:30

Fashion Tips: उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये जीन्स घालणं अनेक जणींना कम्फर्टेबल वाटत नाही. म्हणूनच तर जीन्सऐवजी हा बघा एक कुल पर्याय...(comfortable look in cotton jeans)

Cool cotton pants for summer and rainy season to avoid infection...More comfortable and more cool look | करीना कपूरसारखा कॉटन पॅण्टवरही घालता येईल टीशर्ट; जीन्सला पावसाळ्यात म्हणा बाय- टाळा स्किन इन्फेक्शन

करीना कपूरसारखा कॉटन पॅण्टवरही घालता येईल टीशर्ट; जीन्सला पावसाळ्यात म्हणा बाय- टाळा स्किन इन्फेक्शन

Highlightsतुम्ही अजूनही कॉटन जीन्स किंवा कॉटन पॅण्ट घेतली नसेल, तर अजूनही वेळ गेलेली नाही. कारण उन्हाळ्याप्रमाणेच या पॅण्ट पावसाळ्यासाठीही बेस्ट असतात.

टी- शर्ट कोणत्याही रंगाचा आणि कसाही असला तरी त्याला एक कुल कम्प्लिट लूक मिळतो ते जीन्समुळे. एका जीन्सवर दोन चार टी- शर्ट आणि तेवढेच कुर्ते अगदी हमखास चालून जातात. त्यामुळे जीन्स असली की कसं टेन्शन नसतं.. या सगळ्या गोष्टी जीन्सच्या बाबतीत खऱ्या असल्या आणि तिचे खूप काही फायदे असले तरी बऱ्याचदा उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जीन्स (cotton jeans) वापरणं अनेक जणींना म्हणावं तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही. म्हणूनच तर एकदा बघून घ्या हा करिना कपूरचा (Kareena Kapoor) लूक आणि करा तशी स्टाईल...

 

करिना कपूर आणि बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्री सध्या कॉटन जीन्समध्ये दिसतात. कारण जीन्सपेक्षाही कॉटन जीन्स आता अधिक आरामदायी वाटत आहेत. जीन्सचा कपडा जाड असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या गरमीमध्ये खूपच घाम घाम होत असल्याने जीन्स घालणे या दिवसांत नको वाटते. पायांना खाज येणे, पाय गरम झाल्यासारखे वाटणे असा त्रास जीन्समुळे अनेकींना उन्हाळ्यात होतो. त्या तुलनेत कॉटन जीन्स मात्र खूपच आरामदायी असतात. त्याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे कॉटन पॅण्ट्सचा कपडा जीन्सच्या तुलनेत खूपच मऊ आणि हलका असतो. त्यामुळे गरमीच्या दिवसांत त्या खूपच सहज सोप्या वाटतात. म्हणून या उन्हाळ्यात अनेक जणींच्या वॉर्डरोबमध्ये कॉटन पॅण्ट किंवा कॉटन जीन्सची भर पडलेली दिसली.

 

तुम्ही अजूनही कॉटन जीन्स किंवा कॉटन पॅण्ट घेतली नसेल, तर अजूनही वेळ गेलेली नाही. कारण उन्हाळ्याप्रमाणेच या पॅण्ट पावसाळ्यासाठीही बेस्ट असतात. याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात आपण जीन्स घालून बाहेर गेलो आणि पाऊस आला तर जीन्स भिजते. बाकीचे कपडे अगदी पटकन वाळून जातात. पण जीन्सचा कपडा जाड असल्याने ती मात्र लवकर वाळत नाही. अशी ओलसर जीन्स बराच वेळ अंगावर राहिली तर इन्फेक्शन होतं, खाज येऊन रॅश येते. शिवाय जीन्स धुतली तरी पावसाळ्यात दमट वातावरणामुळे ती चांगली वाळत नाही. या सगळ्या कारणांमुळे हल्ली अनेकजणी पावसाळ्यातही जीन्सऐवजी कॉटन पॅण्ट घालण्यास प्राधान्य देत आहेत.. म्हणूनच तर अजूनही वेळ गेलेली नाही. मस्त हलकी- फुलकी कॉटन जीन्स घ्या आणि आता उन्हाळ्याचे काही दिवस आणि संपूर्ण पावसाळ्यात तिचा आरामदायीपणा अनुभवा..

 

कॉटन जीन्स घेताना..
१. डेनिम ब्लू, काळा किंवा राखाडी हे जीन्समधले सगळ्यात जास्त डिमांड असणारे रंग. पण कॉटन पॅण्टमध्ये मात्र हे ३ रंग सोडून इतर सगळ्या रंगांना डिमांड असते.
२. पावसाळ्यात पावसाचा आनंद घेण्यासाठी आपण भटकंतीला जातोच. अशावेळी गुलाबी, आकाशी, पिस्ता, पिवळा अशा रंगाच्या पेस्टल शेड्स सगळ्यात जास्त आकर्षक दिसतात. कॉटन पॅण्टमध्ये पेस्टल रंगच अधिक ट्रेण्डी आहेत.
३. जीन्सप्रमाणे कॉटन पॅण्ट खूप टाईट नसते. त्यामुळे घेताना ती थोडी सैलसर घ्या. त्यामुळे अधिक कुल लूक तर मिळतोच पण खूप आरामदायीही वाटते. 
४. बाजारात किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर ७०० रुपयांपासून अनेक उत्तम कॉटन पॅण्ट उपलब्ध आहेत. 


 

Web Title: Cool cotton pants for summer and rainy season to avoid infection...More comfortable and more cool look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.