Lokmat Sakhi >Fashion > अंबानी प्री- वेडिंगसाठी दीपिका पदुकोनने नेसली ३ लाखांची घरचोला साडी! पदरावर होते मुगल आर्टवर्क आणि.....

अंबानी प्री- वेडिंगसाठी दीपिका पदुकोनने नेसली ३ लाखांची घरचोला साडी! पदरावर होते मुगल आर्टवर्क आणि.....

Anant Ambani- Radhika Merchant Pre Wedding Program: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या नुकत्याचा झालेल्या शाही प्री- वेडिंग सोहळ्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने तब्बल ३ लाखांची घरचोला साडी नेसली होती. (Deepika Padukon wore gharchola saree worth rs 3 lakh)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2024 04:58 PM2024-03-07T16:58:44+5:302024-03-07T16:59:36+5:30

Anant Ambani- Radhika Merchant Pre Wedding Program: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या नुकत्याचा झालेल्या शाही प्री- वेडिंग सोहळ्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने तब्बल ३ लाखांची घरचोला साडी नेसली होती. (Deepika Padukon wore gharchola saree worth rs 3 lakh)

Deepika Padukon wore gharchola saree worth rs 3 lakh for anant ambani radhika merchant pre wedding program | अंबानी प्री- वेडिंगसाठी दीपिका पदुकोनने नेसली ३ लाखांची घरचोला साडी! पदरावर होते मुगल आर्टवर्क आणि.....

अंबानी प्री- वेडिंगसाठी दीपिका पदुकोनने नेसली ३ लाखांची घरचोला साडी! पदरावर होते मुगल आर्टवर्क आणि.....

Highlightsया साडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे साडीचा पदर अतिशय भरजरी असून त्यावर सतराव्या शतकातील प्रसिद्ध असणारे मुगल आर्टवर्क केलेले होते. आता घरचोला साडी म्हणजे नेमकी कशी ते पाहूया...

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे धाकटे चिरंजीव म्हणजेच अनंत अंबानी. आपल्याला माहितीच आहे की गुजरातच्या जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री- वेडिंग सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला (Anant Ambani- Radhika Merchant Pre Wedding Program). या सोहळ्यासाठी बॉलवूडचे सगळे सेलिब्रिटी हजर होते. यामध्ये प्रत्येकाचेच कपडे, स्टाईल बघण्यासारखी होती. त्यात दीपिका पदुकाेनही मागे नव्हती. या तीन दिवसीय सोहळ्यातल्या एका दिवशी दीपिकाने पारंपरिक गुजराती घरचोला साडी नेसली होती. या साडीची किंमत तब्बल २ लाख ९५ हजार एवढी सांगितली जाते. (Deepika Padukon wore gharchola saree worth rs 3 lakh)

 

दीपिकाने नेसलेली घरचोला साडी लालबुंद रंगाची होती. डिझायनर रिंपल आणि हरप्रित यांनी डिझाईन केलेली ती साडी हातमागातली एक उत्तम कलाकृती आहे.

१ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या शिमर साडी- करा चमचमत्या साडीची देखणी फॅशन

कारण बांधेज किंवा बांधणी प्रकारातल्या त्या साडीवर बनारसी जरी वर्क केलेले असून साडीवर कसाबडोरी एम्ब्रॉयडरी, मारोडी काम, दाबका वर्क असे वीणकामाचे वेगवेगळे प्रकार दिसून येतात. याशिवाय साडीवर सेक्विन आणि मोती वर्कही करण्यात आलेले आहे. या साडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे साडीचा पदर अतिशय भरजरी असून त्यावर सतराव्या शतकातील प्रसिद्ध असणारे मुगल आर्टवर्क केलेले होते. आता घरचोला साडी म्हणजे नेमकी कशी ते पाहूया...

 

घरचोला साडी म्हणजे काय?

गुजरात आणि राजस्थानमध्ये घरचोला साडी हा प्रकार अतिशय प्रसिद्ध आहे. लग्न झाल्यानंतर जेव्हा नववधू तिच्या सासरच्या घरी पहिल्यांदा येते, तेव्हा तिची सासू तिला घरचोला साडी किंवा ओढणी देऊन तिचं स्वागत करते.

महाशिवरात्रीला करून खा उपवासाचा डोसा, नेहमीच्या साबुदाणा खिचडी- भगरीपेक्षा काहीतरी वेगळं- चवदार

नवरीच्या या घरचोला साडीची किंवा ओढणीची गाठ नवरदेवाच्या शालीला बांधली जाते. गुजरात आणि राजस्थान दोन्ही ठिकाणी ही परंपरा दिसून येते. त्यामुळेच तर गुजराथमध्ये लग्न ठरलेल्या नवरीसाठी घरचोला साडी किंवा ओढणी आवर्जून घेतलीच जाते. त्यामुळे अंबानी परिवाराच्या गुजराती पद्धतींना शोभून दिसणारी साडी दीपिकाने या सोहळ्यासाठी निवडल्याने तिचे तिच्या चाहत्यांनी कौतूक केले. 

 

Web Title: Deepika Padukon wore gharchola saree worth rs 3 lakh for anant ambani radhika merchant pre wedding program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.