Join us  

दिया मिर्झाची गुलाबी रंगाची बनारसी साडी, हातमागावर ही साडी कशी विणतात पाहा; नजाकत कमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2022 2:39 PM

Banarasi Saree Of Dia Mirza: बनारसी साड्यांचे सौंदर्य बघायला आवडत असेल तर अभिनेत्री दिया मिर्झाचे (actress Dia Mirza) हे काही सुंदर फोटो एकदा बघाच...

ठळक मुद्देEkaya या ब्रॅण्डने ही साडी डिझाईन केली असून साडीची किंमत २९, २७५ रुपये आहे.तिची ही साडी विणण्यासाठी खास कडवा (kadwa) टेक्निक वापरण्यात आली आहे.

बॉलीवूडची अभिनेत्री असो किंवा मग एक सामान्य गृहिणी, बनारसी साडीचा मोह होणार नाही, अशी एखादीच कुणी सापडेल. मुळात बहुतांश महिलांना साड्यांची आवड असतेच. मग भलेही त्या साड्या नेहमी नेसत नसोत किंवा कपाटात ढिगभर साड्या पडलेल्या असाेत. साड्यांचा एखादा नवा प्रकार आला की तो आपल्याकडेही असावा, हा मोह अनेकींना होतोच. काही जणी मनाला आवर घालतात आणि मग साड्या नुसत्या बघूनच समाधान मानतात. आताही अशीच एक अतिशय सुंदर साडी बघून घ्या..(Banarasi Saree Of Dia Mirza)

 

अभिनेत्री दिया मिर्झा सध्या तिच्या बाळाच्या संगोपनात व्यस्त असल्याने चित्रपटांपासून तशी दूरच आहे. पण सोशल मिडियावर (social media) मात्र ती बऱ्याचदा ॲक्टीव्ह असते. तिने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले असून हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोंची खासियत म्हणजे यामध्ये दियाने अतिशय सुंदर अशी बनारसी साडी नेसली आहे. पेस्टल पिंक किंवा पीच या रंगात मोडणारी बनारसी (speciality of Dia Mirza's Banarasi saree) आणि त्यावर सोनेरी धाग्यांनी केलेले वर्क अशी तिची साडी तिला खरोखरंच डिसेंट लूक देणारी आहे. या साडीवर दियाने आयव्हरी रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज घातले असून इतर दागदागिने आणि मेकअप हे देखील अतिशय सोबर आहे.

 

दिया मिर्झाच्या बनारसीची खासियत"Celebrating the glorious legacy of our handicraft..." अशा शब्दांत दियाने तिच्या या साडीचे वर्णन केले आहे. Ekaya या ब्रॅण्डने ही साडी डिझाईन केली असून साडीची किंमत २९, २७५ रुपये आहे. पुर्वी बनारसी साड्या केवळ हातानेच विणल्या जायच्या. पण आता मात्र या साड्या विणण्यासाठी कुशल कारागीरांप्रमाणेच यंत्रांचाही वापर केला जातो. पण दियाची ही साडी पुर्णपणे हातमागावर तयार करण्यात आली असून तिची ही साडी विणण्यासाठी खास कडवा (kadwa) टेक्निक वापरण्यात आली आहे.

 

हातमागाची कडवा पद्धत म्हणजे काय?kadwa weaving technique of Banarasiफेकवा किंवा कटवर्क, कडवा अशा बनारसी साड्या विणण्याची वेगवेगळी पद्धत असते. यापैकी कडवा पद्धत ही अतिशय अवघड मानली जात आणि त्यासाठी अतिशय कुशल विणकरांची गरज असते. या पद्धतीचे वैशिष्ट्य असे की साडीवरची प्रत्येक नक्षी ही स्वतंत्रपणे विणली जाते आणि तिचा धागा तिथेच थांबवलेला असतो. ही साडी जेव्हा उलट्या बाजूने आपण बघतो, तेव्हा इतर साड्यांप्रमाणे या साडीच्या उलट्या भागावर एकही सुटा धागा दिसत नाही. म्हणूनच कडवा पद्धतीने साडी विणणे हे अतिशय क्लिष्ट काम मानले जाते. दियाने नेसलेली ही पीच कलर बनारसी अशाच पद्धतीने विणण्यात आली आहे.  

टॅग्स :फॅशनदीया मिर्झाब्यूटी टिप्स