Lokmat Sakhi >Fashion > Diwali Shopping : दिवाळीत नवीन कपड्यांची खरेदी करा आणि जुन्या कपड्यांना 'असा' ट्विस्ट, नव्याहून दिसतील फॅशनेबल

Diwali Shopping : दिवाळीत नवीन कपड्यांची खरेदी करा आणि जुन्या कपड्यांना 'असा' ट्विस्ट, नव्याहून दिसतील फॅशनेबल

how to make new dress from old dress simple fashion tips Diwali Shopping : वर्षानुवर्ष कपाटात पडून असणारे कपडे जातील वापरले, पैसेही वाचतील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2024 01:11 PM2024-10-23T13:11:24+5:302024-10-23T18:10:59+5:30

how to make new dress from old dress simple fashion tips Diwali Shopping : वर्षानुवर्ष कपाटात पडून असणारे कपडे जातील वापरले, पैसेही वाचतील...

Diwali Shopping how to make new dress from old dress simple fashion tips : Buy new clothes, but give the old clothes 'that' look, you will look good | Diwali Shopping : दिवाळीत नवीन कपड्यांची खरेदी करा आणि जुन्या कपड्यांना 'असा' ट्विस्ट, नव्याहून दिसतील फॅशनेबल

Diwali Shopping : दिवाळीत नवीन कपड्यांची खरेदी करा आणि जुन्या कपड्यांना 'असा' ट्विस्ट, नव्याहून दिसतील फॅशनेबल

दिवाळी म्हटली की खरेदी ओघानेच आली. पूर्वी फक्त दिवाळीला खरेदी होत होती, पण आता आपण वर्षभर खरेदी करतो. त्यामुळे या खरेदीचे विशेष वाटत नाही. असे असले तरी दिवाळीच्या निमित्ताने आपण काही ना काही तरी घेतोच. यानंतर लग्नसराई असल्याने दिवाळी आणि लग्न असे मिळून आपण साडी, ड्रेस काहीतरी घेतोच. दिवाळीला ४ दिवस असल्याने प्रत्येक दिवशी घालण्यासाठी आपल्याला वेगवेगळे कपडे लागतात. इतके कपडे एकाचवेळी घेतले तरी ते वर्षभर वापरले जातातच असं नाही. तसंच कपडे खरेदी म्हणजे पैसे गुंतून राहण्याचे काम. अशावेळी जुन्या कपड्यांनाच नवीन हटके लूक दिला तर? आता यासाठी नेमकं काय करायचं याच्या काही सोप्या टिप्स आज आपण पाहणार आहोत. पाहूयात जुन्याच कपड्यांपासून एकदम नवीन वाटतील असे ड्रेस कसे तयार करायचे (how to make new dress from old dress simple fashion tips Diwali Shopping)..

१. असा तयार करा लेहंगा

आपल्याकडे एखादे डिझायनर छानसे ब्लाऊज असते. ते ब्लाऊज आपण कधीतरी एखाद्या साडीवर वापरतो. बाकी एरवी ते पडूनच असते. एखादी तरी हेवी प्रकारातील ओढणीही बहुतांश जणींकडे असतेच. अशावेळी एखादा डिझायनर स्कर्ट किंवा लेहंगा घेतला तर हे सगळे मिसमॅच मिळून छानसा ड्रेस तयार होतो. दिवाळीच्या एखाद्या दिवसात आपण हा ड्रेस नक्कीच घालू शकतो. यामुळे फारसे पैसेही जात नाहीत आणि घरात पडून असणाऱ्या गोष्टींचा चांगला उपयोग करता येतो. 

२. असा करा जॅकेटचा वापर

बाजारात सध्या शॉर्ट आणि लाँग प्रकारातील बरेच जॅकेटस मिळतात. आपल्याकडे चांगले कुर्ते, असतील तर त्यांच्यावर हे जॅकेट आपण नक्कीच पेअर करु शकतो. या डिझायनर जॅकेटमुळे आतमधला कुर्ता थोडा जुना असला तरी तो पाहणाऱ्यांच्या लक्षात येत नाही. न वापरते कुर्ते अशाप्रकारे वापरलेही जातात आणि त्यांना थोडा हटके लूक मिळायला मदत होते. 

३. प्लेन साडीचा ड्रेस

साडीचा ड्रेस म्हटले की आपल्याला काठापदराच्या साडीचा ड्रेस असे वाटते. बरेचदा आपण तसेच ड्रेस शिवून घेतो. पण आपल्याकडे एखादी प्लेन साडी असेल तर त्या साडीला लेस किंवा एखादी छानशी किनार लावून त्याचा छानसा पंजाबी ड्रेस, कुर्ता, लेहंगा असं काहीही करु शकतो. हल्ली बाजारात कॉर्ड सेट मिळतात तशा प्रकारचा कॉर्ड सेट शिवून घेतला तरीही छान दिसतो. आपल्या मापातला, हवा तशा डिझाईनचा ड्रेस यामुळे आपल्याला मिळतो. 

Web Title: Diwali Shopping how to make new dress from old dress simple fashion tips : Buy new clothes, but give the old clothes 'that' look, you will look good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.