Join us  

How to make a saree @ home : घरीच बनवा तुमच्या आवडीची डिझायनर साडी; घ्या भन्नाट आयडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 1:13 PM

Fashion: घरच्याघरी साडी कशी तयार करणार हे वाचून थोडं सरप्राईज झालात का... पण हो हे खरंच आहे.. घरच्याघरी (How to make saree at home) अगदी छान आणि सेलिब्रिटींप्रमाणे स्वत:ची अशी कस्टमाईज्ड साडी (make your own customized saree) तयार करता येते... बघा त्यासाठी या काही आयडिया..

ठळक मुद्देसाडी तयार करणं ही शिवण कामातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे, असं फॅशन वर्ल्डमध्ये मानलं जातं.

एरवी तुम्ही कितीही वेस्टर्न कपड्यांमध्ये वावरत असलात, तरी काही खास प्रसंगी साडी (love for saree) नेसण्याचा मोह सगळ्यांच मैत्रिणींना होतो.. अशा विशेष प्रसंगी नेसण्यासाठी खास आपल्या स्वत:साठी तयार झालेली कस्टमाईज्ड साडी असेल, तर मग क्या बात है.. थोडासा वेळ असेल आणि थोडीशी कलात्मकता दाखवली तर अगदी स्वत:ची डिझायनर साडी घरच्याघरी अगदी स्वस्तात तयार होऊ शकते.. घरच्याघरी साडी कशी तयार करायची, त्याच्या या काही मस्त आयडिया..

 

- साडी तयार करणं ही शिवण कामातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे, असं फॅशन वर्ल्डमध्ये मानलं जातं. कारण साडी तयार करताना तुम्हाला काहीही कापावं लागत नाही आणि माप घेण्यात थोडं कमी जास झाल्याने तुमचं काही बिघडतही नाही.. त्यामुळे अगदी बिनधास्त साडी बनविण्याचा प्रयत्न करून बघा..

 

- साडी तयार करण्यासाठी साडीची मापं आपल्याला माहिती असावीत. साधारण साडी ५.५ मीटर लांबीची असते आणि तिची रुंदी जवळपास १. १५ मीटर असते. साडीचं ब्लाऊज हे ८० सेमी पर्यंत असतं.. त्यामुळे जेव्हा तुम्ही साडीसाठी कपडा आणाल तेव्हा त्याची लांबी आणि रुंदी व्यवस्थित माेजून घ्या. ब्लाऊजसाठी तुम्ही तोच कपडा वापरणार की दुसरा घेणार हे देखील तेव्हाच ठरवून घ्या..

 

- प्रत्येक शहरात ब्लाऊजपीसची दुकाने असतात. त्या दुकानांमध्ये असणारा कॉटन, सिंथेटिक, क्रेप, जॉर्जेट, सिल्क असा कोणताही कपडा तुम्ही साडी तयार करण्यासाठी घेऊ शकता.. कॉटनचा कपडा घेणार असाल तर तो अर्थातच थोडा अधिक लांब घ्या. पाण्यात भिजवा. वाळल्यानंतर इस्त्री करा आणि त्यानंतरच त्यापासून साडी बनवा. कारण पाण्यात घातलं की कॉटन आकसतं, त्यामुळे साडीचं माप चुकू शकतं. अगदी सुरुवातीला सिल्क कपड्यावर उडी मारू नका. पहिल्यांदा सिंथेटिक, पॉलिस्टर या कपड्यांवर प्रयत्न करून बघावा. 

 

- बाजारात अनेक प्रकारच्या लेस उपलब्ध असतात. काही लेसवर कुंदनवर्क असते, काहींवर मोती वर्क केलेले असते तर काही लेस सिक्विन वर्क किंवा एम्ब्रॉयडरी केलेल्याही असतात. यापैकी तुम्हाला काय आवडते आणि तुमच्या साडीवर कोणती लेस जास्त उठून दिसते ते बघा. साडीवर वरच्या आणि खालच्या बाजूने ही लेस लावून टाका. लेस विक्रेत्यांकडेच त्या लेसशी मिळतेजुळते पॅचेसही उपलब्ध असतात. हे १५- २० पॅचेस घेतले तरी ते तुम्ही साडीच्या मधल्या जागेत लावू शकतां. पदरावर थोडे अधिक लावावेत म्हणजे मग पदर आणखी उठून दिसतो आणि भरजरी वाटतो.

 

- साडीसाठी तुम्ही एखादा प्लेन कपडा घेतला तर त्या साड्यांवर ट्रेसिंग करून देणारेही अनेक लोक असतात. अशा लोकांकडून साडीवर एखादी छान डिझाईन ट्रेस करून आणा. या डिझाईनवर थ्रेडवर्क, एम्ब्रॉयडरी, कुंदन- मोती असं काही काही लावून तुम्ही छान साडी तयार करू शकता. प्लेन साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाची अगदी छोटीशी म्हणजे अवघी ३ ते ४ सेमीची लेस लावली तरी ती साडी उठून दिसू शकते. 

 

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्स