Lokmat Sakhi >Fashion > तुम्ही पण सुडौल दिसण्यासाठी 'बॉडी शेपवेअरचा' वापर करता? तज्ज्ञ सांगतात....

तुम्ही पण सुडौल दिसण्यासाठी 'बॉडी शेपवेअरचा' वापर करता? तज्ज्ञ सांगतात....

Can Wearing Tummy Tuckers Or Body Shapers Help Tone Your Abs? Expert Advice : बॉडी शेपर वापरल्यामुळे शरीर सुडौल होते का? तज्ज्ञांचा सल्ला....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2023 12:06 PM2023-03-10T12:06:29+5:302023-03-10T12:14:36+5:30

Can Wearing Tummy Tuckers Or Body Shapers Help Tone Your Abs? Expert Advice : बॉडी शेपर वापरल्यामुळे शरीर सुडौल होते का? तज्ज्ञांचा सल्ला....

Does shapewear actually help in making a person slim ? Expert Advice | तुम्ही पण सुडौल दिसण्यासाठी 'बॉडी शेपवेअरचा' वापर करता? तज्ज्ञ सांगतात....

तुम्ही पण सुडौल दिसण्यासाठी 'बॉडी शेपवेअरचा' वापर करता? तज्ज्ञ सांगतात....

आपला बांधा सुडौल व सडसडीत असावा असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असत. प्रत्येकाची शरीरयष्टी व बांधा हा वेगवेगळा असतो. शरीराने जाड किंवा स्थूल असणाऱ्यांना आपण छान सडपातळ असावे, असे कायम वाटते. यासाठी काही स्त्रिया आपले जाडेपण, वाढलेले पोट लपविण्यासाठी बॉडी शेपर, टमी टकर्स , बॉडी शेपवेअरचा वापर करतात. काही विशिष्ट प्रकारच्या आउटफीटमध्ये बॉडी शेपर घातल्याने आपले शरीर सुडौल दिसू लागते. बॉडी शेपरमुळे आपले वाढलेले शरीर तात्पुरते लपविले जाते यामुळेच अनेक स्त्रिया बॉडी शेपर घालणे पसंत करतात.  

बॉडी शेपिंग कपडे किंवा शेपवेअरचा वापर सध्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. बॉडी शेपवेअर याची किंमत देखील सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी अशी आहे. असे असल्याने फारसा विचार न करता शरीरावरच्या चरबीचे तात्पुरते व्यवस्थापन करण्यासाठी या कपड्यांची खरेदी केली जाते. आपल्यापैकी अनेक स्त्रिया बॉडी शेपवेअर यांसारख्या कपड्यांचा वापर करत असल्या तरीही बॉडी शेपवेअर म्हणजे नेमकं काय? त्याचा वापर कधी, कसा करावा अशा असंख्य शंका त्यांच्या मनात असतात. 'Unmonk of Wellness' चे संस्थापक व वेलनेस कोच विक्रम दत्ता, बॉडीशेपरचा आपल्याला कितपत फायदा होऊ शकतो व सुडौल दिसण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स सांगत आहेत(Can Wearing Tummy Tuckers Or Body Shapers Help Tone Your Abs? Expert Advice).

१. बॉडी शेपर, टमी टकर्स, बॉडी शेपवेअर म्हणजे नेमकं काय ? 

शरीराने जाड असणाऱ्या व्यक्ती आपले शरीर प्रमाणबद्ध आहे असे दाखवण्यासाठी, या प्रकारचे कपडे दिवसभर आपल्या रोजच्या कपड्यांच्या आतमध्ये घालतात. जाड किंवा स्थूल व्यक्तींच्या शरीरात चरबीचे अतिरिक्त लेअर्स असतात. त्वचेच्या खाली असलेल्या चरबीला 'अ‍ॅडीपॉज टीश्यू' असे म्हणतात, जे खूप फ्लफी व सॉफ्ट असतात. हे 'अ‍ॅडीपॉज टीश्यू' खूपच सॉफ्ट असल्याकारणाने ते सहज दुमडले जातात. अशावेळी बॉडी शेपवेअर यांसारख्या कपड्यांचा वापर केल्यास त्वचे खालील चरबी कमी झाल्यामुळे शरीर सुडौल दिसू लागते. 


२. बॉडी शेपवेअर यांसारख्या कपड्यांचा वापर करुन आपले शरीर सुडौल बनते का ? 

टमी टकर्स किंवा बॉडी शेपर घातल्यामुळे आपल्या शरीरावर दाब येऊन शरीराचा आकार बदलतो. याचा आंतरिक शरीररचनेवर कोणताही परिणाम होत नाही. बॉडी शेपर घातल्यामुळे, ते आपल्या शरीरावर फिट बसते यामुळे अतिरिक्त चरबी दाबली जाऊन ती कमी प्रामाणात दिसते. चरबी कमी प्रमाणांत दिसल्यामुळे काही काळासाठी आपले शरीर टोनिंग झाल्याचा आभास निर्माण होणे, ही एक शारीरिक गोष्ट घडते. यामुळेच बॉडी शेपर घातल्यामुळे, काही काळासाठी आपले शरीर निराळे दिसू लागते. आपण जे काही अन्नपदार्थ खातो त्यातूनच आपले शरीर घडत असते किंवा तयार होत असते. त्यामुळे आपले शरीर फॅट आहे की फिट आहे हे खरेतर आपण शरीराला काय अन्न देतो, बसून काम करतो की अ‍ॅक्टिव्ह आहोत यावर अवलंबून असते. टमी टकर्स किंवा  बॉडी शेपर हे फक्त 'कॉस्मॅटिक्स टेम्पररी फिक्सेस' असतात. त्यामुळे त्यांचा खरे वास्तवात शरीर सुडौल करण्यासाठी उपयोग होत नाही. 

३. दिवसभर, दिर्घकाळ किंवा व्यायाम करताना बॉडी शेपर घातल्याने फायदा होऊ शकतो का ? 

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बॉडी शेपरमुळे स्नायूंवर काहीही परिणाम होत नाही. बॉडी शेपरमुळे शरीर फक्त  काही काळासाठी दाबले जाते. स्नायूंचे आंकूचन पावणे ही एक निराळी गोष्ट आहे. स्नायू आंकुचन व प्रसरण पावल्यामुळेच आपण शरीराची हालचाल करु शकतो. आपल्या शरीराच्या अंतर्गत ही प्रक्रिया सुरु असते. त्याचप्रमाणे पोटाचे स्नायू आंकुचन पावल्याने पोटाचा भाग कमी होणे, त्या भागातील चरबीचे लेअर्स कमी होणे असे काहीही होत नाही. सहाजिकच बॉडी शेपर घातल्यामुळे फक्त शरीराचा बाहेरील भाग दाबला जातो, ज्यामुळे श्वसन करण्यास त्रास होतो व शरीर तात्पुरते बनावट रितीने सुडौल दिसते. 

बॉडी शेपरचा आपल्या शरीराच्या अंतर्गत रचनेवर काहीही परिणाम होत नाही. असे असल्यामुळे ते घातल्याने शरीरातील फॅट कमी होत नाहीत. त्यामुळे चरबी कमी न झाल्यामुळे शरीर देखील सुडौल होत नाही. बॉडी शेपरमुळे शरीर सुडौल होते हा एक गैरसमज आहे. जर शरीर सुडौल करायचे असेल तर शरीर निरोगी ठेवणे हाच एक उत्तम उपाय आहे. यायाठी संपुर्ण शरीराला नियमित व्यायामाची गरज असते. व्यायामासोबतच चांगल्या आहाराची देखील आवश्यकता असते. व्यायाम करताना बॉडी शेपर घातल्याने देखील कोणताही चांगला परिणाम होत नाही. अ‍ॅब्स एक्सरसाइज केल्यास पोटातील स्नायू मजबूत होतात. चांगल्या वर्कआउट रुटीन व योग्य आहारामुळे आपल्या शरीरातील फॅटचे प्रमाण कमी होते. फक्त अ‍ॅब्स एक्सरसाइज करुन स्नायू मजबूत व शरीर सुडौल होत नाही. स्ट्रेन्थ,इंन्डूरन्स व फ्लेक्सिबिलीटी ट्रेनिंगचे कॉम्बिनेशन व योगा प्रॅक्टीस मुळे शरीरावर चांगले परिणाम होतात. तसेच शरीराचे कार्य देखील सुधारते. त्यामुळे सहाजिकच शरीर सुडौल देखील होते.

Web Title: Does shapewear actually help in making a person slim ? Expert Advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.