Lokmat Sakhi >Fashion > दंड फारच जाडजूड - बेढब दिसतात म्हणून लाज वाटते? 3 टिप्स, दिसा स्टायलिश - स्लिम

दंड फारच जाडजूड - बेढब दिसतात म्हणून लाज वाटते? 3 टिप्स, दिसा स्टायलिश - स्लिम

DO’s & Don’ts For Bulky Arms Fashion Tips : प्रसिद्ध फॅशन तज्ज्ञ शिल्पा तोलानी यांनी दंड जाड दिसू नयेत म्हणून कशाप्रकारचे कपडे वापरावेत ते सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 12:00 PM2023-04-02T12:00:59+5:302023-04-02T12:18:49+5:30

DO’s & Don’ts For Bulky Arms Fashion Tips : प्रसिद्ध फॅशन तज्ज्ञ शिल्पा तोलानी यांनी दंड जाड दिसू नयेत म्हणून कशाप्रकारचे कपडे वापरावेत ते सांगतात...

DO’s & Don’ts For Bulky Arms Fashion Tips : Embarrassed that the arms look too thick Bulky? 4 tips, look stylish - slim | दंड फारच जाडजूड - बेढब दिसतात म्हणून लाज वाटते? 3 टिप्स, दिसा स्टायलिश - स्लिम

दंड फारच जाडजूड - बेढब दिसतात म्हणून लाज वाटते? 3 टिप्स, दिसा स्टायलिश - स्लिम

आपण नेहमी स्लीम-ट्रीम दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र जीवनशैलीतील चुकीच्या गोष्टींमुळे आपली जाडी वाढत जाते आणि मग त्यावर नियंत्रण आणणं अवघड होऊन जातं. आहाराच्या चुकीच्या पद्धती, व्यायामाचा अभाव, वाढते ताणतणाव यांमुळे शरीरावरची चरबी वाढत जाते. इतकेच नाही तर एकदा वजन आणि चरबी वाढायला लागली की ती कमी करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर असते. वेळीच योग्य ते बदल केल्यास याचा चांगला परीणाम दिसून येतो. अन्यथा शरीरावर विशिष्ट ठिकाणी चरबी वाढत जाते. महिलांमध्ये साधारणपणे मांड्या, कंबर, ओटीपोटाचा भाग, छातीचा भाग, दंड यांवर ही चरबी जमा व्हायला लागते (Do’s & Don’ts For Bulky Arms Fashion Tips). 

आपण कोणत्याही प्रकारचे कपडे घातले तरी आपले दंड जाड दिसतात किंवा बेढब दिसतात म्हणून आपल्याला लाज वाटायला लागते. व्यायाम आणि आहारावर नियंत्रण करुन ही जाडी कमी करणे गरजेचे असते. मात्र हे प्रयत्न करुनही जाडी कमी होत नसेल तर काही सोप्या फॅशन टिप्स वापरुन हे दंड जाड दिसू नयेत यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रसिद्ध फॅशन तज्ज्ञ शिल्पा तोलानी यांनी दंड जाड दिसू नयेत म्हणून कशाप्रकारचे कपडे वापरावेत आणि कशाप्रकारचे कपडे वापरु नयेत यासाठी काही सोप्या टिप्स आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केल्या आहेत. या टिप्स कोणत्या आणि त्या वापरुन आपण आपले व्यक्तिमत्त्व कसे खुलवू शकतो पाहूया...

कोणत्या फॅशनचे कपडे टाळावेत? 

१. स्लिवलेस कपडे वापरणार असाल तर ते कपडे गोल गळ्याचे नसतील याची काळजी घ्या. कारण स्लिवलेस कपड्यांना गोल गळा असला की आपण आहोत त्यापेक्षा जास्त जाड दिसतो. 

२. अनेकदा आपण टी शर्ट किंवा ब्लाऊज हे हाल्फ स्लिव्हजचे घालतो. मात्र त्यामुळेही दंड जाड दिसतात, म्हणून हाफ स्लिव्हज टाळावे.

३. पफ स्लिव्हजची सध्या बरीच फॅशन आहे. कुर्ते, टॉप, ब्लाऊज अशा सगळ्या प्रकारच्या कपड्यांत पफ स्लिव्हज वापरल्या जातात. पण दंड जाड असतील तर अशा फुग्याच्या बाह्या वापरणे टाळावे.

कोणती फॅशन करु शकता?

१. स्लिव्हजलेस वापरायचे असेल तर इनकट आणि व्ही नेकचे कपडे चांगला पर्याय आहे. तसेच स्ट्रीप्सचे कपडे वापरले तरी आपले दंड जास्त मोठे दिसत नाहीत.

२. फुल बाह्यांचे, बॅगी स्टाईल बाह्या असलेले कपडे घातल्यास दंड दिसायचा प्रश्नच येत नाही. तसेच अशाप्रकारच्या बाह्यांमुळे आपण फॅशनेबलही दिसण्यास मदत होते. 

३. कफ्तान स्लिव्हज हाही दंड दिसू नयेत यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कफ्तान ही फॅशन सध्या इन असून हा पर्याय तुम्ही नक्की वापरु शकता. 

Web Title: DO’s & Don’ts For Bulky Arms Fashion Tips : Embarrassed that the arms look too thick Bulky? 4 tips, look stylish - slim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.