बऱ्याचदा असं होतं की आपण एखादा ड्रेस ऑनलाईन मागवतो. तो घरी आल्यावर जेव्हा आपण घालून बघतो तेव्हा बाकी ठिकाणी तर तो आपल्या व्यवस्थित मापाचा बसलेला असतो. पण त्याचा व्ही आकाराचा गळा मात्र खूपच खोल असतो. त्याचा रंग, डिझाईन सगळं आवडलेलं असल्याने तो पुन्हा वापस करायलाही नको वाटतं. आणि गळा मोठा असल्याने घालताही येत नाही. अशावेळी न शिवता त्या ड्रेसचा गळा तुमच्या अगदी परफेक्ट मापाचा कसा करायचा ते पाहा...(simple and very stylish hack for the deep neck dress and tops problem)
गळा खूप डिप झाला असेल तर मापाचा कसा करावा?
एखाद्या ड्रेसचा, टॉपचा व्ही आकाराचा गळा न शिवता अगदी एका मिनिटापेक्षाही कमी वेळात परफेक्ट मापाचा कसा करायचा, याविषयीचा व्हिडिओ virtualdiva.official या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या ७ कर्तबगार लेकी, परिस्थितीवर मात करत त्यांनी पाहा कसा रचला इतिहास
यामध्ये असं सांगितलं आहे की जो गळा खूप खोल आहे, त्याच्या दोन्ही बाजुंनी सेफ्टी पिन लावा. यानंतर तुमच्या ड्रेसच्या रंगाला शोभेल अशी एखादी लेस घ्या आणि ती त्या दोन पिनांमध्ये अडकवा. आता त्या लेसच्या दोन्ही टोकांची गाठ बांधून त्याठिकाणी एक छानसा बो तयार करा.. गळा तर मापाचा होईलच, पण तुमच्या ड्रेसला आणखी स्टायलिश लूक मिळेल.
हा उपायही करता येईल
एखाद्या ड्रेसचा गळा खूप मोठा झाला असेल तर त्याच्या आतून त्या ड्रेसच्या रंगाची किंवा त्यावर खुलून दिसेल अशा कॉन्ट्रास्ट रंगाची एखादी स्लीप किंवा टीशर्ट तुम्ही घालू शकता.
पावसाळ्यात काही खाल्लं तरी पोट गच्चं होतं, गॅसेसचा त्रास होतो? बघा चटकन आराम देणारे ५ उपाय
टीशर्ट, स्लीप घालायला नको वाटत असेल तर सरळ त्या ड्रेसच्या रंगाचा मिळताजुळता कपडा घ्या आणि तो कपडा दोन सारखीच डिझाईन असणाऱ्या साडी पिना आणून गळ्याच्या भोवती जोडून द्या.