Join us  

सेफ्टीपिन लावल्याने महागडी साडी, ओढणीला भोकं पडतात? वापरा १ सोपी ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2024 12:16 PM

Easy hack to pin up saree without getting damage : साडी आणि ओढण्या भोक पडण्यापासून आणि फाटण्यापासून वाचण्यासाठी...

साडी ही भारतीयांची पारंपरीक वेशभूषा असल्याने सणावाराला किंवा कोणत्याही कार्याला आवर्जून साडी नेसली जाते. महाराष्ट्रात नऊवारी, सहावारी, गुजराती पद्धतीची साडी नेसण्याची पद्धत आहे. साडी चापूनचोपून आणि नीट नेसायची असेल तर आपण त्याला सेफ्टीपीन लावतो. साडीचा पदर आणि निऱ्यांना तरी आपण आवर्जून पीन लावतोच लावतो, त्यामुळे साडी सावरणे सोपे होते. याशिवाय घागरा-चोळी, शरारा, पंजाबी ड्रेस यांवर ओढणी घ्यायची असेल तरी ती सतत हातावर पडू नये म्हणून आपण त्याला सेफ्टीपीन लावतो. सिल्क किंवा अगदी कोणत्याही कापडाची साडी असेल आणि त्याला सेफ्टीपिन लावली की त्याला भोक पडण्याची शक्यता असते (Easy hack to pin up saree without getting damage). 

सातत्याने अशी सेफ्टीपिन लावली किंवा एखादवेळी ती थोडी ओढली गेली तर साडी खराब होण्याची शक्यता असते. महागाची साडी पदराला खराब झाली तर ती वाईट दिसते. जास्तच ओढले गेले तर पीनमुळे कापड त्याठिकाणी फाटल्यासारखेही होते.  पण पदर किंवा चांगल्या ओढण्या अशाप्रकारे खराब होऊ नयेत असे वाटत असेल तर एक सोपी ट्रिक आपण वापरु शकतो. त्यामुळे साडी आणि ओढण्या भोक पडण्यापासून आणि फाटण्यापासून नक्कीच वाचू शकतात. प्रथा साडीच्या कविता कोपरकर यांनी यासाठी नेमकं काय करायला हवं यासाठीची एक सोपी ट्रिक सांगितली आहे.  

१. आपण सेफ्टीपीन लावतो त्यावेळी ती लावताना किंवा काढताना ओढली जाण्याची शक्यता असते. 

२. त्याच्या खालच्या बाजूला असणाऱ्या गोलाकार भागाजवळ साधारणपणे कापड ओढले जाते आणि तिथे कापडाला भोक पडते. 

३. पण असे होऊ नये यासाठी सेफ्टीपीन लावताना त्यामध्ये एक मध्यम आकाराची टिकली घालायची आणि मग सेफ्टीपीन लावायची. 

४. ही टीकली आपल्या साडीच्या किंवा ओढणीच्या रंगाला मॅच असेल तर ती आणखी चांगली दिसू शकते. 

५. पण सेफ्टीपीनच्या खालच्या बाजुला टिकली लावलेली असल्याने मोठे भोक पडण्यापासून आणि साडीचे नुकसान होण्यापासून ती वाचण्यास मदत होते. 

टॅग्स :फॅशनसाडी नेसणे