जागतिक दर्जाची सेलिब्रिटी असणाऱ्या प्रियांका चोप्राच्या स्टाईलची, तिच्या कपड्यांची आणि तिने घातलेल्या दागदागिन्यांची नेहमीच चर्चा असते. आता पुन्हा एकदा तिने घातलेल्या चमकदार केशरी रंगाच्या ड्रेसची चर्चा सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. हा ड्रेस तिने तिच्या भावाच्या साखरपुड्यात घातला होता. वीणकामातला अतिशय सुबक आणि उच्च दर्जाचा मानला जाणारा एक प्रकार म्हणजे मरोडी वर्क. प्रियांकाच्या ड्रेसवर त्याचा अतिशय उत्तम नमुना पाहायला मिळाला. बघा तिच्या ड्रेसची किंमत किती होती आणि मरोडी वर्क नेमकं असतं तरी कसं....(Priyanka Chopra's Stunning Look In Orange Kurta Set)
प्रियंकाने जो केशरी रंगाचा कुर्ता आणि प्लाझो असा सेट घातला होता तो लाजो या फॅशन ब्रँडचा होता. ब्रँडच्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर त्याची किंमत तब्बल ४९ हजार रुपये एवढी दाखवली आहे.
'या' पद्धतीने पंचामृत करून खा, आरोग्यासोबतच केस आणि त्वचेसाठीही उत्तम, बघा ५ फायदे
या ड्रेसवर प्रियांकाने जाळीदार केशरी रंगाची ओढणी घेतली होती. त्यावरचा तिचा ग्लाॅसी मेकअप आणि गळ्यात घातलेले सोन्याचे दागिने तसेच केसांचा हेअरबन तिच्या लूकला एक वेगळीच मोहकता देणारे ठरले. प्रियांकाच्या ड्रेसच्या गळ्याभोवती आणि बाह्यांवर तसेच सलवारच्या खालच्या भागावर मरोडी वर्कचे सुंदर डिझाईन केलेले होते.
मरोडी वर्क म्हणजे काय?
मरोडी वर्क हा वीणकामातला अतिशय उच्च प्रकार मानला जातो. यासाठी इतर एम्ब्रॉयडरी प्रकारांपेक्षा खूप वेगळ्या प्रकारचे सिल्कचे, सॅटीनचे धागे तसेच पातळ तारा वापरल्या जातात. हे वर्क करताना एका विशिष्ट पद्धतीत तो धागा दुमडावा लागतो.
चेहऱ्यावरची चमक गेली- त्वचा डल दिसते? 'हा' उपाय करा- फेशियल केल्यासारखा इंस्टंट ग्लो येईल
गुजरात आणि राजस्थान या भागातच काही मोजक्या कारागिरांतर्फे हे वर्क केले जाते. वीणकामातला अतिशय पुरातन आणि अवघड प्रकार म्हणून मरोडी वर्क ओळखले जाते. या प्रकारासाठी वापरण्यात येणारी सुई देखील अतिशय वेगळी असते. आता काही मोजक्याच ठिकाणी ही पारंपरिक कला तिच्या मूळ स्वरुपात बघायला मिळते.